ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » महाराष्ट्र » विरोधकांनी मराठा आंदोलनाला हवा देऊ नये : चंद्रकांत पाटील

विरोधकांनी मराठा आंदोलनाला हवा देऊ नये : चंद्रकांत पाटील

►गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज ५ वेळा तहकूब,
मुंबई, २६ नोव्हेंबर –

Chandrakant Dada Patil

Chandrakant Dada Patil

सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना ओबीसीमधे सामविष्ट न करता स्वतंत्र आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. विरोधकांनी मराठा आंदोलनाला हवा देण्याचे काम करू नये, अशा शब्दात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आज सोमवारी विरोधकांना सुनावले. आराक्षणाच्या मुद्यावर विरोधकांनी घातलेल्या गोंधळाने वेळोवेळी सभागृहाचे कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे विधानसभेचे कामकाज पाच वेळा तहकूब झाल्यानंतर सहाव्यांदा दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. ते म्हणाले की, शांततेत सुरू असलेले मराठा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठा आंदोलकांना सरकार का अटक करीत आहे. आंदोलन चिरडून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाचा अहवाल सरकार सभागृहात मांडत का नाही, मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण या सरकारने काढून घेतले, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले.
त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आज २६/११ घटनेच्या अनुषंगाने मुंबईतील वातावरण संवेदनशील असल्याने मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन करू नये. त्यांनी २७ तारखेला मुंबईत आंदोलन करावे, असे सांगण्यात आले होते. सरकार आंदोलन चिरडत नाही, काही लोकांनी या आंदोलनाला हवा देऊ नये.
त्यावर अजित पवार म्हणाले, मागास आयोगाचा आणि ‘टिस’चा अहवाल सभागृहात ठेवा. लोकांच्या भावना तीव्र आहेत. मराठा समाजाला आंदोलनाचा हक्क आहे, आंदोलकांना धरपकड का करता, मुस्लिम आरक्षणाबाबत सभागृहाची दिशाभूल करू नका.
त्यावर भाजपचे आ. आशिष शेलार म्हणाले, राणे समितीचा अहवाल सभागृहात मांडला होता का? कोर्टाने आघाडी सरकारला झापले होते. विरोधक समाजात तेढ निर्माण करीत आहे. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा आरक्षण देणार आहे. विरोधकांचे हे नकाश्रू आहेत. जाणीवपूर्वक विरोधक सभागृहाची दिशाभूल करीत आहेत. यामुळे विधानसभेत गोंधळ वाढल्याने विधानसभा १० मिनिटांसाठी तहकूब करावी लागली. पुन्हा कामकाज सुरू होऊन गोंधळ वाढल्याने विधानसभा १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. या गोंधळात लोकलेखा समितीचा अहवाल, कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. पुरवणी मागण्या आणि विधेयकेही गोंधळात मंजूर करण्यात आली. शेवटी गोंधळ थांबत नसल्याचे लक्षात घेऊन तालिकाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
उद्या विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक
राज्य विधिमंडळात मराठा आरक्षणाचा अहवाल मांडण्यावरून गोंधळ सुरू असतानाच, मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी विधानसभेत, तर गुरुवारी विधान परिषदेत मांडले जाणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी या संदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत, तसेच इतर संलग्न बाबींबाबत प्राप्त अहवालातील शिफारशींवर करावयाच्या सर्व वैधानिक कार्यवाहीसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक सोमवारी विधानभवनात पार पडली. महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे उपस्थित होते.
अहवालातील शिफारशीनुसार, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा अहवाल सभागृहात सादर करण्यावरून विरोधकांनी कामकाज रोखून धरले असतानाच आरक्षणाच्या अहवालावर बुधवारी आणि गुरुवारी चर्चा करू, असे सूचक वक्तव्यही चंद्रकांत पाटील यांनी केले.

Posted by : | on : 27 Nov 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (21 of 435 articles)

Uddhav Thakre
एकत्र आल्यास मंदिर लवकर होईल, अयोध्या, २४ नोव्हेंबर - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी परिवारातील सदस्यांसह अयोध्येत दाखल झाले. ...

×