ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » विदर्भ » ग्रंथदिंडीने दुमदुमली यवतमाळ नगरी!

ग्रंथदिंडीने दुमदुमली यवतमाळ नगरी!

►अ. भा. मराठी साहित्य संमेलन,
विवेक कवठेकर
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी), ११ जानेवारी –

Marathi Sahitya Sammelan Yavatmal

Marathi Sahitya Sammelan Yavatmal

यवतमाळातील असंख्य मोर्चे आणि शोभायात्रांचा साक्षीदार असलेल्या आझाद मैदानासमोरील रस्ता. आज तिथे भल्या पहाटे छान रांगोळी घातलेली. रांगोळीच्या रिंगणात ज्ञानेश्‍वरी, गाथा, ग्रामगीता, लीळाचरित्र, भारताचे संविधान इ. ग्रंथांची पालखी ठेवलेली. तिला फुलातोरणांनी सजवलेले. बरोबर आठ वाजता पालखीच्या पुढ्यात उभ्या असलेल्या तुतारेकर्‍यांनी तुतार्‍या फुंकल्या. आणि ग्रंथपूजनासाठी आमंत्रित केले गेले, शेतकरी आत्महत्यांनी त्रस्त जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या वैशाली येडे या भगिनीस. तिच्यासोबत नूतन संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष विद्या देवधर, पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष मदन येरावार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक मेघनाद राजकुमार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्यासह प्रत्येकाने पालखी खांद्यावर घेऊन प्रारंभ केला, ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा.
शिवसमर्थ ढोलताशा पथकातील मराठमोळ्या वेशभूषेतील तरुण-तरुणींनी एकच निनाद केला. ढोल घुमू लागले, मंगल कलश धारण केलेल्या आणि नटूनथटून आलेल्या शाळकरी मुली पुढे सरसावल्या. घोषपथकाने ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही धून वाजविणे सुरू केले. चौकाचौकांत महिला, मुली फुगडी खेळू लागल्या. सजविलेल्या आकर्षक चित्ररथांवर ज्ञानेश्‍वर, नामदेव, चोखामेळा, तुकाराम, रामदास, एकनाथ, जनाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, सोयराबाई, गुरुनानक, जलाराम, नरसी मेहता, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, गुलाबराव महाराज, ताजुद्दिन बाबा, जगनाडे महाराज, गजानन महाराज या संतांसह ज्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होतेय् असे पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, भाऊसाहेब पाटणकर, शंकर बडे, य. खु. देशपांडे यांच्या वेशभूषा केलेली मुले, त्यांची माहिती प्रदर्शित करणारी झलक दिसत होती.
शाळांचे लेझीम पथक, ग्रामीण भागातून आलेले कोलामी लोकनृत्य, दंडार, गोंडी नृत्य, फासेपारधी समाजाचा देखावा यातून ग्रंथदिंडीला भलताच रंग भरला होता. आझाद मैदान, पाचकंदिल चौक, तहसील चौक, जाजू चौक, दवाबाजार चौक, दत्त चौक, बसस्थानक चौक, आयुर्विमा चौक मार्गाने दिंडी पोहचायला तब्बल दोन तास लागले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, हार घालून पालखी व दिंडीतील वारकर्‍यांचे स्वागत केले जात होते. नगर परिषद, राजन्ना रहिवासी, संस्कृती संवर्धक मंडळ, विश्‍वमांगल्य सभा, दत्त मंदिर संस्थान, ऑटोरिक्षा संघटना, डॉ. आंबेडकर पुतळा समिती, यवतमाळ अर्बन बँक यांच्यासह दिंडीच्या दुतर्फा दाटीवाटीने उभ्या असलेल्या यवतमाळकर रसिकांनी दिंडीच्या रूपाने यवतमाळात होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना गाडबैले, प्रवीण देशमुख, अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, संस्कृती संवर्धक मंडळाचे प्रा. सुखदेव ढवळे, निवासी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शासनाच्या माहिती विभागाचे अधिकारी, दूरदर्शनचे अधिकारी, साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, यवतमाळातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यांनी दिंडीचे आपापल्या पद्धतीने स्वागत करून यवतमाळातील स्वागतशीलतेचा आणि उत्सवप्रियतेचा परिचय दिला. ग्रंथदिंडी समितीचे नीरज डफळे, प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. सतपाल सोवळे, जयंत चावरे, जीवन कडू, सचिन ठाकरे, हितेश राठोड, डॉ. ललिता घोडे, चैताली सराफ, तोष्णा मोकडे, मनीषा केतकर, डॉ. नितीन खर्चे, घनश्याम दरणे यांच्यासह रासेयो स्वयंसेवक व विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक-प्राध्यापकांनी दिंडीच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
ग्रंथदिंडी पोस्टल मैदानात पोहचल्यानंतर तेथे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष विद्या देवधर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मराठीचा झेंडा असाच फडकत राहो, अशा घोषणा देवधर यांनी दिल्या. त्यास सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत संमेलनाचा बिगुल फुंकल्याचे सांगत दिंडीच्या यशस्वितेबद्दल यवतमाळकरांना धन्यवाद दिले.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (4 of 14 articles)

Aruna Dhere
१० जानेवारी - तीन दिवसीय ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार, ११ जानेवारीपासून यवतमाळात पार पडणार आहे. राष्ट्रसंत ...

×