ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » महाराष्ट्र, विदर्भ » सत्काराचे प्रदर्शन नाही, भावनांचे प्रकटीकरण

सत्काराचे प्रदर्शन नाही, भावनांचे प्रकटीकरण

►संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचे संबोधन
►आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील महिलांचा सत्कार,
यवतमाळ/राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, १२ जानेवारी –

Aruna Dhere

Aruna Dhere

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील महिलांच्या दु:खाचे प्रदर्शन मांडण्यासाठी त्यांचा सत्कार करीत नसून, त्यांच्या जीवनातील घटना लिहिणार्‍यांसाठी प्रेरणा आहेत. आमचे शब्द असले तरी ते आयुष्य तुम्ही प्रत्यक्ष जगत आहात, अशा शब्दांत ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यवतमाळच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. हा सत्कार नसून, कोणत्याही विपरीत परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी आहे, असेही डॉ. ढेरे म्हणाल्या. कार्यक्रमाला यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांची सपत्नीक उपस्थिती होती. तसेच, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे आणि संगीता भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. घरातील कर्त्या माणसाने आणि त्यापाठोपाठ तरण्या मुलांनी आत्महत्या केल्याने खचून गेलेल्या पण, पुढ्यात आलेल्या प्राक्तनाला चिवट संघर्ष देणार्‍या या महिलांच्या कथा ऐकून, डॉ. ढेरे यांचेही डोळे पाणावले.
या महिलांना साडी-चोळी, वैशिष्ट्यपूर्ण चाळणी, ब्लँकेट आणि ग्रामगीता देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यात, तिरझडा गावातील उषा झिटे, शारदा शेंडे आणि नलू शेंडे तर नांझा गावच्या दीपाली मानकर, वनिता वालदे आणि वंदना मेश्राम, आंधबोरी गावच्या मोहिनी भोयर, दोनोडाच्या गोदावरी भोयर, तरोड्याच्या सरिता महल्ले आणि नीलिमा मुनेश्‍वर, कोळी येथील दुर्गा वानखडे, पोडमोहाच्या उज्ज्वला बटाले, गवळा गावच्या वंदना शिंदे, मणकापूरच्या चंदकोटनाके आणि कामठवाड्याच्या सविता भुजाडे यांचा समावेश होता़ या सर्व महिला पती-मुलाच्या क्लेशदायक आणि अवेळी निधनानंतरही केवळ जगतायत असे नाही तर, समाजकार्यातही हिरीरीने सहभागी होत आहेत. साहित्य संमेलनावर कोट्यवधींचा खर्च करण्यापेक्षा, हा पैसा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी खर्च करण्यात यावा, अशी मागणी यवतमाळच्या संमेलनापूर्वी वारंवार करण्यात आली होती, हे विशेष!
अर्ध्या तासात चाळा पोतेभर धान्य
भोसा गावच्या बोधिसत्त्व फाऊंडेशनच्या वतीने, स्टॅण्ड असलेली चाळणी देण्यात आली. पीक हाती आल्यानंतर ते चाळून स्वच्छ करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला तासन्तास काम करतात. परिणामी, पाठ, खांदे आणि मानदुखीचा त्रास होतो. आपल्या आईला होणारा त्रास बघून, १० वर्षाच्या बोधिसत्त्व खंडेरावने कल्पकतेने ही चाळणी तयार केली असून, या संशोधनासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या कार्यक्रमात इयत्ता सहावीत शिकणार्‍या बोधिसत्त्वासह त्याचे आईवडील अमृता-गणेश खंडेराव यांचीही उपस्थिती होती. या चाळणीतून अवघ्या अर्ध्या तासात किमान पोतेभर धान्य चाळून होते आणि त्याचा नक्कीच वापर करणार असल्याचे शेतकरी महिलांनी सांगितले.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : महाराष्ट्र, विदर्भ.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र, विदर्भ (4 of 406 articles)

Marathi Sahitya Sammelan Yavatmal
जोशींनी वृत्त वाहिनीकडे व्यक्त केली खदखद, यवतमाळ/ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, १२ जानेवारी - ९२ व्या अखिल भारतीय साहित्य ...

×