ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » विदर्भ » निमंत्रण वापसीसाठी पालकमंत्र्यांच्या लोकांनी आणला दबाव

निमंत्रण वापसीसाठी पालकमंत्र्यांच्या लोकांनी आणला दबाव

►डॉ. जोशींनी वृत्त वाहिनीकडे व्यक्त केली खदखद,
यवतमाळ/ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, १२ जानेवारी –

Marathi Sahitya Sammelan Yavatmal

Marathi Sahitya Sammelan Yavatmal

९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला काही तास शिल्लक राहीले असताना, तडकाफडकी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार्‍या डॉ.श्रीपाद जोशी यांनी संमेलन ऐन भरात असताना, पुन्हा एकदा नयनतारा सहगल ‘राग’ आळवला आहे. विशेष म्हणजे, राजीनामा दिल्यानंतर डॉ.जोशी प्रथमच जाहीरपणे खासगी वृत्तवाहिनीशी बोलले आहेत, हे विशेष!
संमेलनाच्या समारोपला फटाके लावण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया त्यामुळे लमटत आहेत. संमेलनस्थळी येऊनही मुख्य मांडवात न येता आपली नाराजी दाखविणार्‍या डॉ. जोशी यांनी, नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नाकारण्यासाठी, पालकमंत्री मदन येरावार यांच्या ‘लोकांनी’ आपल्यावर दबाव आणला असल्याचे टीकास्त्र डॉ.जोशी यांनी सोडले आहे. ‘इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण नाकारले नाही तर संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील, असे सांगण्यात आले,’ असे डॉ. जोशी यांनी सांगितले आहे.
‘कोणीतरी आयोजकांना धमकी देऊन, त्यांना नको असलेली व्यक्ती संमेलनाच्या पटलावरून पूर्णत: बाजूला करतो. यामागच्या कुटील कारस्थानाचा मागमूसही लागू दिला नाही, पण त्यांच्या या चुकीच्या आणि असमर्थनीय वागणुकीचे खापर मात्र महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले जाते. मराठी भाषिक समाजात ही लाजिरवाणी घटना आहे,’ असे जोशी यांनी माध्यमांना सांगितले. त्यांनी दिलेल्या या वक्तव्यामुळे या निमंत्रण आणि बहिष्कार प्रकरणाला पुन्हा हवा मिळते की काय, अशी चर्चा साहित्यनगरीत रंगली आहे.
नयनतारा सहगल यांच्या वादग्रस्त भाषणाची किंवा संमेलन उधळून लावण्याची शक्यता बघता त्यांना दिलेले निमंत्रण नाकारण्याची घटना या संमेलनाच्या पूर्वी घडली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलण्यास असमर्थ असून थकव्याचे कारण पुढे करीत, डॉ.जोशी यांनी ‘आता थेट १३ जानेवारीलाच बोलणार आहे,’ असे माध्यमांना कळवले. मात्र, त्यानंतर लगेच त्यांनी राजीनामा दिला आणि प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली. त्यानंतरही, आयोजक समितीने धीर न सोडता संमेलन यशस्वी करण्यासाठी जंग जंग पछाडले. आता संमेलनाच्या समारोपूर्वी पुन्हा एकदा या प्रकरणाला त्यांनी वाचा फोडली आहे.
स्वागताध्यक्षांनी मानले सहकार्यासाठी आभार!
नयनतारा सहगल यांच्या प्रकरणावर महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कामकाजमंत्री विनोद तावडे यांनी उद्घाटनपर कार्यक्रमातच भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत. या सगळ्या घडामोडींशी आपला काहीही संबंध नसून, हे प्रकरण आता संपले आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी सहकार्य देणार्‍या सर्वांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रीया यवतमाळचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यटनमंत्री तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी दिली आहे.
आज समारोप
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ रविवार १३ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारोप समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून तर कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभानंतर सायं. ७ वाजता यवतमाळ आकाशवाणीचा ‘सूर झाले दिवाने’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (2 of 14 articles)

Aruna Dhere
अरुणा ढेरे यांची चपराक ►९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे वैचारिक वादळी उद्घाटन, रेवती जोशी/अनिरुद्ध पांडे यवतमाळ/राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य परिसर, ...

×