ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » महाराष्ट्र » स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
►साहित्य संमेलनाचे सूप वाजले,
यवतमाळ/ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, १३ जानेवारी –

Nitin Gadkari1

Nitin Gadkari1

देशात लोकशाहीचे संरक्षण व्हायलाच हवे. समाजातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. त्यांच्यात मतभिन्नता असू शकेल, मात्र मतभिन्नता नसावी. या मूल्यांनीच भारतीय संस्कृती सुदृढ आहे. या पृष्ठभूमीवर, राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नव्हे, असे सांगतानाच स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग, जहाजबांधणी आणि नद्या शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी, मंचावर संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, यवतमाळचे पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार, संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या देवधर, महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
आत्महत्याग्रस्तांचे ‘प्रोजेक्शन’ नको
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त असल्यांचे ‘प्रोजेक्ट’ करून काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा, शेती शाश्‍वत आणि उत्पादन देणारी कशी होईल? शेतीची सिंचनक्षमता ५० टक्क्यांपर्यंत कशी वाढेल? यावर लक्ष केंद्रित करून काम करण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या समस्यांचे समूळ उच्चाटन करावयाचे असेल तर, पेट्रोल-डिझेलला इथेनॉलचा पर्याय तयार करावा आणि इथेनॉल निर्मितीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे किंवा दुर्गा भागवत यांच्या कार्याचा गौरव करताना गडकरी म्हणाले की, त्यांनी कधी राज्यसभेवर खासदारकी मागितली नाही. लोकतांत्रिक मूल्यांकरिता सहकार्य, समन्वय आणि संवादाची गरज असते. जिथे संवाद संपतो तिथे वितंडवाद सुरू होतो आणि हे कोणत्याही संस्थात्मक कार्यासाठी घातक ठरू शकते, असेही ते पुढे म्हणाले. ऐन वेळी संमेलनाच्या उद्घाटनासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला वैशाली येडे यांना आमंत्रित करणे, हा योग्य आणि चांगला निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात राहुल एकबोटे यांनी गायलेल्या ‘इवलेसे रोप लावियले दारी’ या गाण्याने झाली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे, यवतमाळमधील ज्येष्ठ लेखक आणि निवृत्त प्राचार्य द. तु. नंदापुरे, चित्रकार रवींद्र क्षीरसागर आणि सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम दरणे यांनी केले. प्रचंड गर्दीत पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले. अनेक वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण झाले असून, त्यासाठी शेकडो खंदे कार्यकर्ते सोबत उभे राहिले. अशा एकत्रित प्रयत्नांतून हे संमेलन कसे उंचीवर गेले आहे, याचा प्रत्यय ‘मोगरा फुलला’ या गाण्यातून आल्याचे त्यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी संमेलनाचे आयोजन अतिशय देखणे झाले असून, स्थानिक कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. तसेच, यवतमाळात संमेलनाचे आयोजन करण्याचे धाडस दाखवून आणि यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी संस्कृतीचे दर्शन आणि मराठीचे वैभव या संमेलनाने वाढवले आहे. तसेच, गेल्या चार महिन्यांपासून हजारो हात संमेलनाच्या आयोजनात गुंतले आहेत. जनतेचे आदरातिथ्य आणि रसिकतेचा परिचय देत, यवतमाळ ही सांस्कृतिक भूमी असल्याचे सिद्ध झाल्याचे मत व्यक्त केले. महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या देवधर म्हणाल्या की, निषेधाचा सूर उमटला तरीही काही लोकांनी बहिष्कार मागे घेऊन संमेलनात सक्रीय सहभाग घेतला, हेच या संमेलनाचे यश आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. घनश्याम दरणे यांनी केले.
म्हणून ऐतिहासिक!
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिकाची निवडणूक नव्हे तर त्यांची सन्मानपूर्वक निवड करण्याचा मार्ग महामंडळाच्या घटनादुरुस्तीने मोकळा झाला. नव्या तरतुदींनुसार, संमेलनाध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या डॉ. अरुणा ढेरे या पहिल्या संमेलनाध्यक्षा ठरल्या. तसेच, महामंडळाच्या अध्यक्षांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे सूत्रे उपाध्यक्षा डॉ. विद्या देवधर यांच्याकडे आली. नियोजित उद्घाटकांच्या येण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर, स्थानिक एकल महिला वैशाली येडे यांना उद्घाटनाचा मान मिळाला. संमेलनातील तिन्ही प्रमुख पदांवर महिलाच आरूढ होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ होती.
बहिष्कार निष्प्रभ, रसिकांची प्रचंड गर्दी
यवतमाळकरांनी बहिष्काराचे कोणतेही दडपण न मानता प्रचंड गर्दी केली. अनावश्यक खर्च टाळून, सर्वजण मनापासून एकत्र आले तर काय चमत्कार घडू शकतो, हे या संमेलनाने दाखवून दिले. सौजन्यशीलता, सुसंस्कृतपणा आणि एकत्र येण्याचा आग्रह यवतमाळकरांनी सोडला नाही. बहिष्काराचे आव्हान दुर्लक्षून अनेक साहित्यिक आले. यामागे, मुख्य प्रेरणास्रोत कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते आहेत. या शिक्षकाने माणसे उभी करण्याचे मोठे काम केले, असे मनोगत डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रंथांना नवी पिढीपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच, डिजिटल ग्रंथालय गावागावात उघडली जावीत, असेही त्यांनी नमूद केले.

Posted by : | on : 14 Jan 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (2 of 406 articles)

Kishore Pradhan
१२ जानेवारी - मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे शुक्रवारी ...

×