ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » घोडेबाजारामुळे विधानसभा बरखास्त

घोडेबाजारामुळे विधानसभा बरखास्त

►जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा,
जम्मू, २२ नोव्हेंबर –

Satypal Malik

Satypal Malik

जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट करीत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी, येथे सुरू झालेल्या घोडेबाजारामुळे विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांना स्थिर सरकार स्थापन करणे अशक्य असल्यानेच हा निर्णय घ्यावा लागला, असे आज गुरुवारी स्पष्ट केले.
राज्याच्या हितासाठी आणि घटनेप्रमाणे हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्राच्या इशार्‍यावर काम करीत असल्याचा आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले की, सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा आणि अब्दुल गनी लोन यांच्या जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सला पाचारण करणे शक्य होते. ज्यांना न्यायालयाचे दार ठोठवायचे आहे, ते ठोठावू शकतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू असल्याची माहिती मागील १५ ते २० दिवसांपासून मला मिळत होती. काही आमदारांना धमकावले जात होते आणि काही विशिष्ट प्रकारची सौदेबाजीही केली जात होती, असे त्यांनी राजभवन येथे प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सांगितले.
आमच्या आमदारांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून धमकावले जात आहे, असे मेहबुबा मुफ्ती यांनी मागील आठवड्यात सांगितले, तर दुसर्‍या बाजूने आमदारांना मोठ्या प्रमाणात पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. २० दिवसांपूर्वी येथे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू झाला, असे त्यांनी सांगितले. सरकार स्थापन करण्यासाठी कुणालाही संधी दिली असती, तरी येथे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला असता. राजकीय व्यवस्थेचे मूल्य उद्ध्वस्त होऊन राज्यभरात गोंधळ निर्माण झाला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशा स्थितीत राज्याला अस्थिर सरकार मिळाले असते. त्यामुळे विधानसभा बरखास्त करून ही परिस्थिती टाळण्यात आली. संधिसाधू सत्तेत आले असते, तर संवेदनशील राज्यात अस्थैर्य निर्माण झाले असते, असेही त्यांनी सांगितले.
नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि कॉंग्रेसच्या भांडणात राज्यात आणखी गोंधळ वाढला असता. यामध्ये माझे कोणतेही वैयक्तिक हित नव्हते. केवळ राज्याचे हित सर्वोच्च मानून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
म्हणून मेहबूबांसोबत : ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मिरात निर्माण झालेला गोंधळ आणि अनिश्‍चितता संपवण्यासाठी सत्तेचा दावा केलेल्या प्रतिस्पर्धी पीडीपीच्या आम्ही पाठीशी आहोत, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या घोडेबाजाराच्या दाव्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पाकिस्तानच्या आदेशावरूनच पीडीपीसोबत सत्ता स्थापण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स समोर आली, हा भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी केलेला दावा सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
लवकर निवडणूक घ्या : कॉंग्रेस
नवी दिल्ली – लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. राज्य विधानसभा बरखास्त करण्याच्या राज्यपाल मलिक यांच्या निर्णयावरही कॉंग्रेसने टीका केली.
कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले की. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे पर्यायाने केंद्राचे शासन राज्यातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे लोकशाहीची पुनस्थार्पना करण्यासाठी राज्यात लवकरात लवकर निवडणूक घेतली पाहिजे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसने कोणत्याच पक्षाला पाठिंब्याचे पत्र दिले नव्हते, असे सुर्जेवाला यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील ताज्या घटनाक्रमावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. मात्र, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, ते समजू शकले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील ताज्या राजकीय घडामोडींची माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आजच्या विषयपत्रिकेवर जम्मू-काश्मीरचा विषय नव्हता. मात्र, त्याबाबतची माहिती बैठकीत देण्यात आली, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. परंतु, जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली वा नाही, झाली असल्यास काय चर्चा झाली, हे सांगण्यास जेटली यांनी नकार दिला.

Posted by : | on : 23 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (40 of 716 articles)

Ram Madhav
दिल्ली, २२ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त करण्याच्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निर्णयानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव तसेच जम्मू-काश्मीरचे प्रभारी राममाधव ...

×