ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » महाराष्ट्र » काँग्रेसला भगदाड : सुजय विखे-पाटील भाजपात

काँग्रेसला भगदाड : सुजय विखे-पाटील भाजपात

रणजितसिंह मोहितेही भाजपाच्या संपर्कात,
मुंबई, १२ मार्च –

Sujay Vikhe Patil Joins Bjp

Sujay Vikhe Patil Joins Bjp

विधानसभेतील विरोधी पक्षनेते नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अखेर काँग्रेसला सोडचिट्ठी देत, भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी मंगळवारी पक्ष प्रवेश केला. अहमदनगरमधून त्यांना भाजपाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीत भाजपने सुजय विखे यांच्या पक्ष प्रवेशाच्यामाध्यमातून काँग्रेसला मोठा राजकीय शह दिला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, बबनराव पाचपुते आदी उपस्थिती होते. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सुजय विखे यांच्या नावाची अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शिफारस करणार असून, त्याला केंद्रीय निवडणूक समितीकडून हिरवा कंदील मिळेल असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येईल. मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो असे सांगतानाच अहमदनगरमध्ये भाजपा पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सुजय यांनी सांगितले. घरच्यांच्या विरोधात जाऊन भाजपा प्रवेशाचा निर्णय घ्यावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सुजय यांच्या भाजपा प्रवेशावेळी अहमदनगर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. ‘भाजपाचा विजय असो’ अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अहमदनगरमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचे यावेळी सांगितले. काँग्रेसला नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्याने सुजय विखे-पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने भाजपाच्या संपर्कात होते.
रणजितसिंह मोहितेही भाजपाच्या संपर्कात
राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी शिवनेरीवर दाखल झाले होते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असली, तरी विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवाय राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नावही चर्चेत असल्याने रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुलाचे हट्ट वडिलांनीच पुरवायचे असतात : पवार
मुलाचे हट्ट पुरविण्याची जबाबदारी वडिलांचीच असते; इतरांची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल टोला लगावला.
सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातली अहमदनगर लोकसभेची जागा सोडावी, असा हट्ट सुजयचे वडील, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरला होता. तो धागा पकडून, आपल्या नातवाचे लाड आपण पुरवले. त्यासाठी कोणाकडे हट्ट धरला नाही, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आमदार कोळंबकरही गळाला?
मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही भाजपाच्या गळाला अडकल्याचे सांगितले जात आहे. नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. इतकी वर्ष काँग्रेसचे आमदार असूनही प्रश्‍न सुटले नाहीत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची कामे केली. यामुळे आपण मुख्यमंत्र्याच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी सांगितले. पण, कोळंबकर यांनी भाजपा प्रवेशासाठी काही अटी ठेवल्याचेही सांगितले जात आहे.
‘माढ्या’चा निर्णय दोन दिवसांत घ्या : राजू शेट्टी
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने माढ्याच्या जागेसाठी स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. हा मतदार संघ स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात यावा, असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला दिला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाची आम्ही सुरुवातीपासून मागणी करीत होतो; पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: ही जागा लढविणार होते आणि त्यामुळे आम्ही मागणी मागे घेतली. शरद पवार आता निवडणूक लढणार नसल्याने आम्ही माढ्याच्या जागेची मागणी पुन्हा आघाडीकडे केली आहे. उद्यापर्यंत आघाडीने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 13 Mar 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (8 of 461 articles)

Radhakrushna Vikhe Patil
१२ मार्च - राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा ...

×