ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » युवा भरारी » नृत्यात रंगतो मी …

नृत्यात रंगतो मी …

दीपक वानखेडे

nrtyपाश्‍चात्त्य नृत्यप्रकारात अनेक पुरुष नर्तक नामवंत आहेत. परंतु नागपूरमधील अवघ्या २४ वर्षांच्या नवयुवकाने मात्र भरतनाट्यम् या आपल्याकडील पारंपरिक नृत्यप्रकारात प्रावीण्य मिळवत देशभरात नावलौकिक कमावला आहे. ऋषीकेश पोहणकर असे या युवकाचे नाव.
आपल्याकडे नृत्य या कलेला अगदी पुरातन काळापासून लौकीक आहे. भगवान शंकरानी तांडव नृत्य तसेच पार्वतीनी लास्य हा नृत्यप्रकार केल्याचे आपल्याला माहिती आहे. आठ प्रमुख नृत्यप्रकारातील भरतनाट्यम् ही प्राचीन नृत्यपरंपरा त्यातीलच एक. भावम्, रागम्, तालम्, नाट्यम् यांचे अनोखे मिश्रण म्हणजे भरतनाट्यम्. ही नृत्यपरंपरा तामिळनाडू (तंजावर) येथून वाढीस लागली. आंगिक अभिनय- शारीरिक हालचाल, वाचिक अभिनय-शाब्दिक अभिनय, आहार्य अभिनय- वेशभूषा तसेच रंगभूषा, सात्विक अभिनय-अंतर्नाद तसेच अंतर्लय अभिनय अशा अभिनयांनी परिपूर्ण ही भारतीय नृत्यपरंपरा आज आपल्याकडील अनेक नवकलावंत यशस्वीरीत्या पुढे नेत आहेत. ऋषिकेश पोहणकर त्यातीलच एक नाव.
काही महिन्यांपूर्वी म्हणजेच जून २०१६ ला ‘सप्तरंग कला रत्न-२०१६’ हा आंतरराष्ट्रीय नृत्य सन्मान त्याला प्राप्त झाला तर जानेवारी २०१७ ला त्याला ओडीसा पर्यटक विभाग व सांस्कृतिक मंत्रालय ओडिसातर्फे ‘नृत्य कला मणी’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणार आहे. यासोबत अनेक सन्मान, पुरस्कार आजवर त्याच्या नावावर जमा झाले आहेत. देशभरात आजवर अनेक सोलो, डुएट, ग्रुप परफॉर्मन्स करणार्‍या या युवकाने वयाच्या १४ व्या वर्षापासूनच या कलेला वाहून घेतले. त्याचे परिश्रम आज नावारूपाला आले असून, ऋषिकेश गुरू-शिष्य परंपरेतून ही नृत्यकला अवगत करीत असताना गुरू श्रीमती रत्नम् जनार्दन नायर यांच्याकडून खास भरतनाट्यम्‌चे धडे घेतोय्.
कथक, ओडिसी, कुचिपुडी, भरतनाट्यम्, गरबा आणि दांडिया हे सर्व नृत्यप्रकार स्त्रीप्रधान आहेत. अगदी प्राचीन काळी पौराणिक कथांवर आधारित नृत्यप्रकार देवदासी सादर करायच्या. आजही या नृत्यप्रकारात पुरुष कलावंत हे कमीच आहेत. असा नृत्यप्रकार अवगत करताना पुरुष नर्तकाला घरून किंवा समाजातून सुरुवातीला विरोध होतोच, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ती कला आत्मसात करणं, हे फार मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान या युवकानं पेललं, यातच त्याचं यश सामावलेलं आहे. बीकॉम ग्राफिक्स डिप्लोमा असं शिक्षण पूर्ण करतानाच त्यानं नृत्यकलेसाठी स्वत:ला आयुष्यभरासाठी वाहून घेतलंय्. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचा लौकीक झाला आहे.
भविष्यात त्याला ‘भरतनाट्यम्’मध्ये पीएच.डी करायची आहे. भरतनाट्यम्ला झोकून देताना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, कार्यशाळा, पाहुणा व्याख्याता इत्यादी विविध भूमिका तो निभवत आहे. इतकंच नाही, तर नागपुरातील दोन शाळांत तो सध्या भरतनाट्यम् शिकवायलाही जातोय्.
ऋषिकेश सांगतो, लहापणापासूनच मला नृत्य खूपच आवडायचं. टीव्हीसमोर बसून तासन्‌तास वेगवेगळे नृत्यप्रकार मी पाहायचो. मग मी नृत्य शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला घरून विरोध झाला. परंतु नंतर माझी रूची पाहून कुटुंबियांनीही पाठिंबा दिला. मला वाटतं, हिपहॉप, डिस्को या पाश्‍चात्य प्रकारांचं आज आपल्या पारंपरिक नृत्यप्रकारावर नक्कीच आक्रमण होत आहे, याची खंतही मला आहे. अनेकांना वाटतं, पाश्‍चात्य नृत्यप्रकारात ग्लॅमर आहे, पैसा आहे. पण, परिश्रम घेतले तर आपल्याही नृत्यप्रकारात चांगलं नाव, पैसा, प्रसिद्धी ते मिळवू शकतात आणि आजच्या युवकांनी आपल्या या नृत्यप्रकाराकडे वळावं यासाठीच मी प्रयत्नशील आहे . तसंच ग्रामीण भागातील कलाकारांनाही या क्षेत्राचा विचार करता येईल. त्यांच्याजवळ लोकनृत्य, लोककलेचे अंग असते. पारंपरिक नृत्यप्रकारात त्यांच्या या अंगाचा वापर होतो.
विविध कलांनी संपन्न, जसं नृत्य, संगीत आणि बरंच काही असं भव्य दिव्य कलाविद्यालय मला नागपुरात व्हावं असं वाटतं. अशा कलाविद्यालयात दिग्गज कलाकारांनी शिक्षण द्याव हेच माझं स्वप्नं आहे. माझे गुरू श्रीमती रत्नम् जनार्दन नायर, ज्यांनी मला आईची माया दिली, जिव्हाळा दिला आणि माझे आई-वडील या सर्वांमुळेच मी आज यशस्वी वाटचाल करतोय्. त्यांच्याप्रती मी कायमच ऋणी राहीन.

https://tarunbharat.org/?p=234
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : युवा भरारी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in युवा भरारी (3 of 9 articles)


सचिन नारळे “Some times we create our own heart breaks through expectation” खरंय् मित्रांनो, अपेक्षाभंगाचं दु:ख हे इतर दु:खांपेक्षा, त्रासांपेक्षा ...

×