ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » युवा भरारी » अपेक्षांचे ओझे कशाला?

अपेक्षांचे ओझे कशाला?

ऍड. सचिन नारळे

why_you_must_think_positive“Some times we create our own heart breaks through expectation”
खरंय् मित्रांनो, अपेक्षाभंगाचं दु:ख हे इतर दु:खांपेक्षा, त्रासांपेक्षा जास्तच वाटतं. ‘असं कसं होऊ शकतं?’ ‘मला हे वाटलंच नव्हतं हो!’ वगैरेंसारखी उद्गारवाचक वाक्ये ऐकलीत की, मला आता हसायला येतं ! कारण, कधी काळी मी पण पुष्कळसा त्यातलाच एक होतो. आता पूर्णपणे बदललोय्, असेही नाही.
माणूस आहे, अपेक्षा करणारच! ती बरोबर आहे म्हणा! पण, अपेक्षा का करायच्या मुळातच? बहुतांश वेळा हे बघायला मिळाले की, समोरच्यानं आपल्याला हवे तेच बोलायला हवे असते, वागायला हवे असते. मग तसे झाले नाही की निराशा येते.
अरे हो राजे हो, पण मुळातच असं वाटणे, अशा अपेक्षा करणेच चुकीचे आहे न! तुम्हाला हवे तसेच कोण का वागेल किंवा बोलेल? जहागीर आहे का तुमची?
भाऊ आजच्या काळात प्रत्येक जण अपडेट राहातो. माहिती मिळायच्या दुनियाभरच्या सोई आल्या आहेत. प्रत्येक जण हा प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा विचार करत असतो. शिक्षण आणि शिक्षणाचा स्तर उंचावल्यामुळे आजच्या तरुणांच्या, बालकांच्याच नव्हे, तर सर्वच आबालवृद्धांच्या वैचारिक स्तरांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. प्रत्येकालाच आपली मते असतात. मग कोण का म्हणून दुसर्‍यांचे मत लादून घेईल स्वत:वर?
अपेक्षा का केल्या जातात आणि त्या का वाढतात याचा विचार केला, तर असे लक्षात येते की, अनेकदा आपल्याला ताण सहन करण्याची इच्छा नसते, नव्हे बहुतांश वेळा आपण सर्वच गोष्टी सहज आणि सोप्या कशा साध्य करता येतील, याचा विचार करत असतो. पण बॉस शॉर्टकट्‌स हे फार काळ टिकत नसतात, हे लक्षात घ्यायलाच हवे.
अपेक्षा तो करतो, ज्याच्या जवळ कुठलीही गोष्ट स्वबळावर करण्याची इच्छाशक्ती नसते किंवा कमी असते. सातत्याने दुसर्‍याकडून अपेक्षा ठेवणारी व्यक्ती ही एकतर कर्तृत्वाने कमी असते किंवा सवयीने परावलंबी असते. काही अपेक्षा असलेल्या नात्यांमुळे पण वाढतात. ‘तो आहे ना तिथे, मग माझ्याकरिता तर त्याने एवढे तरी करायला हवे’. होेेे… पण का? तो तिथे आहे म्हणून? नाण्याची एक बाजू ही झाली की, तो तिथे आहे… पण दुसरी बाजू असते, त्या गोष्टीकरिता आपली योग्यता, पात्रता आहे का? जर असेल, तर अपेक्षा ठेवण्यापेक्षा आग्रह का नसावा?
मला नेहमीच असे वाटते की, प्रत्येकाने दुसर्‍यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येकच वेळेस स्वत:कडूनच केल्या, तर आपले कर्तृत्व, आपला आत्मविश्‍वास आणि पर्यायाने स्वाभिमान वाढेल, नव्हे वाढतोच आणि मित्रांनो, त्यासारखा दुसरा आनंद नसतो.
दोस्तहो, निराशेकरिता दुसर्‍यांना दोष देणे चुकीचेच आहे. कारण, खरं कारण असतं ते म्हणजे आपण केलेल्या आपल्याला असलेल्या अप्रस्तुत अवांच्छित अपेक्षा! त्यांनी मला समजून घ्यायला हवे. पण का? समजून घ्यावे लागेल ही वेळच का यावी? आपल्याबद्दल सकारात्मक खात्री असायला हवी बॉस प्रत्येकाच्या मनात. आपल्याबद्दल प्रत्येकाने आशा ठेवावी, पण अपेक्षा नाही, कारण जेव्हा आपण कोणाकडूनच काहीच अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा सगळंच कसं छान वाटायला लागतं. एखाद्याकरिता जेव्हा आपण काही करतो, तेव्हा जर का त्यामागे हा सुप्त विचार असेल की, आज मी याच्याकरिता करतो आहे. त्याच्या बदल्यात त्याने माझ्याकरिता काहीतरी करावे. तर मग ती गोष्ट न केलेलीच बरी.
अहो, साधे उदाहरण आहे. प्रत्येकच आई-वडील आपल्या मुलांना प्रत्येकच गोष्ट त्यांच्या परीने- त्यांच्या कक्षेत, सर्वोत्तम मिळेेल, याचाच विचार आयुष्यभर करतात. ते खरं म्हणजे स्वत:ला विसरून मुलांच्या सुखाकरिता, शिक्षणाकरिता, त्यांच्या सर्व गरजांकरिता स्वत:ला झोकून देतात. मग हीच मुले मोठी झाली की, त्यांना त्यांच्या उत्तम आयुष्याचे वेध लागतात, बर्‍याचदा त्यांना आपले गाव, आपले शहर आणि कधी आपला देशसुद्धा सोडावा लागतो. मुळात आपला देश सोडवतोच कसा? पण कधी तुम्ही ऐकले आहे का की, आई-वडील त्यांना ‘‘बाबांनो आम्ही तुमच्याकरिता एवढे केले आता तुम्ही आमच्याकरिता करा’’ असे म्हणताना? चारच शब्द असतात प्रत्येक वेळेस, ‘सुखी रहा’ आणि ‘यशस्वी हो’. हां…त्यांची आशा असते, इच्छा असते की आता आपल्याकडे मुलांनी लक्ष द्यावे, आपली काळजी घ्यावी. आणि भारतात सुदैवाने आपल्या पालकांची काळजी, स्वत: जातीने, फक्त पैसे पाठवून नाही, घेणार्‍यांचे प्रमाण पण खूप आहे. पण ज्यांना आपल्या आई-वडिलांपेक्षा आपले भविष्य जास्त महत्त्वाचे वाटते, जे आपल्या भावनिक बांधीलकीशी तडजोड करतात पण आपल्या सो कॉल्ड ब्राईट फ्युचरसोबत तडजोड करत नाहीत, त्यांचे पालक खरंच अपेक्षा ठेवून नसतील का? पण ते त्यांच्या चेहर्‍यावर येणार्‍या लहानशा विशादाच्या छटेशिवाय काहीच जाणवू देत नाही.
मित्रांनो, जेव्हा आपण कुठलीही अपेक्षा न करता, कुठल्याही अपेक्षेचा लवलेश न ठेवता जेव्हा कोणाकरिता काही करतो, तेव्हा तुम्हाला कोणाकडून काही अपेक्षा ठेवण्याची गरजच पडत नाही. कारण आपली माणसे आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. अशीही मंडळी बघण्यात येतात की जी नात्यांचे प्रेम देण्यात, आदर करण्यात सुद्धा संकोच करतात, कंजुषी करतात किंवा त्यांचा अहंकार हा जास्त असतो. अशांच्या बाबतीत अपेक्षा तर खूप दूर, साध्या आशा पण करू नये. कारण निराशाच पदरी येते.
स्वाभिमानी व्यक्ती, कर्तृत्ववान व्यक्ती, स्वावलंबी व्यक्ती आणि पराक्रमी व्यक्ती कधीच अपेक्षा करत नसतात. केलाच तर तो जाणीवपूर्वक आग्रह करतात. आवळा देऊन कोहळा काढणार्‍यांपासून दोन, नव्हे तर चार हात दूर राहाणेच श्रेयस्कर. कारण कसे असते मित्रांनो अशांबाबत मग आपल्याला म्हणावे लागते-
”I was your cure, and you were
my disease, I was saving
you but you were killing me”
ही वेळच का येऊ द्यावी? साधे सोपे तंत्र, साधा सोपा मंत्र : ‘‘आस्था, शब्द प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा, विश्‍वास द्यावा पण तो विनाअट, बोलावे पण टोचून टोमणे मारून नाही. त्यापेक्षा न बोललेच बरे आणि काळजी करावी, काळजी घ्यावी पण विनाअपेक्षा.’’ बघा आयुष्य कसे सुंदर होते ते! बॉस जेव्हा जेव्हा माणूस कुणाच्या फार जवळ जातो, तेव्हा तेव्हा अपेक्षांचे प्रमाण वाढलेले दिसते. जवळ जावे, जवळ करावे पण इतके नाही की थोडे बाजूला होतो म्हटले तरी शक्य होत नाही.
दिलेली आश्‍वासने जर पूर्ण करता आली नाहीत, तर प्रचंड अपेक्षाभंग होतो. कधी कधी त्यावर कुणी विसंबून असेल, तर नुकसान पण होते. म्हणून सहज म्हणून किंवा काही स्वार्थ म्हणून पण कधीच कुणाच्या अपेक्षा इतक्या वाढवायच्या नसतात की, त्यात आपण कमी पडू. कारण, बर्‍याचदा कायमचा वाईटपणा सुद्धा येतो. विद्यार्थ्यांकडून मार्कांची/गुणांची अपेक्षा करताना पालकांनी वास्तववादी राहावे. पालकांनी आपल्याच पाल्याचे तोंडावर सदैव कौतुक केल्यास त्याच्या स्वत:विषयीच्या भ्रामक कल्पना तयार होतात. अशांचा अपेक्षाभंग वेळोवेळी होत असतो. शेवटी जाता जाता हृदयावर कोरून ठेवावा असा मंत्र-
“Don’t expect to Receive if you are not willing to give”

https://tarunbharat.org/?p=159
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : युवा भरारी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in युवा भरारी (4 of 9 articles)


काळात आपल्या करीयरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याकरिता, खूपच मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी आपल्या खाजगी आयुष्यातही काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. ...

×