ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » दहा लाख नोकर्‍या, गुणवंत मुलींना स्कूटी

दहा लाख नोकर्‍या, गुणवंत मुलींना स्कूटी

►मध्यप्रदेश भाजपाचे वचनपत्र जाहीर
►शेतकर्‍यांना बोनसही मिळणार,
भोपाळ, १७ नोव्हेंबर –

Mp Bjp

Mp Bjp

२८ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होत असलेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीकरिता भाजपाने आज शनिवारी पक्षाचे वचनपत्र जाहीर केले. अल्पभूधारक शेतकर्‍यांना बोनस, दहा लाख तरुणांना नोकर्‍या आणि बारावीत गुणवत्ता श्रेणीत येणार्‍या विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देण्याचे वचन भाजपाने यात दिले आहे. महिलांकरिताही या वचननाम्यात वेगळी तरतूद करण्यात आली आहे.
‘समृद्ध मध्यप्रदेश दृष्टीपत्र’ असे भाजपाच्या या वचनपत्राचे नाव असून, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ते जाहीर केले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राकेश सिंह आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
शेतकर्‍यांना ४० हजार कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करतानाच, आगामी पाच वर्षांमध्ये सिंचनाचे क्षेत्र ८० लाख हेक्टर्सपर्यंत वाढविण्याचा आणि अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी विशेष विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्धारही भाजपाने यात व्यक्त केला आहे.
शेतकर्‍यांच्या विकासासाठी ३२ हजार ७०१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. शहरांना स्मार्ट सिटी तर ग्रामीण भागात स्मार्ट गाव बनविण्याच्या संकल्पासोबतच एक हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये पिण्याचे चांगले पाणी देण्यात येणार आहे. तसेच स्व-मदत गटासाठी निधी उभारण्यात येणार असल्याचेही यात जाहीर करण्यात आले. इतकेच नव्हे, तर उच्च शिक्षणासाठी गरीब मुलांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी ग्वाही देखील देण्यात आली.
महिलांसाठी वेगळे वचनपत्र
‘नारी शक्ती संकल्प पत्र’ या शीर्षकाखाली भाजपाने महिलांसाठी वेगळे वचनपत्र जाहीर केले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन्स लावण्याचे वचन भाजपाने दिले आहे. याशिवाय, बारावीच्या परीक्षेत ७५ टक्के गुण मिळविणार्‍या प्रत्येक मुलीला मोफत स्कूटी देण्यासोबतच, आगामी पाच वर्षांत महिलांकरिता असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश क्षमता दुपटीने वाढविण्याचा संकल्पही करण्यात आला.
बोनसची रक्कम थेट खात्यात
ज्या शेतकर्‍यांजवळ पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे, अशा लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना समाधानकारक बोनस देण्यात येणार असून, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. याचा फायदा राज्यातील सुमारे ८० लाख शेतकर्‍यांना मिळणार आहे. हा बोनस उत्पादनाच्या आधारावर दिला जाईल. कृषी माल खरेदी करणारे बोनससाठी पात्र राहणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी दिली.
‘हर हातउ एक काज’ योजना
प्रत्येक कुटुंबातील किमान एका बेरोजगार तरुणाला रोजगार कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी ‘हर हात एक काज’ योजना राबविण्यात येणार असल्याचेही भाजपाच्या वचनपत्रात जाहीर करण्यात आले. प्रत्येक वर्षी किमान १० लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यात येतील, असे वचन चौहान यांनी दिले.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (41 of 705 articles)

Sabarimala Darshan
तीनपासून लांबच लांब रांगा, शबरीमलै, १७ नोव्हेंबर - शबरीमलै मंदिराचे दार शुक्रवारी सायंकाळी उघडल्यानंतर स्वामी अयप्पांच्या दर्शनासाठी आज पहाटेपासून भाविकांच्या ...

×