ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » महाराष्ट्र » १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू

१ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू

►राज्य सरकारची विधान परिषदेत घोषणा,
मुंबई, ३० नोव्हेंबर –

Devendra Fadanvis Scetch

Devendra Fadanvis Scetch

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना येत्या १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, अशी घोषणा अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केली. या घोषणेमुळे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना हे वर्ष संपण्याआधीच नववर्षाची भेट मिळाली आहे.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याची सरकारकडे वारंवार मागणी होऊनही सरकारने कुठलेही उत्तर दिले नाही. गणपती गेले, दिवाळीही गेली. आता तरी सरकारने राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात मांडली. राज्यातल्या शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रश्‍न कपील पाटील यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. याला केसरकर यांनी उत्तर दिले.
सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सरकारकडे येईल. त्यानंतर या अहवालातील शिफारशी स्वीकारून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल. यावर बक्षी समितीचा अहवाल केव्हा प्राप्त होणार असा सवाल विरोधकांनी केला. तेव्हा बक्षी समितीचा अहवाल यायला विलंब झाला तरीही येत्या १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबाजवणी करण्यात येईल अशी घोषणा केसरकर यांनी केली.
४ ऑगस्ट रोजीच घोषणा
राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना २०१७ मधील थकीत महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ ऑगस्ट रोजीच घोषित केला होता. यासंदर्भातील माहिती अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात शुक्रवारी विधान परिषदेत दिली. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्धारित तारखेपासूनच (जानेवारी २०१६) सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. पण सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या. त्या त्रुटींसंदर्भात सुनावण्या घेण्याचे काम करण्यासाठी शासनाने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच अहवाल शासनास सादर करू, असे बक्षी यांनी आपणास कळविले आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांना चांगली वेतनवाढ देणारा सातवा वेतन आयोग निर्धारीत तारखेपासून लागू करण्यास शासन कटिबद्ध आहे. पण या सर्व प्रकियेस काही कालावधी लागणार असल्याने कर्मचार्‍यांसाठी वेतनलाभ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार केंद्र शासनाच्या वेतन निश्‍चितीच्या सूत्रानुसार जानेवारी २०१९ पासून वेतनलाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच महागाई भत्त्याची १४ महिन्यांची थकबाकी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबींसाठी अंदाजे ४ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान २९ हजार
राज्य सरकारी कंत्राटी कर्मचार्‍यांना किमान २१ हजार रुपये वेतन लागू करण्याची मागणीही कपील पाटील यांनी केली. यावर सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कर्मचार्‍यांना २९ हजार रुपयांहून अधिक वेतन मिळेल, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची मागणीही विरोधकांनी केली. मात्र, याप्रकरणी खटुआ समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (82 of 439 articles)

Shiv Sena Mla Vijay Auti
निवड, मुंबई, ३० नोव्हेंबर - गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदावर दीर्घ प्रतीक्षेनंतर शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची आज ...

×