ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » विदर्भ » महामंडळाच्या अध्यक्षांची पदवापसी!

महामंडळाच्या अध्यक्षांची पदवापसी!

►डॉ. जोशींचा हा पळपुटेपणा असल्याची तीव्र भावना
►संमेलन मराठीचे, त्यावर बहिष्कार न टाकण्याचे आवाहन
►यवतमाळात सर्वच राजकीय नेते संमेलनाच्या पाठीशी,
नागपूर/ यवतमाळ, ९ जानेवारी –

Joshi Shripad

Joshi Shripad

शुक्रवारपासून यवतमाळात होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसीच्या तडाख्यातून सावरत संमेलन यशस्वी करण्यासाठी बळ एकवटत असताना आज अचानक नैतिक जबाबदारी स्वीकारत साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिलेल्या राजीनाम्याने ‘खळ्ळ् खट्याक्’ची स्थिती निर्माण झाली आहे. संमेलन मराठी रसिकांचे आहे आणि ते यशस्वी करून दाखविण्यासाठी विदर्भ आणि बाहेरच्या समंजस सूज्ञांनी कंबर कसली आहे, हेही सुखावह चित्र आहे.
जोशी यांच्या ऐन वेळेवर, तडकाफडकी आणि अनपेक्षित दिलेल्या राजीनाम्यामुळे आयोजकांनाच नव्हे, तर सर्वसामान्य रसिकांनाही धक्का बसला आहे.
जोशी यांनी ऐन वेळेवर असा राजीनामा फेकून अवसानघातकीपणा, पळपुटेपणा केलेला आहे, अशीही प्रतिक्रिया संमेलनाचे कार्यकर्ते आणि यवतमाळकर रसिकच नव्हे तर संपूर्ण नागपूर- विदर्भात उमटत आहे. ‘दबंग’ शैलीत वागणार्‍या आणि बोलणार्‍या डॉ. जोशींसारख्या व्यक्तीला असे वेळेवर अंग काढून घेणे मुळीच शोभनीय नाही. ‘मी महामंडळाचा अध्यक्ष नसतो तर मीही संमेलनावर बहिष्कार टाकला असता’, असे काल डॉ. जोशी म्हणाले होते. त्यांनी या पद्धतीने संमेलनावर बहिष्कारच टाकला आहे, अशीही तीव्र प्रतिक्रिया यवतमाळात उमटत आहे.
आता अध्यक्षपदाचा राजीनामाच दिला असल्यामुळे डॉ. श्रीपाद जोशी संमेलनाला ‘न येण्यासाठी’ मोकळे झाले आहेत. तरीपण ते येतील आणि यवतमाळकर आयोजकांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा संमेलन कार्यालयात व्यक्त करण्यात आली.
प्लॉट कुणी रचला, शोध घ्या
मोकळे होताना : श्रीपाद जोशींचा सल्ला
मनसे प्रमुख राज ठाकरे हेच राजीनाम्याची प्रेरणा
मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रण वादाच्या मुद्यावरून अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचा राजीनामा देणारे श्रीपाद जोशी यांनी आपल्या राजीनाम्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रेरणा असल्याचे म्हटले आहे. साहित्य संमेलनातील गोंधळाचा हा ‘प्लॉट’ नेमका कुणी रचला याचा शोध घ्या, असे आवाहनही जोशी यांनी केले.
सुरुवातीला राजीनाम्याबद्दल बोलण्यास नकार देणार्‍या जोशी यांनी नंतर आपली नाराजी बोलून दाखवली. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची प्रेरणा मला राज ठाकरे यांच्याकडून मिळाल्याचे ते म्हणाले. हा वाद मनसेच्या एका छोट्या कार्यकर्त्याने संमेलन उधळण्याची धमकी दिल्यामुळे सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्याचे कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसेच केले, असे सांगून, दुसर्‍याच्या चुकीची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले. आयोजकांनी मला खलनायक आणि दहशतवादी ठरवले. हे सगळे अत्यंत वेदनादायी होते. हे सगळे का झाले याचा शोध घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षपदाची सूत्रे उपाध्यक्षांकडे
आजच्या बैठकीत होणार नव्या अध्यक्षाची निवड
पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जबाबदारी कुणाची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आहे.
नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द होण्यासाठी श्रीपाद जोशी हेच जबाबदार असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून केला जात होता. जोशी यांनी आयोजकांना यासाठी जबाबदार धरले होते. मात्र, आयोजकांनी साहित्य महामंडळाचा मेसेज आमच्याकडे असल्याचे म्हटले होते. यामुळे जोशी वादात सापडले होते. या सार्‍या घडामोडींच्या पृष्ठभूमीवर त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जात आहे.
जूनमध्ये लागू झालेल्या महामंडळाच्या नवीन घटनेनुसार अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास त्यांचे अधिकार उपाध्यक्षांकडे असतील. राजीनाम्यानंतर एक महिन्यात बैठक घेऊन नवीन अध्यक्ष नेमणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनामुळे महामंडळाची पूर्वनियोजित बैठक उद्या यवतमाळ येथे होणार आहे.
या बैठकीत जोशी यांचा राजीनामा स्वीकारला गेल्यास त्याचवेळी नवीन अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. महामंडळाचे कार्यालय सध्या विदर्भ साहित्य संघाकडे असल्याने विदर्भ साहित्य संघाचा महामंडळातील प्रतिनिधी अध्यक्ष म्हणून निवडला जाईल. महामंडळाच्या कार्यालयाची जबाबदारी पुढील तीन वर्षांसाठी १ एप्रिलपासून मराठवाडा साहित्य परिषदेकडे जाणार आहे.

Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (6 of 14 articles)

Nagpur Floods Rain
पावसाचा अधिवेशनाला फटका ►रस्ते झाले जलमय, अनेक वस्त्यांत पाणी शिरले ►मेट्रो रेल्वे, सिमेंट रस्ते आणि पुलांमुळे जागोजागी पाणी ►संततधार पावसामुळे ...

×