ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » महाराष्ट्र » ४५ जागा द्या, घुसखोरांना हाकलू

४५ जागा द्या, घुसखोरांना हाकलू

•शरद पवार व काँग्रेसने शेतकर्‍यांना काय दिले?
•अमित शाह यांचे खुले आव्हान,
पुणे, ९ फेब्रुवारी –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

केंद्र सरकारने देशभरातील अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. अनेक वर्षे पवार देशाचे कृषी मंत्री होते, या काळात त्यांनी शेतकर्‍यांना काय दिले, हे सांगावे आणि तसे रेकॉर्डही सादर करावे, असे थेट आव्हान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे दिले. उत्तरप्रदेशात आम्ही ७३ ऐवजी ७४ जागा जिंकू, पण ७२ होऊ देणार नाही. तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून द्या, जे घुसखोर आहेत आम्ही त्यांना पळवून लावू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे अमित शाह यांनी पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्तिकेंद्र प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात महाआघाडी केली जात आहे. हे कसले गठबंधन, हे तर सर्व राज्यनेते आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुरात ममता बॅनर्जी यांची सभा झाली, अखिलेशला धुळ्यात बोलावले तर कोणी ऐकायला जाणार आहेत का, अशा शब्दात अमित शाह यांनी महाआघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली.
एकमेकांचे राजकीय वैरी असलेले हे सर्व पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. अशाप्रकारची महाआघाडी सत्तेत आल्यास देश अनेक वर्षे मागे जाईल आणि काँग्रेसवाले जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करेल, असे सांगताना विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्या महाआघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे आहेत आणि राज्यात १५ वर्षे त्यांच्या पक्षाचे सरकार होते. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्टाचार नष्ट केला, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधले.
राहुलबाबा आगर्‍यात जाऊन म्हणाले की, शेती करू… त्यांना बटाटा कारखान्यातून येतो असे वाटले. बटाटा जमिनीवर पिकतो की जमिनीखाली, हेच त्यांना माहिती नाही. त्यांनी आधी कृषी क्षेत्राविषयी समजून घ्यावे आणि बोलावे. राहुल गांधी यांनीही, केंद्राच्या कृषी सन्मान योजनेवर टीका केली. या रकमेचा त्यांनी मासिक हप्ता काढला. मग, त्यांच्या काँगे्रसने शेतकर्‍यांना मागील ५५ वर्षांत काय दिले, हे तरी त्यांनी सांगावे. आम्ही जवानांसाठी वन रँक वन पेन्शन (ओआरओपी) लागू केली. काँग्रेससाठी मात्र ‘ओन्ली राहुल… ओन्ली प्रियंका’ आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नेत्यांचा नाही. नेत्यांच्या जीवावर निवडणूक कधीच जिंकता येत नाहीत. बुथची रचना आणि बुथवरील कार्यकर्ते हेच भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे रहस्य आहे. देश सध्या निर्णायक वळणावर आहे. मोदी सरकारने जातीचे राजकारण करणार्‍या पक्षांना दूर केले आहे. मागील पाच वर्षांत सरकारने फक्त विकासावर भर दिला आणि पुढेही विकासाच्या मार्गावरच प्रवास करणार आहोत, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
राम मंदिर होणार
अयोध्येत जिथे भगवान रामाचा जन्म झाला, त्याच जागेवर रामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी भाजपा वचनबद्ध आहे. या मुद्यावरून आम्ही बाजूला झालो नाही. सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा प्रलंबित असल्याने आम्ही थांबलो आहोत, असे सांगताना जन्मभूमीतच राम मंदिर व्हायला हवे की नाही, हे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
४३ वी जागा बारामतीची : मुख्यमंत्री
यावेळी बोलताना वयासपीठावर बसलेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, गेल्यावेळी युतीने राज्यात ४२ जागा जिंकल्या होत्या, यावेळी ४३ जागा जिंकू आणि ही ४३ वी जागा बारामतीची असेल.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (46 of 480 articles)

Bus
प्रदूषण नियंत्रणात येणार •तिकिटाचे दरही कमी राहणार, पुणे, ९ फेब्रुवारी - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी २५ इलेक्ट्रिक ...

×