ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » केरळ, राज्य » केरळ सरकारने शबरीमलैला युद्धभूमी बनवली

केरळ सरकारने शबरीमलैला युद्धभूमी बनवली

विश्‍व हिंदू परिषदेचा आरोप,
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –

India Vishwa Hindu Parishad Vhp

India Vishwa Hindu Parishad Vhp

केरळमधील विजयन् सरकार अय्यप्पा भक्तांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत असून, शबरीमलैमध्ये काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. तसेच, या पवित्र ठिकाणाला युद्धभूमीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत आहे, असा स्पष्ट आरोप विश्‍व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी केला आहे. दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शबरीमलै येथे असे दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे की, तिथे अय्यप्पा भक्तांना जाण्यास भीती वाटावी. शबरीमलै येथे नामजप करणेही आता गुन्हा झाला आहे, असे ते म्हणाले.
डॉ. जैन म्हणाले की, मुस्लिमशासक आदिलशाहने काश्मीरला हिंदुविहीन राज्य बनवण्याचा प्रयत्न चालवला होता. हीच स्थिती सध्या केरळ राज्यात दिसून येते. येथील सरकार आपल्या सत्तेच्या बळावर अयप्पा भाविकांवर लाठीकाठ्या चालवत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आड हा सर्व प्रकार सुरू असून अतिशय निंदनीय आहे, असे ते यावेळी म्हणाले.
स्थानिक प्रशासन सरकारच्या आदेशावरून शबरीमलैमध्ये भाविकांना सुविधा पुरवण्याऐवजी विविध प्रकारे अडचणी निर्माण करीत आहे. मंदिरातील पूजा ही सकाळच्या वेळी करावी लागते. त्यामुळे अगोदरच्या रात्री तेथे उपस्थित असणे गरजेचे असते. मात्र, परिसरात मुक्कामासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. तसेच, शौचालयासारखी प्राथमिक सोयही नाही. भाविकांना होत असलेल्या या सर्व असुविधांबद्दल मुख्यमंत्री विजयन यांनी समस्त नागरिकांची माफी मागावी, अशी मागणीही डॉ. जैन यांनी केली.
कलम १४४ संबंधी त्यांनी सांगितले की, शबरीमलै मंदिर परिसरात दंगल वा अन्य कोणत्याही घातक प्रकाराची शक्यता नसताना वा कोणताही अय्यप्पा भक्त दहशतवादी नसताना प्रशासनाने कोणत्या कारणांमुळे याठिकाणी जमावबंदीचा आदेश दिला? याबाबत सरकारने तातडीने स्पष्टीकरण द्यावे. याशिवाय भाविकांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केली आहे. या संपूर्ण प्रकारातून मंदिर क्षेत्राला जसे वॉर झोन अर्थात युद्धभूमीमध्ये परिवर्तित केले असल्याची टीका त्यांनी केली.
केरळ सरकारचा हा संपूर्ण व्यवहार पाहता केंद्र सरकारने शबरीमलै प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करायला हवा. मानवाधिकार आयोगाने या राज्यात पाठवलेल्या प्रतिनिधिमंडळाने अहवाल अतिशीघ्र सादर करावा. विजयन् सरकार घटनेचा अनादर करीत असून अय्यप्पा भाविकांच्या भावनांना पायदळी तुडवत आहे. आताही ही लढाई धर्मविरुद्ध सरकार अशी झाली आहे. कारण भारतीय राज्यघटनेने देशातील सर्वधर्मीयांना आपल्या भावनांनुसार पूजाअर्चाचा अधिकार प्रदान केलेला आहे. अय्यप्पा भक्तांना संपूर्ण देशवासीयांचा पाठिंबा असून केरळच्या डाव्या सरकारने त्यांच्यावरील अत्याचार बंद करावेत, अन्यथा विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने देशव्यापी आंदोलन करण्यात येईल. तसेच, देशभरातील साधुसंत शबरीमलैमध्ये धडक देतील, असा इशाराही डॉ. सुरेंद्र जैन यांनी दिला.

Posted by : | on : 22 Nov 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (32 of 705 articles)

Akshay Kumar
४२ प्रश्‍नांचा भडिमार, चंदीगड, २१ नोव्हेंबर - शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान आणि कोटकपुरा तसेच बेहबलकला गोळीबाराची चौकशी करणार्‍या एसआयटीने (विशेष ...

×