ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » भाजपाला दणका देणार होतो, आम्हालाच बसला!

भाजपाला दणका देणार होतो, आम्हालाच बसला!

►शिवसेना नेते रामदास कदम यांची कबुली,
मुंबई, १ जानेवारी –

Ramdas Kadam

Ramdas Kadam

अहमदनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आम्ही भाजपाला दणका देण्यासाठी व्यापक रणनीती तयार केली होती. सर्वाधिक जागा आमच्या असल्याने आम्ही काँगे्रस आणि राष्ट्रवादी या दोघांशीही पाठिंब्याची चर्चा सुरू केली होती, पण ऐनवेळी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला आणि आमची खेळी आमच्यावर उलटली, अशी कबुली शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी आज मंगळवारी दिली.
भाजपाला डावलून अहमदनगरचे महापौरपद प्राप्त करण्याची रणनीती आम्ही निवडणुकीच्या निकालानंतर लगेच तयार केली होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चाही सुरू होती. राष्ट्रवादी आमच्यासोबत असा खेळ खेळेल, असा विचारही केला नव्हता, असे कदम यांनी सांगितले.
त्रिशंकू निकाल लागलेल्या नगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, पण निकालांत तिसर्‍या स्थानावर असलेल्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर आपले महापौर आणि उपमहापौर निवडून आणले. जे कुरघोडीचे राजकारण आम्ही खेळणार होतो, ते आमच्यावरच उलटले, अशी प्रतिक्रिया नगरमधील राजकीय उलथापालथीवर कदम यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाविरोधाची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली आहे. हा पक्ष जाहीरपणे भाजपाचा विरोध करतो आणि सत्तेचा प्रश्‍न असेल तिथे भाजपाचे समर्थन करतो. या पक्षाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही कदम यांनी केली.
राष्ट्रवादीने घेतला चिमटा
शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपासोबतचा संसार नीट चालतो का, ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करावी, असा टोला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर असभ्य भाषेत टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांनी कदम यांचा आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.
शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईलच; पण आधी सेनेने भाजपसोबतचा संसार नीट चालेल, की घटस्फोट होणार याचेही उत्तर जनतेला हवे, असेही नवाब मलिक म्हणाले.

Posted by : | on : 2 Jan 2019
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (7 of 65 articles)

Bombay High Court
सुनावणी १० डिसेंबरला, मुंबई, ५ डिसेंबर - राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात १ डिसेंबरपासून लागू झालेल्या मराठा आरक्षण कायद्याला तूर्तास स्थगिती देण्यास ...

×