ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » महाराष्ट्र » भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास
•►दोन्ही नेत्यांचे नगारा वाजवून युतीवर शिक्कामोर्तब,
नागपूर, ६ डिसेंबर –

Fadnavis Thackeray

Fadnavis Thackeray

शिवसेनेने ‘एकला चलो’चा नारा दिला आहे, तर भाजपाने नेहमीच युतीचा आग्रह धरला आहे. दोन दिवसांपूर्वी वाशीमच्या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांनी राजशिष्टाचार बाजूला सारून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून सोबत प्रवास केला. त्यामुळे भाजप सेनेत युतीबाबत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची चर्चा चांगलीच रंगली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा-सेनेची युती असल्याने सेनेला विदर्भातून अमरावती, रामटेक, वाशीम-यवतमाळ आणि बुलढाणा अशा चार जागांवर यश मिळाले. त्यानंतर मात्र, भाजपा-सेनेने विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्याने विदर्भातील ६२ जागांपैकी भाजपाने ४४ जागांवर यश मिळवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पटकावले. त्या तुलनेत शिवसेनेला केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले. रामटेकचा खासदार शिवसेनेचा असताना येथे सेनेला विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही. वाशीम-यवतमाळमधून भावना गवळी एका दशकाहून अधिक काळ खासदार असताना दिग्रसमधून केवळ संजय राठोड विजयी झाले. अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांना तर आपल्या मुलालाही निवडून आणता आले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपला पराभव होईल, या भीतीने सेना खासदारांना चांगलेच ग्रासले होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ‘एकला चलो’चा नारा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आमदार-खासदार आणि पदाधिकार्‍यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत विदर्भातील आमदार-खासदारांनी स्वबळावर निवडणूक लढविण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. स्वबळावर लढल्यास शिवसेनेचे विदर्भातून अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती आमदार-खासदारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे नंतर युतीबाबत शिवसेना नेत्यांचा सूर पालटला.
भाजपा नेत्यांकडून नेहमीच युतीचा आग्रह धरण्यात आला. दोन दिवसांपूर्वी वाशीम येथे संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने युतीच्या नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला जाताना मुख्यमंत्र्यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत उद्धव ठाकरेंच्या मोटारीतून कार्यक्रमस्थळापर्यंत प्रवास केला. या दरम्यान या दोन्ही नेत्यांत युतीबाबतच चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठा आरक्षण लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले, तर उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाचा व अलीकडेच त्यांंनी केलेल्या अयोध्या दौर्‍याच्या पृष्ठभूमीवर त्यांना रामाचे आशीर्वाद मिळतील, असे सांगत या दोन्ही नेत्यांनी चांगलीच साखरपेरणी केली. मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यातून या दोघांमध्ये जवळीक तयार होत आहे. तसेच युतीबाबत सकारात्मक पाऊल पडल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशीममध्ये संत सेवालाल मंदिर परिसरात विकासकामांचे भूमिपूजन करताना परस्परांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांमधून आगामी निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युती होणार असल्याचे दृढ संकेत दिले आहेत. या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी नगारा वाजवून युतीवर जणू शिक्कामोर्तबच केल्याची जोरदार चर्चा या दोन्ही पक्षांत आहे.

Posted by : | on : 7 Dec 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (119 of 483 articles)

Bombay High Court
सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर - राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात १ डिसेंबरपासून लागू झालेल्या मराठा आरक्षण कायद्याला तूर्तास स्थगिती देण्यास ...

×