ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » महाराष्ट्र » ८० टक्के शेतकर्‍यांना ‘कृषी सन्मान’चा लाभ

८० टक्के शेतकर्‍यांना ‘कृषी सन्मान’चा लाभ

•राज्याला ७२०० कोटी मिळणार,
मुंबई, ७ फेब्रुवारी –

Chandrakant Dada Patil

Chandrakant Dada Patil

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ राज्यातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकर्‍यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षभरात ७२०० कोटी रुपये जमा होणार असून, योजनेसाठी शेतकर्‍यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज गुरुवारी येथे दिली.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ही योजना राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गरजू शेतकर्‍याला त्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
२०१५-१६ मध्ये झालेल्या कृषिगणनेनुसार राज्यात १ कोटी ५२ लाख ८५ हजार ४३९ शेतकरी आहेत. कोकण विभागात १४ लाख ८६ हजार १४४ शेतकरी आहेत, त्यापैकी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी संख्या ८४.५० टक्के एवढी आहे. नाशिक विभागात २६ लाख ९४ हजार ४८१ शेतकरी असून, त्यापैकी ७८ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्पभूधारक आहेत. पुणे विभागात ३७ लाख २३ हजार ६७३ पैकी ८४ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. औरंगाबाद विभागात ३९ लाख ५३ हजार ४०० शेतकर्‍यांपैकी ७९.५० टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकर्‍यांची संख्या १९ लाख १३ हजार २५८ असून, ७३ टक्के अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी आहेत आणि नागपूर विभागातील १५ लाख १४ हजार ४८३ शेतकर्‍यांपैकी ७६ टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक गटातील आहेत.
ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या १८ वर्षाखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल, अशा कुटुंबाना सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्याचा तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्‍चित करण्यासाठी कृषी विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
संवैधानिक पद धारण करणारे/केलेले आजी व माजी व्यक्ती, आजी/माजी मंत्री/ राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/ राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी (चतुर्थश्रेणी/गड-ड वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन १० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट), इ. क्षेत्रातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्रतेचे निकष केंद्र शासनाने निश्‍चित केले आहेत.
एखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये चार किंवा पाच उपकुटुंब असतील आणि त्यातील प्रत्येकाच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असेल, तर त्या उपकुटुंब प्रमुखालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येतील.
राज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकर्‍यांची संख्या ८० टक्के म्हणजे जवळपास एक कोटी २० लाख एवढी असून, त्यातील निकषास पात्र शेतकर्‍यांना या योजनेंतर्गत वर्षभरात ७२०० कोटी रुपये मिळणार आहेत. गरजू शेतकर्‍यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : महाराष्ट्र.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in महाराष्ट्र (7 of 439 articles)

Anna H
यशस्वी शिष्टाई, सहा तास चालली बैठक, राळेगण सिद्धी, ५ फेब्रुवारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुमारे सहा तास चाललेल्या बैठकीनंतर ...

×