ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त

जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त

►सत्ता स्थापण्याच्या दावे-प्रतिदाव्यांचा नाट्यमय शेवट,
श्रीनगर, २१ नोव्हेंबर –

Satypal Malik

Satypal Malik

बुधवारी सायंकाळी सुरू झालेल्या उलाढालीनंतर, सरकार स्थापन करण्यासाठी करण्यात आलेल्या दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभाच बरखास्त केली. राज्यपालांच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचा सर्वच पक्षांचा मार्ग आता खुंटला आहे आणि लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
आज सर्वप्रथम पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला होता. पीडीपीच्या नेतृत्वात आणि नॅशनल कॉन्फरन्स व कॉंग्रेस यांच्या सहकार्याने सत्ता स्थापन करण्याबाबत या तिन्ही पक्षांमध्ये सहमती झाली होती. उद्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन आघाडीची अधिकृत घोषणा केली जाणार होती. दुसरीकडे पीडीपीमध्ये मुजफ्फर हुसेन बेग आणि इम्रान अंसारी यांनी बंडाचा झेंडा फडकाविला होता. इम्रान अंसारी यांनी आपल्या बाजूने १८ आमदार असल्याचे सांगून आपणही सरकार स्थापन करण्यासाठी दावा सादर करण्याचे जाहीर केले होते, तर बेग यांनी दुपारीच तिसरी आघाडी स्थापन झाल्यास आपण त्यात सहभागी होऊ, असे जाहीर केले होते.
दरम्यान, पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांनीही भाजपाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपलाही दावा सादर केला होता. भाजपाचे आमदार आणि आणखी १८ आमदार आपल्याला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या सार्‍या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात नेमके कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले असताना राज्यपाल मलिक यांनी मोठे पाऊल उचलून विधानसभाच बरखास्तीची घोषणा केली.
२०१४ साली निवडणूक झाल्यानंतर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) राज्यात भाजपाच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली होती. मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रिपदी आरुढ झाल्यानंतर होत्या. अलिकडेच भाजपाने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत भाजपाला शह देण्यासाठी विरोधी पक्ष- कॉंग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याची तयारी केली होती. असे झाले असते तर तब्बल १६ वर्षांनंतर कॉंग्रेस, पीडीपी आणि एनसी यांचे सरकार सत्तेवर येणार होते. भाजपाने मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर १६ जून रोजी सरकार पडले. जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ८७ जागांपैकी पीडीपीकडे २८, भाजपा २५, एनसी १५, कॉंग्रेस १२ आणि इतरांकडे सात जागा होत्या. पीडीपी व पीपल्स कॉन्फरन्सचे दावे-प्रतिदावे, तसेच बंडखोरांची भूमिका पाहता राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताची शक्यता अंधुक दिसत होती. या सार्‍या पृष्ठभूमीवर राज्यपाल मलिक यांनी सेक्शन ५३ चा उपयोग करीत विधानसभा बरखास्त करून नवीन विधानसभा स्थापनेचा मार्ग मोकळा केला.
जम्मू-काश्मीरच्या कायद्याप्रमाणे राज्यपाल राजवट एका विशिष्ट कालावधीपर्यंतच ठेवता येते, त्यानुसार सध्या सुरू असलेल्या राज्यपाल राजवटीचा कालावधी १९ डिसेंबरपर्यंत राहणार होता. तोपर्यंत विधानसभा निवडणुकीसंदर्भात ठोस निर्णय झाला नसता तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली असती. परंतु, आता विधानसभा बरखास्त झाल्यामुळे नव्या विधानसभेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे १९ डिसेंबरपर्यंत निवडणुका झाल्या नाहीत तर, तिथे राष्ट्रपती राजवट लागू होईल की, राज्यपाल राजवटच सुरू राहील, याबाबतीत विविध मते व्यक्त होत आहेत.

Posted by : | on : 22 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (42 of 716 articles)

India Vishwa Hindu Parishad Vhp
हिंदू परिषदेचा आरोप, नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर - केरळमधील विजयन् सरकार अय्यप्पा भक्तांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत असून, शबरीमलैमध्ये ...

×