ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » महाराष्ट्र » आजघडीला राज्य भारनियमनमुक्त

आजघडीला राज्य भारनियमनमुक्त

►मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांचा दावा
►कोळसा पुरवठा खर्चात बचत
►‘एमओडी’ संकल्पनेने ग्राहकांचा फायदा
►शेतकर्‍यांना ८ तास वीज देणारच,
मुंबई, ४ डिसेंबर –

Vishwas Pathak

Vishwas Pathak

गेल्या ४ वर्षांत महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्त झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाला म्हणजे भारनियमन होत नाही. शेतकर्‍यांना ८ तासाऐवजी ७ तास वीज दिली, तर ते भारनियमन म्हणता येईल. राज्यात आजघडीला कुठेही भारनियमन नाही, असा दावा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४ वर्षांत ऊर्जा विभागाने केलेल्या कामाचा आलेख त्यांनी पत्रकारांसमोर ठेवला. याप्रसंगी बोलताना पाठक म्हणाले, फक्त थकबाकी असेल, तेथेच पुरवठा खंडित केला जातो. सरसकट वीजपुरवठा खंडित केला जात नाही.
भारनियमन हे वीज नियामक आयोगाच्या सूचनेशिवाय महावितरण करू शकत नाही, असे सांगताना पाठक म्हणाले, शेतकरी केंद्रबिंदू असलेल्या शासनाने ४ वर्षांत शेतकर्‍यांच्या ५ लाख कृषिपंपाना वीज कनेक्शन दिले आहेत. यानंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या कृषिपंपाना ‘एचव्हीडीएस’ योजनेतून कनेक्शन देत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
सौर ऊर्जा
शेतकर्‍यांना दिवसा १२ तास विजेच्या पुरवठ्याची मागणी समोर आली आहे. याकडे लक्ष वेधून पाठक म्हणाले, त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आहे. राज्यात नगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी व यवतमाळ जिल्ह्यात कोळंबी, नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, खापा येथे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू झाले आहेत. आज शेतकर्‍यांना या विजेचा लाभ मिळत आहे.
कोळसा पुरवठा
महानिर्मितीला कोळसा पुरवठा करताना खरेदी, कोळसा वाहतूक, गुणवत्ता या बाबींमधून ४ वर्षांत आम्ही एक हजार कोटी रुपयांची बचत केली आहे. ‘एमओडी’ संकल्पना आयोगाने आणली. त्यामुळे महाग वीज निर्मिती करणारे केंद्र आपोआप बंद पडले आणि ‘एमओडी’ संकल्पनेत बसणारे केंद्र मात्र सुरू राहतात. याचा फायदा ग्राहकांना मिळाला आहे.
राज्यात ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झाला, त्या तालुक्यांत ३३ टक्कके वीज बिल माफ करून बिलवसुली थांबवली आहे, असे सांगून पाठक म्हणाले, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागात वीज पोचली आहे. गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात काही ठिकाणी अजून वीज पोहोचली नाही. मात्र, डिसेंबरअखेरपर्यंत दुर्गम भागात वीज पोचली असेल, असेही ते म्हणाले.
या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या वीज दर, मीटर तुटवडा, केंद्रीय बीज बिल केंद्र, मुंबईत वीज दर एकसारखे असावेत आदी प्रश्‍नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी महावितरणचे तांत्रिक संचालक दिनेशचंद्र साबू हेही पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
राज्याच्या ऊर्जा विभागाला ४ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच या कालावधीत ऊर्जा विभागाने केलेली कामे, राबविलेल्या योजना, घेतलेले सकारात्मक व ग्राहकोपयोगी निर्णयांची माहिती त्यांनी संपूर्ण राज्यात जिल्हास्थानी जाऊन पत्रकारांना दिली. गेल्या १२ नोव्हेंबरपासून ते राज्याच्या दौर्‍यावर होते. मुंबई येथे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या दौर्‍याचा समारोप केला.

Posted by : | on : 5 Dec 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (83 of 443 articles)

Maharashtra Map
दिवस करणार पाहणी, मुंबई, ४ डिसेंबर - महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचे १० सदस्यीय पथक आज मुंबईत दाखल झाले. ...

×