ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » विदर्भ » विदर्भात उष्णतेची लाट

विदर्भात उष्णतेची लाट

तभा वृत्तसेवा
नागपूर, २६ एप्रिल –

Angry Sun1

Angry Sun1

चंद्रपूर जिल्ह्यासह अवघ्या विदर्भात उष्णतेची लाट असून, वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. बुधवारी, ४५.०१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली असून, हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे.
‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरचा यंदाचा उन्हाळा अधिकच त्रस्त करून सोडणारा ठरत आहे. पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमीपाऊस झाला. नदी, नाले उन्हाळ्यात कोरडे पडू लागले आहे. भूजल पातळीही झपाट्याने घटली. तप्त उन्हाने जिल्ह्यातील प्रकल्पही तळाला गेले. यंदाच्या तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यात तापमान ४५.९ अंशापर्यंत गेले होते. यंदा चंद्रपूरची राज्यातच नव्हे, तर देशात सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे. गुरुवारी चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी ४४.४ अंश, तर गडचिरोली ४१.४ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली.
मे महिन्यात तापमानातआणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळी ८ वाजतापासून उन्हाचे चटके असह्य होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील मुख्य रस्ते दुपारी ओस पडतात. सध्या काही शाळा-महाविद्यालयांनाही सुट्ट्या लागल्या असल्याने दुपारी शहरात शुकशुकाट दिसून येतो.
अकोला ४३.६
पश्‍चिम विदर्भात उष्णतेच्या लाटेने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहे. दुपारी शहरात शुकशुकाट असतो. नागरिकांनी दुपारची सर्व कामे बंद करून ते सकाळी आणि संध्याकाळी करण्यावर भर दिला आहे. गुरुवारी अकोला शहराचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअस इतके होते.अंगाची लाही-लाही करणारे व चटके लावणारे हे तापमान आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरही चांगलेच तापले होते. तेथेही ४६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. पण शासकीय तपमान नोंदणीची सोय तेथे नसल्याने खामगाव येथील राजकुमार गोयनका यांनी दिलेल्या माहितीवरूनच हा आकडा देण्यात येतो.
पुढील आठवड्यात तापमानात घट होऊन ते ४३ अंश राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
वाशीम जिल्ह्यात पण उष्णतेच्या झळा नागरिकांना बसत आहेत. वाशीममध्ये गुरुवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वाशीम खालोखाल सर्वात कमी तापमान बुलढाण्याचे होते. तिथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
अमरावती ४१.५ डिग्री
विदर्भातल्या अन्य जिल्ह्यांसह अमरावतीतही तापमानात वाढ झाली असून गुरुवार, २६ एप्रिल रोजी ४१.५ डिग्री से. तापमानाची नोंद करण्यात आली. उष्ण झळांचे प्रमाण वाढल्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम दिसायला लागला आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यापासून अमरावतीत फक्त एकदाच ४२ डिग्रीपर्यंत तापमान गेले होते, असे श्रीशिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान विभाग प्रमुख अनिल बंड यांनी तभाला सांगितले. तापमानात चढ-उतार आहे. अमरावतीच्या तुलनेत चंद्रपूर व अकोल्याच्या तापमानात लक्षणीय वाढ दिसत आहे. येत्या दोन-चार दिवसात तापमान ४२ ते ४३ डिग्रीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे, असे बंड यांनी सांगितले. तापमान वाढल्याने शहरातली दुपारची वर्दळ कमी झाली आहे. उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत.
यवतमाळ ४२ वर; पाणी आणि उकाड्याने नागरिक त्रस्त
गेल्या तीनगचार दिवसांपासून उष्णतेची लाट पसरल्याने शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. यवतमाळचा पारा ४२ च्या वर गेला असून पाणी आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प कोरडे पडल्याने शहरवासींना पाण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे. या पाणी टंचाईमुळे पाणी वापरावर निर्बंध आले असून उन्हापासून बचाव करण्यासाठी ‘कूलर’ लावणेही दुरापास्त झाले आहे.
उन्हाच्या या तडक्यामुळे दुपारी बारानंतर यवतमाळच्या रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्याचे दृश्य दिसून येत आहे. तसेच शासकीय रुग्णालयानेही उष्माघात झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळावे म्हणून उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे.

Posted by : | on : 27 Apr 2018
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (3 of 10 articles)


नदीत आणखी १५ नक्षल्यांचे मृतदेह, तभा वृत्तसेवा गडचिरोली, २४ एप्रिल - बिजापूर-महाराष्ट्राच्या बोरिया जंगलात २२ एप्रिलच्या सकाळी १६ नक्षल्यांचा खात्मा ...

×