ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » सोलापूर » ..तरीही मोदींनी मार्केट मारले!

..तरीही मोदींनी मार्केट मारले!

Pm Modi Sabha In Solapur

Pm Modi Sabha In Solapur1

►वातावरण निर्मितीत उणीव, पण सभेतील उपस्थिती उत्स्फूर्त,
विजयकुमार पिसे,
सोलापूर, दि. ९ जानेवारी –

Pm Modi Sabha In Solapur

Pm Modi Sabha In Solapur

लातूर आणि सोलापूर येथे दोन मोठे इव्हेंन्ट करण्याचे नियोजन २९ डिसेंबरला प्रदेश भाजपा कार्यालयातून जाहीर झाले. आणि दोन्ही निरोप एकाच वेळी स्थानिक पदाधिकार्यांना पोहोचविले. काल बुधवारी मोदींनी सभा घेऊन सोलापुरातील भाजपा पदाधिकार्यांनी केलेली कसर स्वत: मोदींनीच भरून काढली. याउलट लातूरचा अनुभव होता. अमित शाह यांच्या मराठवाडा विभागीय बैठकीसाठी लातूर ज्या पध्दतीने आणि एकजुटीने एकदिलाने सजले, त्याचा पुरेपुर अभाव सोलापुरात दिसला. तरीही मोदींनी आपली क्रेझ कायम ठेवली. ही भाजपासाठी दिलासा देणारी उजवी बाजू आहे.
लातूर आणि सोलापूर दोन्ही शहरांच्या घटनांना उल्लेख यानिमित्ताने आवर्जून करण्याचे कारण म्हणजे चार महिन्यांच्या अंतराने होणार्या लोकसभेच्या निवडणुका! सोलापुरात मोदींची सभा आणि स्थान नक्की करण्यापासूनचा वाद, संभ्रम. यामुळे सभा होणार की नाही, अशी साशंकता निर्माण झाली. सोलापूरकरांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना मोदींची सभा हवी आहे, ही तीव्र भावना होती. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोरपणे इथल्या मंडळींना सुनावल्यानंतर कसेबसे कामाला लागले. तरीही उणीवा होत्या. कार्यकर्ते सांगत

Pm Modi Sabha In Solapur1

Pm Modi Sabha In Solapur1

होते, अस्वस्थताही होती. तयारीच्या आणि नियोजनाच्या दोन बैठका पार पडल्या. तिथेही हीच स्थिती होती. अशा वेळी प्रदेशाकडून विशेषत: फडणवीसांनी आ. सुजीतसिंह ठाकूर आणि संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांना पाचारण केले असावे. त्यांनी उपस्थित पदाधिकारी व नेत्यांना योग्य शब्दात लक्षात आणून दिले, अखेरच्या नियोजन बैठक़ीत असे चित्र पाहून पुराणिक यांनी तर लातूरच्या तयारीचे आणि अमित शाहा यांच्या बैठकीचे सत्र, याची माहिती येथे अवगत केली आपण कुठे आहोत, हे सोलापूरकर नेते व कार्यकर्ते यांना त्यांनी लक्षात आणून दिले.
आडम मास्तर यांचे मार्केट
बैठकीत पक्षाच्या काही मंडळींनी तर सभा मोदींची, ३० हजार घरकुल भाजपा सरकार मंजूर करतेय, आणि सारे श्रेय आणि मार्केट आडम मास्तर घेतात, याकडे गंभीरपणे लक्ष वेधले. तेव्हा पुराणिक यांनी एक रेष पुसून लहान करण्यापेक्षा त्या ठिकाणी मोठी रेष ओढा, असे मार्मिक उदाहरण देऊन आता वेळ कमी आहे, तयारीला लागा, असे आवाहन केले. आ. ठाकूर यांनी तर बैठकीत व्हेगमध्ये रिपोर्टीग नको, मी पण भाजयुमोचे काम केले आहे. तयारी आणि नियोजन, मोटार सायकल रॅली याविषयीचे रेकॉर्ड तयार करून ठेवा या शब्दात संबंधितांची हजेरी घेतली.
…असे असेल तर?
अशा प्रकारची सोलापूर शहरातील पक्षाच्या कामाची तयारी, नियोजन, उदासीनता असेल आणि मरगळ झटकून काम करण्याची मानसिकता नसेल तर आपण इथं २००९ ची तयारी करत आहोत का? असा सवाल सोलापुरातील भाजपा प्रामणिक आणि निष्ठावंत हितचिंतकांचा आहे. २०१४ मध्ये लाट होती, आता ती लाट असो वा नसो, पण २०१९ साठी काम करण्याचे कठोर आव्हान आपल्यासमोर आहे. म्हटलं तर मोदींची ही सभा आणि त्यासाठीची तयारी ही रंगीत तालीम होती. सोलापुरात बुधवारी मोदींनी मार्केट मारले, म्हणजे अजून त्यांची क्रेझ कायम आहेच. पण शेवटी मोदींवर विसंबून आम्ही निश्‍चिंत राहणार असू तर? २०१४ मध्ये सोलापुरात जे झाले, तेच पुन्हा सोलापुरात घडवण्यासाठी सगळेच एकदिलाने झटतील, आणि मोदींसाठी लोकसभेत एक जागा या मतदारसंघातून नक्कीच पाठवतील अशी अपेक्षा यानिमित्ताने करता येईल.
पंतप्रधान मोदी यांनी अशी भेट दिली, मी मरेपर्यंत विसरणार नाही : आडम
३० हजार घरकुलसाठी प्रयत्नशील असलेले रेनगर फेडरेशनचे संस्थापक तथा माजी आ. नरसय्या आडम म्हणाले, ३० हजार घरकुलांना मंजुरी देऊन पंतप्रधान मोदी यांनी विडी कामगार, अपंग, कचरा वेचणार्या तसेच फूल बनविणार्या गरिब महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा विविध घटकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून आम्ही गेल्या ६० वर्षांपासून स्वप्न पाहात होतो. अखेर हे स्वप्न पंतप्रधान मोदी यांच्यामुळे पूर्णत्वास आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अशी भेट दिली की जे मरेपर्यंत विसरणार नाही.
कॉग्रेंसवर टीका करताना आडम मास्तर यांनी आरोप केला, याआधीच्या राज्य सरकारने ३ वर्षे या योजनेचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला होता, पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी देऊन या योजनेचा मार्ग मोकळा केला. आता १ मे २०२२ ला ही ३० हजार घरे बांधून पूर्ण करुन पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या घरकुलाचे वाटप करण्याचा आमचा संकल्प आहे. या योेजनेबाबत बँक गॅरंटीची अट आहे, मात्र त्याची पूर्तता आम्ही करु शकत नसल्याने अनुदान होते, पण कायद्यात दुरुस्ती झाल्याने ही योजना साकारण्यास मदत होणार आहे. या घराचे लाभार्थी म्हणताहेत की पंतप्रधान मोदी यांनी अशी भेट दिली की जे मरेपर्यंत विसरणार नाही. या योजनेसाठी आणखीन एक अडचण आहे ती म्हणजे अमृत योजनेची. या योजनेला मंज़ुरी देण्याबरोबरच सरकारने लाभार्थ्यांना बँक कर्ज घेण्याऐवजी एक-एक लाखाचे अनुदान वाढवून द्यावे.

Posted by : | on : 10 Jan 2019
Filed under : सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in सोलापूर (3 of 15 articles)

Narendra Modi 16
आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरांचे भूमिपूजन ►सोलापूर-धााराशिव चौपदरी रस्त्यांचे लोकार्पण ►सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे भूमिपूजन, प्रतिनिधी, सोलापूर, दि. ८ जानेवारी- पंतप्रधान नरेंद्र ...

×