ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » काश्मिरात सहा अतिरेक्यांचा खातमा

काश्मिरात सहा अतिरेक्यांचा खातमा

►एक जवानही शहीद
►७२ तासांत १८ अतिरेकी ठार,
श्रीनगर, २५ नोव्हेंबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी सकाळी एका भीषण चकमकीत लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदिनच्या सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले. यात लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, चकमकीत सापडल्याने एका नागरिकाचाही मृत्यू झाला.
शोपियॉं जिल्ह्यातील हिपुरा बाटागुंड गावात काही अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास या गावाला धडक दिली आणि अतिरेकी लपले असलेल्या घराला वेढा दिला. रात्रभर जवानांनी हा वेढा कायम ठेवला. सकाळी जवानांना पाहताच अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यावेळी झडलेली भीषण चकमक काही तासपर्यंत सुरू होती, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
अतिरेक्यांच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले, तथापि उपचार सुरू असताना एका जवानाचा मृत्यू झाला. नाझिर अहमद असे या जवानाचे नाव असून, अन्य एका जखमी जवानाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे प्रवक्ता म्हणाला.
अतिरेक्यांचा हल्ला परतावून लावताना जवानांनी केलेल्या गोळीबारात सहा अतिरेकी ठार झाले. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याजवळ शस्त्र व स्फोटकांचा प्रचंड मोठा साठाही आढळून आला, असे प्रवक्त्याने सांगितले.
एक नागरिक ठार, चार जखमी
चकमक सुरू असताना, अतिरेक्यांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आले होते. काही लोकांनी चकमकीच्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला असता, पाच जण गोळी लागल्याने जखमी झाले. यातील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. चकमक सुरू असताना जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
नागरिकांनी जवानांवर दगडफेकही केली. त्यांना पांगविण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार करतानाच बळाचाही वापर केला. दुपारी उशिरापर्यंत नागरिक या परिसरात जवानांच्या विरोधात आंदोलन करीत होते.
पुलवामात जैशचा अतिरेकी ठार
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज रविवारी जैश-ए-मोहम्मदच्या एका अतिरेक्याला ठार केले. वासीम असे त्याचे नाव असून, त्याच्याजवळून एके ४७ रायफल आणि जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली. तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे त्याच्याजवळील कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
७२ तासांत १८ अतिरेकी ठार
गेल्या ७२ तासांत जवानांनी १८ अतिरेक्यांना ठार केले आहे. शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागात झालेल्या चकमकीत सहा अतिरेकी ठार झाले होते. गुरुवारी दोन आणि शनिवारी चार अतिरेक्यांना ठार मारण्यात आले होते.

Posted by : | on : 26 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (175 of 731 articles)

Pm Modi Rally Allahabad
मोदींचा कॉंगे्रसवर हल्ला, छत्तरपूर, २४ नोव्हेंबर - आतापर्यंत मला शिव्या देऊन झाल्या, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. आता तर ...

×