ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » मुंबई-कोकण » मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय

►पुढील सुनावणी १० डिसेंबरला,
मुंबई, ५ डिसेंबर –

Bombay High Court

Bombay High Court

राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात १ डिसेंबरपासून लागू झालेल्या मराठा आरक्षण कायद्याला तूर्तास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात येईल, हे ओळखून राज्य सरकारने आधीच न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे सरकारची भूमिका जाणून घेतल्याशिवाय आम्ही या प्रकरणी कुठलाही निर्णय आणि सुनावणी देखील करू शकत नाही. आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी जनहित याचिका आणि कायद्याची तातडीने अंमलबजावणीची विनंती करणारी सरकारची याचिका, या दोन्हींवर एकत्रित सुनावणी १० डिसेंबर रोजी होईल, असे न्या. नरेश पाटील यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले.
सरकारी नोकर्‍या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने नव्याने कायदा केला असला तरी, हा कायदा भारतीय राज्यघटनेतील अनेक तरतुदींशी विसंगत आहे, असा दावा या कायद्याला आव्हान देणार्‍या डॉ. जयश्री पाटील यांनी केला.
आज सकाळी न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर न्यायालयाने पाटील यांना वकिलासह याचिका सादर करण्याची परवानगी दिली. त्यावर दुपारनंतर सुनावणी करताना, न्यायालयाने आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवर तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला. मराठा आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का ६८ पर्यंत वाढल्याने त्यास न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता गृहीत धरून सरकारने १ डिसेंबरला उच्च न्यायालयात आणि २ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयालाही यावर कुठलाही निर्णय देण्याआधी राज्य सरकारची भूमिका ऐकून घ्यावी लागणार आहे.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : मुंबई-कोकण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मुंबई-कोकण (6 of 63 articles)

Ram Janmabhoomi Movie
वक्फ बोर्डाची निर्मिती, मुंबई, २९ नोव्हेंबर - अयोध्येतील बहुचर्चित राम मंदिराच्या वादावर आधारित आगामी चित्रपट ‘रामजन्मभूमी’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ...

×