ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » युवा भरारी » अभ्यासतंत्र आत्मसूचना

अभ्यासतंत्र आत्मसूचना

प्रा. देवबा शिवाजी पाटील

aatmsuchana-696x479अभ्यासाची नावड का निर्माण होते याचा सखोल विचार केला तर त्यामागे अनेक कारणे असल्याचे लक्षात येईल. यामध्ये अभ्यासाची काठिण्यपातळी, नवनव्या अभ्यासक्रमांचा व नवनव्या विषयांचा बुद्धीवर होणारा भडिमार, अपुर्‍या सुविधा अशी अनेक कारणे यामागे दिसतात. त्यामुळे अभ्यास न करण्याची प्रवृत्ती किंवा मन विचलित करणार्‍या अनेक व्यवधानांमुळे केलेला अभ्यासही लक्षात न राहणे, थोडाफार राहिलाच तर काही कालावधीनंतर तो विसरणे, परीक्षेत वेळेवर न आठवणे, थोडाफार आठवल्यास गोंधळ होणे, यामुळे बरेचसे विद्यार्थी शालान्त-महाविद्यालयीन परीक्षांमध्ये नापास होतात. ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,’ ‘अपयश हे पुन्हा नवीन जोमाने प्रयत्न करण्यासाठी मिळालेली सुवर्णसंधी असते,’ हेच ते विसरतात नि आपल्या जीवनात खचून वैफल्यग्रस्त होतात. जेमतेम पास होणार्‍यांनासुद्धा आजच्या स्पर्धात्मक युगात टिकाव धरण्यासारखे उच्च गुण न मिळाल्याने तेही हिंमत हारतात व अशाही बर्‍याचशा विद्यार्थ्यांना नैराश्य ग्रासत असते. या नैराश्यातून, वैफल्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळीच सुयोग्य मार्गदर्शनाची, उचित सल्ल्याची गरज असते. त्यांना मानसिक धीर देण्याची आवश्यकता असते. अन्यथा ते आत्मघातकी मार्गाकडे वळून आपल्या आयुष्याचे नुकसान करून घेऊ शकतात, नव्हे बरेचसे विद्यार्थी करतात. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनीसुद्धा या खालील बिनखर्चीक व सहज करता येण्यासारख्या सोप्यासोप्या आत्मसूचनांचा जरूर अवलंब करावा. त्यामुळे त्यांचा काहीही तोटा न होता झाला तर हमखास फायदाच होईल.
आत्मसूचना म्हणजे आपणच, आपणास, आपल्या भल्यासाठी दृढ निश्‍चयपूर्वक केलेल्या सूचना. क्षणोक्षणी आपल्या मनात केलेले सकारात्मक सुविचार माणसात जीवनोपयोगी विलक्षण बदल घडवून आणतात, असे आधुनिक मानसशास्त्राने सप्रयोग सिद्ध केले आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याने मग तो वैफल्यग्रस्त असो वा नसो, आपल्या दैनंदिन अभ्यासासोबत खालील आत्मसूचनांचा दररोज नियमितपणे सराव करावा. मानसशास्त्रानुसार आत्मसूचनांसाठी योग्य कालावधी म्हणजे झोपण्यापूर्वीचे १५-२० मिनिटे व झोपेतून उठल्यानंतरचे १५-२० मिनिटे हा होय. प्रत्येकाने दररोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे समजा रात्री ९.३० वाजता तसेच सकाळी झोपेतून उठल्याबरोबर म्हणजे समजा सकाळी ५.३० वाजता एखाद्या सतरंजीवर साधी मांडी घालून, गुडघ्यांवर सरळ हात ठेवून नीट बसावे. डोळे मिटावेत नि आपले मन आपल्या मेंदूवर एकाग्र करावे. शांत मनाने आपले आपणास स्पष्टपणे ऐकू येईल, अशा मंद पण स्पष्ट आवाजात खालील एकेक वाक्य प्रत्येकी ११ वेळा क्रमाक्रमाने अगदी हळूहळू म्हणावे नि आपले वाक्य आपणच एकचित्ताने लक्षपूर्वक ऐकावे. आपली एकाग्रता पूर्णपणे साधत असल्यास वाक्ये मनातल्या मनात पण आपणच आपणास सूचना देत आहोत व त्या आपण पाळत आहोत, या दृढ भावनेने मात्र ध्यानपूर्वक म्हटले तरी चालतील. डोळे मिटण्याआधी एकेक वाक्य पाठ करावे. ‘मी, मला, माझा, माझी, माझ्या’ हे शब्द अहंकारी प्रवृत्तीने न म्हणता प्रेमळ व नम्र वृत्तीने ठरावीक लय-तालात म्हणावेत.
१. मी खरोखरच हुशार, अभ्यासू व बुद्धिमान आहे.
२. मी दररोज नियमितपणे मन:पूर्वक अभ्यास करतो/करते.
३. माझी आकलनशक्ती छान आहे नि मला माझा अभ्यास चांगला समजतो.
४. माझी ग्रहणशक्ती उत्तम आहे व माझा अभ्यास नीट लक्षात राहतो.
५. माझी स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे नि मला माझा अभ्यास पक्का आठवतोच.
६. मी खूप आत्मविश्‍वासू आहे व मला परीक्षेत हमखास यश मिळणारच आहे.
तर अशा या दृढ निर्धाराने केलेल्या सकारात्मक आत्मसूचना आपल्या मेंदूवर पक्क्या कोरल्या जातात. मेंदूशास्त्रानुसार बुद्धी ही आपल्या मेंदूतच कार्यरत असते. त्यामुळे या आत्मसूचनांचा आपल्या बुद्धीवर आपोआप समन्वयात्मक कायमचा ठसा उमटत जातो नि आपल्या बुद्धीचा विकास होऊन आपल्या बुद्धीची क्षमता वाढत जाते. त्याचवेळी याच आत्मसूचनांनुसार मेंदू आपल्या मनाला आदेश देतो. मन व बुद्धी यांच्यामध्ये आदेश-संदेश यांचे आदान-प्रदान झाल्यानंतर आपल्या अंतर्मनावर त्या बिंबतात व त्याचा मनावर सकारात्मक परिणाम होतो, असे मेंदूशास्त्र व मानसशास्त्रीय प्रयोगांती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आपले मनोबलही वाढते. या सर्व प्रक्रियांमुळे आपल्या बुद्धीची आकलनशक्ती व स्मरणशक्ती यांच्या क्षमता खूप विकसित होतात. परिणामी, आपला आत्मविश्‍वास वाढून आपल्या मनातील परीक्षेबद्दलची भीतीही कमी होते. अर्थात, या दररोजच्या आत्मसूचनांसह विद्यार्थ्याने आपला अभ्याससुद्धा दररोज नेमाने, जोमाने व एकाग्र मनाने केलाच पाहिजे. या आत्मसूचनांसोबत जर आपले मनोबल वाढविण्यासाठी नि मानसिक शांती-समाधानासाठी दररोज नियमितपणे दैनिक पूजा-प्रार्थनेची व ध्यानधारणेची, आपल्या मनोविकासासाठी नि बुद्धिक्षमता वाढीसाठी दररोज सुबोध वाचनाची आणि स्वत:च्या निरामय आरोग्यासाठी रोज नेमाने प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कारादी व्यायामांची आपल्या दैनंदिन जीवनास जोड दिल्यास दुग्धशर्करा मधुर योगाप्रमाणे अति उत्तम.
शक्य झाल्यास पालकांनी याच सूचना आपल्या निराशाग्रस्त पाल्यास त्याच्या दररोजच्या आत्मसूचनांसोबत तो/ती झोपल्यानंतर निद्रासूचनांच्या स्वरूपात द्याव्यात म्हणजे त्यांचा त्याच्या मनावर दुपटीने प्रभाव पडेल. मेंदूशास्त्रानुसार निद्रासूचनांसाठी सुयोग्य कालावधी म्हणजे पाल्य झोपल्यानंतरचा अर्धा तास व त्याची झोप संपण्यापूर्वीचा अर्धा तास हा होय. कारण या वेळेत जरी तो पाल्य शारीरिकदृष्ट्या झोपलेला असतो तरी त्याचा अंतर्मेंदू हा बराचसा जागृतावस्थेत असतो. म्हणून आई-वडिलांनीसुद्धा दररोज आपला मुलगा वा मुलगी झोपल्यानंतर समजा रात्री १० वाजता व तो/ती झोपेतून उठण्याआधी म्हणजे सकाळी ५ वाजता ही वाक्ये वरीलप्रमाणे आपल्या मुला-मुलीजवळ, त्यांच्या उशाशी डोक्याजवळ बसून त्यांच्या झोपेत व्यत्यय येणार नाही, अशा रीतीने शांत, गोड पण स्पष्टोच्चारित हळू आवाजात म्हणावीत. शक्यतोवर आईने ही वाक्ये म्हणावीत कारण आई जननी असल्याने व ती वडिलांपेक्षा आपल्या अपत्याच्या जास्त संपर्कात असल्याने आईच्या नादलयींची नाळ अपत्याच्या मनोलहरींसोबत जास्त जुळलेली असते. त्यामुळे आईचा आवाज मुला-मुलीचा मेंदू लवकर नि चांगल्या तर्‍हेने ग्रहण करतो. अर्थात वडिलांनीसुद्धा ही वाक्ये म्हटल्यास याचासुद्धा सुपरिणाम होतोच नि या आत्मसूचना आपल्या अपत्याच्या मनावर कायमच्या बिंबतात नि त्यानुसार त्या अपत्यामध्ये सकारात्मक बदल घडावयास लागतो, असे मेंदूशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
निद्राशिक्षणाचे म्हणजेच निद्रासूचनांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात काही पाश्‍चात्त्य देशांनी त्यांच्या सैनिकांना मोर्स कोडसारखे कठीण शिक्षण वा शत्रू राष्ट्रात पाठविण्यात येणार्‍या गुप्तहेरांना त्या परक्या देशातील बोलीभाषेचे शिक्षण हे त्या सैनिकांच्या वा गुप्तहेरांच्या निद्रावस्थेतच त्यांना अगोदरच दिले गेले होते नि ते त्यांनी फारच अल्पावधीत ग्रहण केले होते हे बर्‍याच जणांना माहीत असेल. त्यामुळे वरील वाक्ये म्हणताना ‘मी, मला, माझा, माझी, माझ्या’ या ठिकाणी पालकांनी आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाचे षष्ठी विभक्ती प्रत्ययाचे योग्य रूप घालून नंतर ही वाक्ये म्हणावीत. उदा. आपल्या पाल्याचे नाव किरण असल्यास किरण, किरणला, किरणचा, किरणची, किरणचे, किरणच्या, किरणने वगैरे वगैरे इ. पाल्य व पालक यांनी मिळून जर ही वाक्ये दररोज दोन्ही वेळी नियमितपणे न चुकता म्हटल्यास नि पालकांनी आपल्या पाल्याच्या वर्तणुकीच्या दर हप्त्यास अभ्यासपूर्ण निरीक्षणात्मक नोंदी ठेवल्यास पालकांना अंदाजे ७-८ महिन्यातच आपल्या पाल्यात नक्कीच काही अंशीतरी सकारात्मक सुधारणा होत असल्याचे जाणवावयास लागेल, असे मेंदूशास्त्राचे मत आहे.

https://tarunbharat.org/?p=237
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : युवा भरारी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in युवा भरारी (2 of 9 articles)


वानखेडे पाश्‍चात्त्य नृत्यप्रकारात अनेक पुरुष नर्तक नामवंत आहेत. परंतु नागपूरमधील अवघ्या २४ वर्षांच्या नवयुवकाने मात्र भरतनाट्यम् या आपल्याकडील पारंपरिक नृत्यप्रकारात ...

×