ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » विदर्भ » आजपासून ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आजपासून ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

यवतमाळ, १० जानेवारी –

Aruna Dhere

Aruna Dhere

तीन दिवसीय ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार, ११ जानेवारीपासून यवतमाळात पार पडणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरीतील शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वैशाली सुधाकर येडे या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आणि पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री मदन येरावार, साहित्य संस्कृती महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर आणि कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते उपस्थित असतील.
संमेलनातील आजचे कार्यक्रम
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बिगुल वाजले आहे. शहरात साहित्यप्रेमींची रेलचेल चालू झाली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर महामंडळाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते करण्यात येईल. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सर्व सदस्य उपस्थित असतील.
सकाळी १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरातील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते तथा यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. संध्याकाळी ७ वाजता कवी शंकर बडे कविकट्टा परिसरात, कवी शिवा राऊत व्यासपीठावर आयोजित कवीकट्ट्याचे उद्घाटन डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होईल. यावेळी राजन लाखे व कौसल्या बडे उपस्थित राहतील.
संध्याकाळी ७.३० वाजता कवीसंमेलनाचा कार्यक्रम फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.
संमेलनासाठी यवतमाळ सज्ज
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११, १२ व १३ जानेवारी रोजी यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून रसिकांच्या स्वागतासाठी यवतमाळ नगरी सज्ज झाली आहे. या संमेलनास सर्वसामान्य कोणीही नागरिक, वाङ्मय प्रेमी, कलाप्रेमी, वाचक तसेच रसिक-श्रोते उपस्थित राहू शकतात, असे आयोजकांनी सांगितले आहे.
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमापासून ते विविध परिसंवाद, कविसंमेलने, विविध सत्रात नागरिकांना उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच त्यासाठी कोणतीही पास लागणार नाही. इतर सुविधा पाहिजे असल्यास किंवा स्मरणिकांसाठी मात्र शुल्क भरावे लागणार आहे. ४५ वर्षांनंतर यवतमाळ येथे होणार्‍या या संमेलनाचा सर्वांनी लाभ आणि आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.
३०० स्वयंसेवक
या अभूतपूर्व सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी ३०० स्वयंसेवकांची बैठक, संमेलन कार्यालयात पार पडली.
या सर्व स्वयंसेवक समितीचे समन्वयक सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. राजू केंद्रे आहेत. पार पडलेल्या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. अविनाश शिर्के, प्रा. घनश्याम दरणे, श्रीकांत निवल, अभिजित सोळंके, प्रकाश घोटेकर, प्रवीण ढाकुलकर यांनी मार्गदर्शन केले.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (5 of 14 articles)

Joshi Shripad
जोशींचा हा पळपुटेपणा असल्याची तीव्र भावना ►संमेलन मराठीचे, त्यावर बहिष्कार न टाकण्याचे आवाहन ►यवतमाळात सर्वच राजकीय नेते संमेलनाच्या पाठीशी, नागपूर/ ...

×