ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » महाराष्ट्र » ‘त्या’ सातही संघटना माओवाद्यांशी संलग्न

‘त्या’ सातही संघटना माओवाद्यांशी संलग्न

पुणे पोलिसांचा दावा,
वृत्तसंस्था
मुंबई, ८ सप्टेंबर –

Maoist Naxal

Maoist Naxal

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून आम्ही अलीकडेच ज्या सात संघटनांच्या लोकांना अटक केली, त्या सर्व संघटनांचे कायद्याने बंदी असलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेशी जवळचे संबंध असल्याचा दावा पुणे पोलिसांनी आज शनिवारी केला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत नक्षलवादी नेतेही सहभागी होते, या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारावर तपास मोहिमेच्या काळात पोलिसांनी १० जणांना अटक केली होती. प्रसारमाध्यमांनी मात्र यातील केवळ एकाच संघटनेचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे वृत्त प्रकाशित केले. पुणे पोलिसांनी हे वृत्त खोडून काढताना, सर्व सातही संघटना माओवाद्यांशी संलग्न असल्याचा दावा केला.
केंद्र सरकारने २२ जून २००९ रोजी जेव्हा सीपीआय (माओवादी) या संघटनेवर बंदी घातली, तेव्हा त्या बंदीत तिच्याशी संलग्न असलेल्या इतर सर्वच संघटनांचा समावेश होता. या सर्वच संघटनांना सरकारच्या राजपत्रित आदेशात देशविरोधी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस उपायुक्त शिवाजीराव बोडखे यांनी दिली. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात अटक करण्यात आलेले तेलुगू कवी वरवरा राव यांचा रिव्हॉल्युशनरी डेमॉकॅ्रटिक फ्रंटशी संबंध असून आंधप्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा सरकारने या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. याशिवाय, गौतम नवलखाचे पीपल्स युनियन फॉर डेमॉकॅ्रटिक राईट्सशी आणि सुधा भारद्वाज व सुरेंद्र गडलिंग यांचे इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्सशी संबंध आहेत. रोना विल्सन यांचे राजकीय कैद्यांना मुक्त करणार्‍या गटाशी संबंध असून, शोमा सेन यांचे कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमॉक्रॅटिक राईट्स या संघटनेशी संबंध आहेत. वेरनान गोन्सालविस आणि अरुण फरेराचे माओवाद्यांच्या महाराष्ट्र राज्य समितीशी जवळचे संबंध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
१७ सप्टेंबरला सुनावणी
भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी नक्षलवाद आणि शहरी माओवाद्याकडून आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात केलेल्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी १७ सप्टेबरपर्यंत तहकूब केली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर ११ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्‍चित करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या दंगलीत माओवाद्यांकडून आर्थिक मदत केल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी देशभरात छापे टाकून पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या संशयितांविरोधात कोणतेही सबळ पुरावे नाहीत, असा दावा करून या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांऐवजी एनआयएकडून केला जावा, अशी विनंती करणार्‍या तीन याचिका दाखल झाल्या आहेत.

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (95 of 435 articles)


पुणे, ८ सप्टेंबर - लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात आपण राहत आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण सजग राहिले ...

×