ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » विदर्भ » हे वा़ङ्मयीन राजकारणाचे व्यासपीठ नव्हे

हे वा़ङ्मयीन राजकारणाचे व्यासपीठ नव्हे

►डॉ. अरुणा ढेरे यांची चपराक
►९२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे वैचारिक वादळी उद्घाटन,
रेवती जोशी/अनिरुद्ध पांडे

Aruna Dhere

Aruna Dhere

यवतमाळ/राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य परिसर, ११ जानेवारी –
साहित्य संमेलन हा मराठीचा उत्सव आहे आणि वा़ङ्मयीन राजकारणाने तो आपण भ्रष्ट होऊ दिला. ही आपली चूक आहे. विद्रोहाचा विचार जरूर व्हावा पण, तो करताना साहित्याचा वारसा जपण्याची गरज आहे. संमेलनाच्या प्रतिष्ठेला अशोभनीय घटना घडल्या असून, ती नामुष्की, खेद आणि निषेधाचीच बाब आहे. पण, तरीही साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे परस्परांना पाठ दाखविण्याचे नाही तर संवाद साधण्याचे व्यासपीठ आहे. वा़ङ्मयीन राजकारणाचे नव्हे, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राजकारण करणार्‍यांना संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी सणसणीत चपराक हाणली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य परिसरात, ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर समारंभात अध्यक्षीय भाषणातून डॉ. ढेरे यांनी नयनतारा सहगल आणि एकूणच संबंधित विषयांवर चौफेर फटकेबाजी केली. यावेळी, मंचावर महाराष्ट्राचे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री तसेच, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार, उद्घाटक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला वैशाली येडे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. विद्या देवधर, ९१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, नगर परिषद अध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार, साहित्य संमेलन आयोजक संस्थांचे सचिव डॉ. विवेक विश्‍वरूपे व घनश्याम दरणे, साहित्य संस्कृती मंडळाचे पदाधिकारी विलास चिंतामण देशपांडे व इंद्रजित ओरके यांच्यासह आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.
आपल्या विस्तृत संबोधनात, डॉ. अरुणा ढेरे यांनी वा़ङ्मयबाह्य शक्तींनी साहित्य संमेलनाला प्रभावित करू नये, असे सांगताना त्या म्हणाल्या की, साहित्यावर राजकारणाचे आक्रमण नको आणि साहित्यातही राजकारण नको. संमेलनापूर्वीच्या आठवड्यात घडून गेलेल्या घटनांच्या पृष्ठभूमीवर, प्रत्येक साहित्य रसिकाने त्याचा विवेक आणि प्रगल्भ जाणिवा प्रकट करण्याची वेळ आली आहे. झुंडशाहीच्या दबावापुढे झुकण्याचा भाबडेपणा करण्याची गरज नाही तर ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ हीच शैली अंगिकारावी लागेल. हजारो वर्षांची परंपरा जपताना आपण कळत-नकळत त्याचे नूतनीकरण करत असतो. मात्र, परंपरांच्या नावाखाली छुपे समाजघातक उद्देशही आपण ओळखायला हवेत, असे मत डॉ. ढेरे यांनी व्यक्त केले. आपल्या प्रदीर्घ अध्यक्षीय भाषणात त्यांनी दरवर्षीच संमेलनात काहीतरी वाद होत असल्याचे निदर्शनास आणून देत, संमेलनाचे हे गढूळपण बाजूला करून, निर्मळ साहित्य संमेलन होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, असे स्पष्ट मत डॉ. ढेरे यांनी मांडले.
आपल्या ओघवत्या शैलीत आणि अलंकृत शब्दांनी सज्ज भाषणातून डॉ. ढेरे यांनी, साहित्यिकांपुढे ‘आ’ वासून असलेल्या निर्मितीविषयक आव्हानांची सखोल विचारांनी मांडणी केली. कविकल्पना कितीही हव्याशा आणि भुरळ पाडणार्‍या असल्या तरी समकालीन वास्तवापासून दूर जाऊन निव्वळ कलावंत म्हणून किंवा साहित्यकार म्हणून जगणे शक्य तर नाहीच पण, योग्यही नाही. आपल्या साहित्यकृतींच्या पाठीशी आपणच उभे राहायला हवे आणि त्यासाठी निर्मितीविषयीचा दृढ आत्मविश्‍वास आणि वा़ङ्मयीन मूल्यांवरची दृढ निष्ठा असायलाच हवी. साहित्याच्या केंद्रस्थानी माणूसच असायला हवा या जाणिवेतून साहित्यकार वेळप्रसंगी आंतरिक प्रत्ययातून निषेध, नकार, चळवळी आणि आंदोलनांसारखी हत्यारे वापरतो, असेही त्या म्हणाल्या.
‘सावध ऐका पुढल्या हाका’ असे म्हणत, एका बाजूला चंगळवादाच्या विळख्यात सर्व ललित कलांचा व्यापार अडकून त्यांना विक्रयमूल्य येत असताना दुसर्‍या बाजूला संगणकयुगाचे अनाकलनीय वेगाने अवतरण होताना साहित्याची शक्तीमत्ता नाहीशी होत साहित्यातील सहितत्त्व नष्ट झाल्याने जगण्याचा लढा सर्वच पातळ्यांवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. संतसाहित्य आणि मौखिक परंपरा, संतांचा विद्रोह, मिथक आणि समाजपरिवर्तन, ज्ञानोपासकांची परंपरा, कलांचे आंतरसंबंध, शिक्षणक्षेत्राची स्थितिगती, बहुविध ज्ञानपरंपरा आणि विद्रोह, स्त्रीजीवनाची द्वंद्वात्मक स्थिती आणि विसंगतीने भरलेल्या शतकावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in विदर्भ (3 of 14 articles)

Marathi Sahitya Sammelan Yavatmal
भा. मराठी साहित्य संमेलन, विवेक कवठेकर यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी), ११ जानेवारी - यवतमाळातील असंख्य मोर्चे आणि शोभायात्रांचा साक्षीदार ...

×