ads
ads
काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँगे्रससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » महाराष्ट्र » मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही शिफारशी सरकारने स्वीकारल्या,
मुंबई, १८ नोव्हेंबर –

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

राज्यातील मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत केली.
राज्य विधिमंडळाच्या उद्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या चहापान आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालात तीन शिफारशी करण्यात आल्या आहेत. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण द्यावे, शासकीय व निमशासकीय नोकर्‍यांमध्ये त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही. मराठा समाज आरक्षण घेण्यास पात्र आहे आणि अपवादात्मक परिस्थितीत घटनात्मक तरतुदी करण्यासाठी शासनाने आवश्यक तो निर्णय घ्यावा, अशा तीन शिफारशी आयोगाने केल्या आहेत. या सर्व शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण दिले जाईल. या शिफारशींवर पुढील वैधानिक कारवाई करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठा आरक्षणासाठी केंद्रीय मागासवर्ग आयोगाची परवानगी घेण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
धनगर समाजाच्या आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘टीस’ या संस्थेचा अहवालही सरकारकडे आला आहे. या समाजाला भटक्या आणि विमुक्तांमध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे. त्यांना ते अनुसूचित जनजाती प्रवर्गात हवे आहे. हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे या अहवालाचा अभ्यास केला जात आहे. त्यानंतर सरकार त्याची केंद्राकडे शिफारस करेल, असेही त्यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर
गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सरकारने ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याला करतात बदनाम
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, आज गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. २००० ते २०१४ सालापर्यंत म्हणजे तब्बल १४ वर्षांत महाराष्ट्रात तीन कोटी १४ लाख कोटींची गुंतवणूक झाली. आमच्या काळात अवघ्या चार वर्षांत ही गुंतवणूक तीन कोटी ३६ लाख रुपयांची झाली. विरोधक उगाच गैरसमज पसरवून आपल्याच राज्याची बदनामी करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
गोटेंचा राजीनामा नाही
भारतीय जनता पार्टीचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार नाहीत. धुळे महापालिका निवडणुकीत तेही सुभाष भामरे, गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांच्याबरोबर काम करतील. आपापसातील मतभेद ते एकत्रित बसून दूर करतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गँग ऑफ वासेपूर
आपल्याला ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणणार्‍या विरोधकांनी आतातरी पोरकटपणा थांबवावा. आपण त्यांना गँग ऑफ वासेपूर, असे म्हणू शकतो, पण तसा पोरकटपणा आम्ही करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (28 of 435 articles)

Vidhan Bhavan
मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर होण्याची शक्यता, मुंबई, १८ नोव्हेंबर - पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आल्यामुळे, नागपूरच्या ...

×