ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » युवा भरारी » स्वत:ला विसरून कसं चालेल?

स्वत:ला विसरून कसं चालेल?

ऍड. सचिन नारळे

thinking“ Be what you want to be,
not what others want to see ”
सामान्यत: याच्या उलटेच होताना दिसते. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल? अशा स्वनिर्मित, काल्पनिक गोष्टींमुळे आपण आपली ओरिजिनॅलिटीच विसरायला लागतो. मूळ स्वभावामध्येसुद्धा फरक पडायला लागतो. करून बघा विचार, मी म्हणतो ते खरे आहे की नाही.
अगदी बालपणापासूनच आपण सतत Identity crisis चे शिकार होतो. नकळतपणे कोहम्? चा शोध घेतला जातो आणि त्यातूनच मग मी कसा/कशी असायला हवे याचा विचार सुरू होतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस सतत स्वत:शी झगडत असतो. शाळेत जो काही स्वाभाविक असतो तेवढाच, पण आताची पिढी त्याला अपवाद ठरू पाहते आहे. माझी ‘इमेज’ याला अगदी बालवयापासून महत्त्व दिले जाऊ लागले आहे. अल्पांशी ते बरोबर पण ठरू शकतं, पण म्हणून आपली स्वाभाविकता गमवावी का? नकळतपणे आजूबाजूच्या लोकांचे अनुसरण व्हायला लागते. शाळेमध्ये तो असा उभा राहातो, ती अशी बसते पासून तर कॉलेजमध्ये बोलण्याची, हासण्याची, शेकहँड करण्याची लकब आवडली तर आत्मसात करण्याचा प्रयत्न सुरू होतो आणि याचा दूरगामी परिणाम आपल्या लक्षातच येत नाही की, आपले स्वत:चे ओरिजिनल काय? हे विसरतो.
अनेक घरांमध्ये पालकांचे काही निर्बंध, काही सूचना या जाचक वाटायला लागतात. खरंच सांगतो कधी कधी आपण विसरून जातो अशा वेळेस की, आपले बालपण ओसरून अनेक वर्षे झाली आहेत, काळ बदलला आहे, आनंदाच्या कल्पनासुद्धा बदललेल्या आहेत. वैचारिक क्षमता प्रचंड वाढली आहे आणि अशात काही बंधने अतिरेकी किंवा अप्रस्तुत वाटणे स्वाभाविक आहे.
मित्रांनो, जॉन स्टूअर्ट मील म्हणतो “”Originality is the one thing which unoriginal minds can not the use of”
कोणी सांगितले म्हणून तसे वागलो, कोणी सुचवले म्हणून तसे केले हा ब्लेमगेम टाळायलाच हवा. आपल्या प्रत्येकाच्या स्वभावाची काही Prominent वैशिष्ट्ये असतात, त्यांना जपायलाच हवे. स्वाभाविकरीत्या विचार करणारे, स्वाभाविक रीतीने जगणारे योग्य निर्णय घेतात व त्यांना त्यांच्या निर्णयाचा पश्‍चात्ताप होत नाही असे दिसून येते.
आयुष्यात घेतलेला प्रत्येक निर्णय, मग तो परस्पर संबंधाविषयीचा, करीअरचा, प्रापंचिक, व्यावसायिक किंवा अन्य कोणताही असो, जर का स्वाभाविक विचारांती घेतला जातो तेव्हा त्या निर्णयाने समाधानच मिळते. पण खरंच असे होते का? आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा, परिस्थितीचा विचार हा करावाच लागतो. हो ना? त्याला पण पर्याय नसतोच. पण म्हणून झुरत बसण्यापेक्षा, त्यात वेळ घालवण्यापेक्षा घेतलेला निर्णय अचूक ठरवणे हेच सर्वात उत्तम आणि परिणामकारक ठरते.
काही वर्षांपूर्वी ‘एक उनाड दिवस’ नावाचा सिनेमा बघितला आणि त्यात अशोक सराफसारख्या दिग्गज नटाने आपल्या स्वाभाविक अभिनयाने माणूस कसा या अशा बुरख्याआडील आयुष्यात एक दिवस तरी स्वाभाविकरीत्या घालवू शकतो हे दाखवून दिले. त्याची गरज आणि महत्त्व तो सिनेमा बघत असताना प्रत्येक क्षणी जाणवते.
येस बॉस, माणसाने किमान महिन्यातून एक दिवस तरी आपला दिवस ठेवावा, त्या एका दिवसाची ऊर्जा, आनंद उरलेला महिना सहजरीत्या, मग बुरख्याअलीकडील असेल, घालविला जातो. मित्रांनो जगात वावरत असताना आपल्याला अनेक गोष्टी आत्मसात कराव्याच लागतात, मग त्यातील काही मनाविरुद्ध का असेना. कधी कधी वाटते ‘गटारी’ म्हणूनच साजरी केली जात असावी. म्हणूनच जुने जीवलग मित्र/मैत्रिणी भेटल्या की ‘त्या’ गप्पा आणि आपल्यातील Original तो/ती बाहेर पडते.
माझा स्वत:चा अनुभव सांगतो, जेव्हा वेळ मिळेल वर्षातून ३-४ वेळा का असेना, बच्चा कंपनीसोबत गाडी ड्राईव्ह करत एक दोन दिवसाकरता बाहेर पडायचे. किमान दिवसभराकरिता तरी. ड्रायव्हिंग प्लेजर, सोबत बायको आणि बच्चा कंपनी आणि मोस्ट फेवरेट किशोर कुमारची सीडी. मग जेव्हा किशोरदाची गाणी संपूर्णपणे आपल्या तोंडून बाहेर पडतात, तेव्हा सुरवातीला बच्चा कंपनीला आपल्या ‘बाबा’मधला नवीन ‘बाबा’ बघायला मिळतो. मग आपल्या गाण्यांच्या आवडीला मिळालेली दाद ‘बाबा, एवढी सारी गाणी तोंडपाठ आहेत’ ही सुखावून जाते आणि मग मनावर आलेली मरगळ मग अचानकपणे पण अलगद नाहीशी होते. बॉस तुम्ही पण आठवा… जेव्हा आई, Particularly तिच्या माहेरचा काही कार्यक्रम असतो तेव्हा तयार होते तेव्हा ती आपल्याला आपल्याच काही वर्षांपूर्वीची आई आठवून देते. तब्येत बरी नसलेले बाबा विजयादशमीला संघ स्थानावर जाऊ शकत नाही, पण संध्याकाळी जेव्हा मंगल वेष आणि काळी टोपी घालून घरी येणार्‍यांचे सोने स्वीकारतात तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील भाव मी हा खरा ‘असाच’ आहे हे सांगून जातात आणि ते समाधान बघून आपल्याला पण स्वाभाविक आनंद आणि समाधान मिळते.
बॉस आपण जे काही आवश्यक म्हणून स्वीकारतो, मग ते करीअर असेल किंवा अजून काही, त्याला स्वाभाविक रीतीने जपणे, आपल्या स्वभावातील चांगल्या गुणाने, व्यक्तिपरत्वे स्वभावविशेष वेगळे असतील. निश्‍चितपणे त्याला आहे त्यात अजून छान कसे करता येईल याची काळजी घेणे एक वेगळेपण देऊन जाते. प्रत्येक वेळेसच कोण काय म्हणेल असा विचार करत बसणे असंयुक्तिक वाटते.
आमच्या नात्यातली एक व्यक्ती, उच्चशिक्षित, अतिशय टॅलेंटेड, पण आज शहरांपासून दूर एका लहान गावात एकटी राहून शेती करते, तिथल्या गावकर्‍यांसोबत अतिशय समाधानाने राहाते. हे त्या व्यक्तीने आपली ओरीजीनॅलीटीही जपली म्हणून; पण म्हणून प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही.
पण जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे संधी मिळेल आणि ते संयुक्तिक वाटेल तिथे तरी आपण आपली स्वाभाविकताही जपायलाच हवी. कारण बॉस वी शुड नॉट फरगेट की”Be original, Copies fade too fast.”

https://tarunbharat.org/?p=149
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : युवा भरारी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in युवा भरारी (7 of 9 articles)


बड्या कंपन्यांमध्ये नोकरी हवी असेल तर मुलाखत आणि जीडी अर्थात ग्रुप डिस्कशन या दोन महत्त्वाच्या बाबींची कसून तयारी करावी लागते. ...

×