ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » विदर्भ » कोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार!

कोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार!

►मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका
►रस्ते झाले जलमय, अनेक वस्त्यांत पाणी शिरले
►मेट्रो रेल्वे, सिमेंट रस्ते आणि पुलांमुळे जागोजागी पाणी
►संततधार पावसामुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत,
नागपूर, ६ जुलै –

Nagpur Floods Rain

Nagpur Floods Rain

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही दिवसभर धो धो बरसल्याने उपराधानीत हाहाकार माजला. हुडकेश्‍वर भागातील शेकडो वस्त्या पाण्याखाली आल्याने तेथील रहिवाशांना बोटीने बाहेर काढण्यात आले. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट रस्ते, उड्डाण पूल आणि विविध कामांच्या खोदकामांमुळे नागपूरला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. गेल्या आठ दिवसांपासून पावसाच्या सरी येत होत्या. परंतु, काल गुरुवारी रात्री पावसाला चांगलीच सुरुवात झाली. शुक्रवारी दिवसभर धो धो पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील हजारो वस्त्या पाण्याखाली आल्या. संपूर्ण शहर जलमय झाले. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. घरांमध्येही पाणी शिरले. अनेक अपार्टमेट्सच्या बेसमेंटमधील चारचाकी तरंगू लागल्या. झाडे पडली. इटारसी पुलाजवळ झाड पडल्याने त्या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. घरांच्या भिंतीही पडल्या. नागनदी, पिवळी नदी, पोहरा नदीसह नाल्या भरभरून वाहत होत्या. नदी, नाल्यांची स्वच्छता झाल्यानंतरही किनार्‍यावर असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी घुसले. यावरून शहरात झालेल्या स्वच्छतेची पोलखोलही झाली. पावसाने जोरदार हजेरी लावली की शहरात धुमाकूळ माजतो. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. बघता बघता तो तुफान कोसळला. शुक्रवारीही दिवसभर कोसळत होता. त्यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. वस्त्यांमध्ये पाणी घुसले. वाहनचालकांना वाहने चालविणेही कठीण झाले. रस्त्यांवर पाणी साचले. नदीकाठावर असलेल्या वस्त्यांमध्ये तर हाहाकारच उडाला. हजारो वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नरेंद्र नगर पूल नेहमीप्रमाणे पाण्याखाली आला. वर्धा मार्गावरील वाहतूक बंद झाली. सोनेगाव पोलिस ठाण्यात पाणी जमा झाले. विमानतळावरही पाणी साचले. विद्यानगरातील भवन्स शाळेत पाण्याचा वेढा झाल्याने तेथील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
विदर्भात संततधार
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील आवळी-सोनी मार्गावर असलेल्या चूलबंद नदीवरील रपट्यावर अचानक पुराचे पाणी आल्याने शेतीकामासाठी नदीतून जात असलेले ट्रॅक्टर पाण्याखाली आले. या ट्रॅक्टरवरील मजुरांनी छतावर बसून स्वतःचा बचाव केला. मृग नक्षत्रापासून हुलकावणी देणार्‍या पावसाने गेल्या २४ तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर संततधार हजेरी लावली. या पावसाने चंद्रपूर महानगरातील सखल भागामध्ये पाणी साचले. अनेक झाडे कोसळलीत. खांबाडा गावाचा चंद्रपूरशी संपर्क तुटला. अनेक स्कूल बसेस अडकल्या होत्या. बोर्डा-आनंदवनकडून येणार्‍या रेल्वेपुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसामुळे रस्ते पडल्यामुळे एसटीची बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. चिमूर-वरोडा मार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने एसटी बस पाण्यात अडकली. प्रवासी सुखरूप बाहेर निघाले. खांबाडा गावानजीक टॉवर उभारणीचे काम करणारे कामगार कोथरा नदीला आलेल्या पुर्‍यामुळे अडकले होते. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळ गाठून बोटद्वारे या कामगारांना सुखरूप बाहेर काढले. जिल्ह्याच्या पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील वैनगंगा नदीत बुडाले विनोद बेडकर नावाची व्यक्ती पोहता येत नसल्यामुळे वाहून गेली असल्याची माहिती आहे.
वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ व कांढळी गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. दुबार पेरणी केल्यानंतर आलेल्या पावसाने आता शेतकरी सुखावला आहे. हिंगणघाट व ग्रामीण परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. स्मशान भूमीवरील शंकराच्या मूर्तीच्या तीन फुटार्पर्ंत पाणी पोहचले होते.
यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारपासूनच पावसाने हजेरी लावली आणि काही तासात संपूर्ण जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले. पावसाची ही झड कायम असून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे किरकोळ घटना सोडता कुठेही मोठे नुकसान झालेले नाही.
गुरुवारच्या रात्रीपासूनच गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरीवर्ग सुखावला आहे. आणखी दमदार पाऊस पडल्यास जिल्ह्यातील काही ठिकाणी धान रोवणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अमरावतीत दिवसभर दाट ढगाळ वातावरण व अधूनमधून रिमझिम स्वरूपात येणार्‍या पावसाचा जोर शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या दरम्यान वाढला होता. वृत्त लिहेस्तोवर जोरात पाऊस सुरू होता. मागील काही दिवसांपासून खंड पडलेल्या पावसाने गुरुवारी गोंदियात मुक्काम ठोकल्याचे चित्र होते. सतत येत असलेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून बळीराजा रोवणीच्या कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Posted by : | on : 7 Jul 2018
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (1 of 10 articles)


बाळासाहेब देवरस स्मृती भवनाचे लोकार्पण, तभा वृत्तसेवा मलकापूर, ३ मे - कार्यालयामुळे संघकार्यामध्ये वाढ व्हावी. संघाला अपेक्षित समरस, समर्थ, संघटित ...

×