ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी –

Kishore Pradhan

Kishore Pradhan

मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमधून त्यांनी आपल्या कसलेल्या अभियनाची चुणूक दाखवली आहे.
आपल्या अभिनयातून किशोर प्रधान यांनी मराठी आणि इंग्रजी रंगमंचावर विशेष छाप उमटवली होती. शिक्षणाचा आयचा घो, लालबाग परळ, भिंगरी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय् हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. याशिवाय लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील खट्याळ आजोबा, जब वुई मेटमधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणार आहेत. दूरदर्शनवरील ‘गजरा’ हा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता. तो देखील प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीला उतरला होता.
किशोर प्रधान यांची अभिनयाची शैली अफलातून होती, त्यामुळे त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
नागपूरला झाला होता जन्म
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत घराण्यात झाला होता. त्यांच्या आई मालती प्रधान यांना नाटकांची आवड होती. १९४० च्या दशकात त्या नाटकातून काम (पान २ वर)४
करायच्या. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातच नाटकाच्या तालमी पाहात ते मोठे झाले. किशोर प्रधान यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून पदवी मिळवली. पुढे अर्थशास्त्रात एम. ए. केले व नंतर मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये दोन वर्षांची संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त केली. नंतर समाजशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
महाविद्यालयात असताना त्यांनी विविध स्पर्धा, एकांकिका व नाटकांमधून अभियनाचा श्रीगणेशा करीत आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या रंजन कला मंदिरसाठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये व नाटके केली. ग्लॅक्सो कंपनीत नोकरी करीत असताना, अंगातील कला आणि नाटकांची ओढ प्रधानांना स्वस्थ बसू देत नव्हती. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. याच ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी कॉलनीतील हौशी नाटकवेड्यांना घेऊन प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली आणि ‘तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या महोत्सवात हे नाटक खूप गाजले. भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक होते. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘संभव असंभव’ आदी नाटके त्यांनी केली.
अशी आहे चित्रपटातील कारकीर्द
बबन प्रभू, आत्माराम भेंडे यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. याच कालावधीत त्यांना मराठी चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या, पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला सलग काही दिवस चालायचे, त्यामुळे नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपट नाकारले होते. मात्र, निवृत्तीनंतर काही चित्रपट केले. ‘मामा भाचे’ हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट. पुढे डॉक्टर डॉक्टर, भिंगरी, नवरा माझा ब्रह्मचारी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, लालबाग परळ या चित्रपटातून त्यांनी काम केले.
हिंदी चित्रपट
लगे रहो मुन्नाभाई मधील खट्याळ म्हातारा प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटी असली तरी ते आपली छाप पाडून गेले. जब वुई मेटमधील त्यांचा स्टेशन मास्तरही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला, पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (5 of 65 articles)

Bombay High Court
१० जानेवारी - ओबीसी वर्गाला दिलेले आरक्षण अवास्तव आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बाळासाहेब सराटे यांच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका ...

×