ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » विदर्भ » आतापर्यंत ३७!

आतापर्यंत ३७!

►इंद्रावती नदीत आणखी १५ नक्षल्यांचे मृतदेह,
तभा वृत्तसेवा
गडचिरोली, २४ एप्रिल –
बिजापूर-महाराष्ट्राच्या बोरिया जंगलात २२ एप्रिलच्या सकाळी १६ नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी १५ मृतदेह सापडले असून राजाराम खांदला-नैनेर परिसरातील चकमकीत पुन्हा ६ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. आता मृत नक्षल्यांचा आकडा ३७ वर पोहचला असून ६ नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले आहेत.
शनिवारी रात्री सी -६० पथक व सीआरपीएफच्या क्रमांक ९ बटालियनच्या पोलिसांनी ताडगावनजीकच्या बोरिया जंगलात नक्षल्यांना घेरले होते. दुसर्‍या दिवशी पहाटे झालेल्या चकमकीत १६ नक्षली ठार झाले. त्यात डीव्हीसी सिनु, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ यांचा समावेश होता.
सोमवार, २३ एप्रिलला घटनास्थळ परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता, इंद्रावती नदीच्या पात्रात आणखी १५ नक्षल्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती आहे. तसेच सोमवारीच राजाराम खांदला-नैनेर परिसरात संध्याकाळी झालेल्या चकमकीत पुन्हा ६ नक्षली ठार झालेत. यात दोन पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे.
या चकमकीत डीव्हीसी वासुदेव आत्राम उर्फ नंदू, प्लाटून क्रमांक ७ ची सदस्य क्रांती, प्लाटून क्रमांक ७ चा सदस्य कार्तीक उईके (रा. कटेझरी), अहेरी एलओएस सदस्य जयशीला गावडे (रा. बिनागुंडा), अहेरी एलओएस सदस्य लता वड्डे हे ठार झाले असून एका महिला नक्षलीची ओळख अद्याप पटलेली नाही.
सदर कारवाई अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए. राजा व डॉ. हरी बालाजी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या सहा नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले असून इंद्रावती नदीपात्रात आढळलेल्या १५ नक्षल्यांचे मृतदेह आणण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, आजपर्यंतच्या इतिहासात नक्षल्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नक्षल चळवळीच्या इतिहासात मिळविलेले हे अभूतपूर्व यश आहे. दरम्यान, रविवारच्या चकमकीत ठार झालेल्या डीव्हीसी श्रीनुचे नातेवाईक सोमवारी सकाळी गडचिरोलीला पोहचले असून त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
बारावीत प्रथम आला होता नंदू
राजाराम खांदला-नैनेर परिसरात झालेल्या चकमकीत ठार झालेला डीव्हीसी नंदूचे मूळ नाव वासुदेव आत्राम असे असून तो अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी होता. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत घेतले. सन २००१-०२ मध्ये बारावी विज्ञान शाखेत त्याने शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला होता. मात्र त्यानंतर तो नक्षल चळवळीकडे आकृष्ट झाला. सोमवारी त्याला प्राण गमवावा लागला.

Posted by : | on : 25 Apr 2018
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (4 of 10 articles)


वर्षांतील सर्वात मोठी कारवाई ►मृतांमध्ये जहाल नक्षलींचा समावेश ►बोरिया जंगलात शोध मोहीम सुरूच, तभा वृत्तसेवा गडचिरोली, २२ एप्रिल - गडचिरोली ...

×