ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » महाराष्ट्र » आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू

आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू

►मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला,
मुंबई, १ डिसेंबर –

Devendra Fadnavis1

Devendra Fadnavis1

‘आता आंदोलन नको, १ डिसेंबरला थेट जल्लोषच करा,’ हा मराठा आंदोलकांना दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशाचा तसा खरा करून दाखविला. राज्य विधिमंडळाने गुरुवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणार्‍या विधेयकावर मोहोर उमटवली आणि शुक्रवारी रात्री राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनीही या विधेयकावर स्वाक्षरी केली. यामुळे आज, १ डिसेंबरपासून राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू झाला आहे.
मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर फडणवीस सरकारने शुक्रवारी रात्रीच राजपत्र जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून, आरक्षणाच्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा १ डिसेंबरपासून राज्यभरात लागू झाला आहे, असे राजपत्रात स्पष्टपणे नमूद आहे.
आरक्षण कायदा राज्यात लागू झाल्याने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे, यात ओबीसी समाजाला असलेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. तथापि, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी यात आरक्षणाची कुठलीही तरतूद असणार नाही.
ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्याची मागणी
दरम्यान, ब्राह्मण समाजाच्या स्थितीचे सर्वेक्षण करून या समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली. ब्राह्मण समाजाला जातीच्या नव्हे तर आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण मिळावे, असे ब्राह्मण महासंघाचे सदस्य आनंद दवे यांनी स्पष्ट केले. यासाठी आपण लवकरच राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. ग्रामीण भागात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करावे आणि हा समाज मागासला असल्याचे निष्पन्न झाल्यास शासनाने आरक्षण द्यावे, असे त्यांनी सांगितले.
आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देणार : उद्या याचिका दाखल होण्याची शक्यता
सरकारी नोकर्‍या व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणार्‍या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १९९२ मध्ये एका महत्त्वाच्या निकालात आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निर्धारित केली होती. त्यापुढे आरक्षण देण्यावर निर्बंध आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून राजस्थानमध्ये गेल्या वर्षी एका विशिष्ट समाजाला आरक्षण दिले होते. त्याला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आरक्षण कायद्याला स्थगिती दिली होती. राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण तत्कालिन सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने १३ नोव्हेंबर २०१७ रोजी अंतरिम आदेश देताना, राज्य सरकारला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून कोणत्याही समाजाला आरक्षणाचे लाभ देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. ही बाब लक्षात घेऊन ५० टक्के मर्यादेच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी देऊ नये, अशी विनंती इंडियन कॉन्स्टिट्यूशलिस्ट परिषदेने राज्यपालांना केली होती, पण राज्यपालांनी मराठा समाजाला आरक्षण देणार्‍या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने, या निर्णयाला सोमवारी आव्हान देण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. या संदर्भात परिषदेतर्फे सोमवारी न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (125 of 483 articles)

Devendra Fadanvis Scetch
सरकारची विधान परिषदेत घोषणा, मुंबई, ३० नोव्हेंबर - राज्य सरकारी कर्मचार्‍यांना येत्या १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, ...

×