ads
ads
जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

जगातील सर्वात मोठ्या एलपीजी पाईपलाईनचे उद्या भूमिपूजन

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – स्वयंपाकाच्या (एलपीजी) गॅसच्या देशातील…

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येच राहणार पाकिस्तान

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक…

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता उद्या

•एकाच वेळी १२ कोटी खात्यात होणार जमा, नवी दिल्ली,…

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

पुलवामा हल्ल्याचा सुरक्षा परिषदेकडून धिक्कार

•जैश-ए-मोहम्मदचा स्पष्ट उल्लेख •भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय, संयुक्त राष्ट्रसंघ, २२…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार

•रक्कम ‘नमामि गंगे’ला समर्पित, सेऊल, २२ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

शिक्षकांना सातवा वेतन आयोग, शासन निर्णय जारी

मुंबई, २२ फेब्रुवारी – महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » सोलापूर » संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल

संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल

►मानाचा वारकरी करणार शासकीय महापूजा;
►पंढरीत १० लाख वैष्णवांचा महापूर,
अतुल बडवे
पंढरपूर, २२ जुलै –

Pandharpur Vaari News Photo 8

Pandharpur Vaari

‘चला पंढरीशी जावू ।
रुक्मादेवी वरा पाहू ॥’
या संतवाणीप्रमाणे न विसरता भाविक प्रत्येक आषाढी-कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत येवून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. यात्रा सोहळ्यासाठी ज्ञानोबा-तुकाराम व विविध संतांच्या पालख्यांसह सुमारे १० लाखाहून अधिक वैष्णवभक्त दाखल झाले आहेत. यामुळे पंढरी नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी तिर्थक्षेत्र आळंदी व देहू येथून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराजांसह सर्व संतांच्या पालख्या २० ते २२ दिवसांच्या पायी प्रवासानंतर पंढरपूरात दाखल झाल्या. पालखी सोहळ्यासोबत लाखो भाविक पंढरीत दाखल झाल्यामुळे भाविकांचा महापुर आला होता. एकादशी सोहळ्यासाठी १० लाखाहून अधिक भाविक पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. विठ्ठल-हरीनामाच्या गजराने पंढरी दुमदुमली आहे. वैष्णवांच्या मादियाळीने भीमा तीर ओसंडून वाहत आहे.
रविवारी वाखरी येथे सर्व संतांच्या पालख्यांच्या भेटी झाल्यानंतर श्रीसंत ज्ञानेश्‍वर माऊली, जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ, सोपानकाका यांच्या पालख्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात पंढरी नगरीत प्रवेश केला. संत नामदेव महाराज व संत मुक्ताबाई यांच्या पालख्यांनी संतांना पंढरीत आणले. पंढरीच्या वेशीवर संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले.
वाखरी येथून पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. यावेळी माऊलींची पालखी मानाच्या भाटे यांच्या रथात ठेवण्यात आला. हा रथ ओढण्याचा मान वडार समाजाला आहे. विसावा विठ्ठल मंदिर येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्यातील उभे रिंगण उत्साहात पार पडले. यानंतर श्रीमंत शितोळे सरकार यांनी गळ्यात माऊलींच्या पादुका घेवून त्या पंढरपूरपर्यंत माऊली मंडपात आणल्या.
पंढरपूरात भाविकांचा महापुर आला. सर्व रस्ते गर्दीने फुलुन गेले आहेत. श्रीविठ्ठलाच्या नामघोषाने व टाळमृदुंगाच्या गजराने पंढरी दुमदुमुन गेली आहे. पंढरीत दाखल झालेले २ लाखाहून अधिक भाविक श्रीविठ्ठलाच्या पददर्शनासाठी रांगेत उभे आहेत. श्रीविठ्ठलाची पददर्शन रांग विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढे पोहचली आहे. पददर्शनासाठी १८ ते २० तास तर मुखदर्शनासाठी ६ ते ८ तास वेळ लागत आहेत. श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने भाविकांना सायीसुविधा देण्यासाठी नियोजन केले आहे. भाविकांना उन, पाऊस याचा त्रास होवू नये म्हणून संपूर्ण दर्शन रांगेवर प्लॉस्टिक कागदाचे छत लावण्यात आले आहे. यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिर, तुकाराम भवन, ज्ञानेश्‍वर दर्शन मंडपावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी आरोग्यकेंद्रे उभी करण्यात आली आहेत. याठिकाणी भाविकांना २४ तास औषधोपचार करण्यात येणार आहेत. जीवनावश्यक वस्तुचे दर वाढल्यामुळे पंढरीत सर्वच वस्तु महाग मिळत आहेत. त्यामुळे भाविकांना आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. टाळ, मृदुंगाच्या गजराने व भगव्या पताकाने पंढरी नगरी नटली आहे.
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने भाविकांना दशमी, एकादशी, द्वादशी दिवशी चहा, पिण्याचे पाणी व फराळाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. प्रशासनाने यंदा चंद्रभागा नदीपलिकडील ६५ एकरात भाविकांची राहण्याची सोय केली आहे. ५०० प्लॉट भाविकांना वाटप करण्यात आले असून चांगल्या सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ५ लाखाहून अधिक भाविक उतरले आहेत. शहरापेक्षा नाक्याबाहेर राहण्याकडे भाविकांचा कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.
मानाच्या वारकर्‍यांच्या हस्ते होणार महापूजा
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महापुजेस न येण्याचा निर्णय घेतला असून मानाच्या वारकर्‍यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याची घोषणा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केली.
जिल्हाधिकार्‍यांनी तळ ठोकला
भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी पंढरपुरात पहिल्यांदाच तळ ठोकून सोयी-सुविधांची पाहणी करत आहेत. त्रुटी जाणवल्यास त्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
कृष्णा ट्रस्टच्या २ हजार स्वयंसेवकांचे मार्गदर्शन
आषाढी यात्रा कालावधीत १० ते १२ लाख भाविक येत असल्यामुळे पंढरीत मोठी गर्दी होते. भाविकांना विविध ठिकाणांची माहिती देण्यासाठी व वैद्यकीय उपचार करण्यासाठी कराड येथील कृष्णा ट्रस्टचे २ हजार स्वयंसेवक, ५०० जणांचे वैद्यकीय पथक पंढरीत दाखल झाले आहेत. या उपक्रमाचे भाविकांतून स्वागत होत आहे.

Posted by : | on : 23 Jul 2018
Filed under : सोलापूर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in सोलापूर (8 of 15 articles)

Navi Peth Solapur Police Security
पोलीस छावणीचे स्वरूप, प्रतिनिधी, सोलापूर, दि.८ जुलै- खून का बदला खून या प्रकारातील शनिवारी रात्री नवी पेठ येथे झालेल्या सचिन ...

×