ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » दहशतवाद सोडून सैन्यात गेला, देशासाठी शहीद झाला

दहशतवाद सोडून सैन्यात गेला, देशासाठी शहीद झाला

►संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार,
काश्मीर, २७ नोव्हेंबर –

Nazir Ahmad Wani Army

Nazir Ahmad Wani Army

दहशतवादी म्हणून ठार मारण्यात आल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट अनाथासारखी लावली जाते, त्या प्रेताची हेळसांडही केली जात. याऊलट देशासाठी वीरमरण प्राप्त झाले तर त्याचा संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केला जातो, पार्थिवाला पूर्ण सन्मान दिला जातो. हे भाग्य, अतिरेक्याचा सैन्यातील शिपायी झालेल्या काश्मीर युवकाला लाभले आहे.
आधी दहशतवादी असलेला हा युवक सैन्यदलात दाखल झाला. एवढेच नव्हे तर त्याने अनेक कारवायांमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अखेर लढता लढता देशासाठी तो शहीद झाला. थक्क करून टाकणारी ही सत्यकथा आहे शोपियाँच्या चकमकीत शहीद झालेल्या नाझीर अहमद वाणी याची. सोमवारी नाझीरवर दक्षिण काश्मीरमधील त्याच्या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला २१ तोफांची सलामीही देण्यात आली.
नाझीर अहमद वाणी हा कुलगाम जिल्ह्यातील चेकी तालुक्यातील अश्मुजी गावचा रहिवासी होता. या परिसरात दहशतवाद भरपूर फोफावला आहे. ऐन तारुण्यात वाणी दहशतवाद्यांना सामील झाला होता. आपल्याच देशविरोधात कारवाई करत होता. पण नंतर त्याला दहशतवादाचा फोलपणा लक्षात आला. हिंसाचाराने स्वातंत्र्य मिळणार नाही तर आपलेच नुकसान होणार आहे, हे वाणीला जाणवले. त्याने लगेच दहशतवादाला रामराम केला आणि तो भारतीय लष्करात दाखल झाला. अनेक दहशतवाद विरोधी हल्ल्यांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २००७ मध्ये त्याला शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते.
३८ वर्षांचा नाझीर वाणी रविवारी शोपियाँमध्ये गेलेल्या सैन्याच्या चमूत होता. या चमूनेही सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पण, दहशतवाद्यांशी लढता लढता नाझीरला गोळ्या लागल्या. तो गंभीर जखमी झाला. त्याला लगेच शोपियाँच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या मागे एक पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. नाझीरच्या निधनामुळे खूप मोठे नुकसान झाले, अशी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Posted by : | on : 28 Nov 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (170 of 731 articles)

Rehana Fathima
: धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, कोची, २७ नोव्हेंबर - गेल्या महिन्यात शबरीमलै मंदिराचे दार उघडण्यात आल्यानंतर तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न ...

×