ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » महाराष्ट्र, सोलापूर » रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत,
मुंबई, २० मार्च –

Rajitsinh Mohite Patil Joins Bjp

Rajitsinh Mohite Patil Joins Bjp

सोलापूर जिल्ह्यातील युवा नेते, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा लाभ पोहोचविण्यासाठी केलेल्या कामामुळे आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री सुभाष पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपा सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. या घराण्यातील तिसर्‍या पिढीतील तरुण उमदा नेता भाजपामध्ये सामील झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादानेच रणजितसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये दाखल झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे मोहिते पाटील घराणे भाजपाशी जोडले गेले आहे. राज्यातील अनेक राजकीय पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करत असून, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे.
ते म्हणाले की, विजयसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना मांडली. विजयदादांना श्रेय मिळू नये यासाठी जुन्या सरकारमधील काहींनी ती होऊ दिली नाही. भाजपा सरकारने मात्र गेल्या पाच वर्षांत पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व मोठ्या सिंचन योजनांना निधी दिला आहे व कामाला गती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी गेल्या पाच वर्षांत दिलेला निधी हा आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पूर्ण बहुमताचे सरकार या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर येणार आहे. पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणार्‍या खासदारांमध्ये माढ्याचा भाजपाचा खासदार असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पार्टी राज्यात बळकट झाली आहे. भाजपामध्ये अनेक नवे कार्यकर्ते जोडले गेले आहेत. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती अशा सर्वच निवडणुकांत भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपा पूर्ण बहुमत मिळवेल. राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा भाजपा शिवसेना महायुती जिंकेल.
रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गटतट पक्ष बाजूला ठेऊन विकासकामावर भर दिला. अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले. समाजातील तळागळातील माणसाला लाभ देण्यासाठी भाजपा सत्तेचा वापर करत असल्याने आपण या पक्षात प्रवेश करत आहोत.
माढाची उमेदवारी विजयसिंहांनाच देणार होतो ः जयंत पाटील
विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर पवारसाहेबांनी शिक्कामोर्तबही केले होते आणि तसे त्यांना कळवण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. त्या पृष्ठभूमीवर जयंत पाटील यांनी सदर वक्तव्य केले.
गेली अनेक वर्षे विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. राज्याच्या मंत्रिपदावर त्यांनी काम केले आहे. उपमुख्यमंत्रिपदही भूषविले होते. शिवाय खासदारही होते. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हेही खासदार होते. आज विजयसिंह मोहिते पाटील यांना पक्ष उमेदवारी देणार होता. परंतु, त्यांनी दुसरे नाव दिले होते. पण, त्या नावाला कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात चर्चा करणार होतो. आजही राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले होते. परंतु, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्ष सोडला. त्यांच्याविषयी वेगळे आणि वाईट बोलणे योग्य नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले.
माढा मतदारसंघात आम्ही निष्कर्षापर्यंत आलो आहोत की, आम्ही सक्षम उमेदवार देऊ. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा माढा जिंकण्याचा भ्रम तुटेल असेही ते म्हणाले.

Posted by : | on : 21 Mar 2019
Filed under : महाराष्ट्र, सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र, सोलापूर (21 of 481 articles)

Prakash Ambedkar1
आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ मुंबई बॉम्बस्फोट तसेच दंगलीचा मास्टर माईंड दाऊद इब्राहिम ...

×