ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » बुलंदशहरात गोहत्येवरून हिंसाचार

बुलंदशहरात गोहत्येवरून हिंसाचार

►पोलिस निरीक्षकासह दोन ठार
►वाहनांची तोडफोड
►पोलिस ठाण्यावर दगडफेक,
बुलंदशहर, ३ डिसेंबर –

Bulandshar Roit

Bulandshar Roit

बेकायदेशीर गोहत्येवरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिसंक वळण लागल्याने उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथे आज सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका पोलिस निरीक्षकासह तरुण ठार झाला. संतप्त जमावाने पोलिस चौकी जाळल्यानंतर, त्यांची पोलिसांसोबत चकमक उडाली. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.
महाव गावातील आणि परिसरातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यांनतर काही वाहनांसह चिंगरवाठी पोलिस चौकीला आग लावली, अशी माहिती मेरठ प्रदेशाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली.
या हिंसाचारात सियाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुबोध कुमार यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. या हिंसाचारामध्ये सुमित नावाच्या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या भागात तणावानंतर सलग तीन तास हिंसाचार सुरू असल्याने राज्य सरकारने या भागात अतिरिक्त पोलिस तैनात केले. यामध्ये दंगाविरोधी पथकाचे एक हजार जवानांचा समावेश आहे. राज्य सरकारने या घटनेची विशेष चौकशी पथक (एसआयटी), गुप्तचर खाते आणि न्यायालयीन अशा विविध पातळीवरील चौकषीची घोषणा केली आहे. महाव गावातील जंगलात गायीच्या शरिराचे अवशेष आढळल्यानंतर येथे तणाव निर्माण झाला, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी लखनौ येथे दिली.
आज सकाळच्या सुमारास गायीचे अवशेष गावाबाहेरील जंगलात गाडून ठेवलेले आढळले. त्यानंतर काही संघटनांचे कार्यकर्ते येथे जमा झाले. त्यांनी हा गोहत्येचा प्रकार असून, काही विशिष्ट धर्मातील लोक यात गुंतल्याचा आरोप केला, असेही त्यांनी सांगितले. संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी आणि गायीचे अवशेष ट्रॅक्टरमधून चिंगरवाठी पोलिस चौकीत आणून गोहत्येत सहभागी असलेल्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाविरोधात जोरदार नारेबाजी करीत बुलंदशहर-गड राज्य महामार्ग रोखून धरला.
यावेळी बुलंदशहरचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा, उपविभागीय न्यायदंडाधिकारी अविनाश कुमार मौर्य आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी संतप्त गावकरी आणि संघटनांसोबत चर्चा करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक करीत आग लावण्यास सुरुवात केली. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, असे कुमार यांनी सांगितले.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (8 of 705 articles)

Madhya Pradesh Map
२ डिसेंबर - मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मतदानाचा कालावधी उलटून गेल्यानंतर राखीव मतदान यंत्र (ईव्हीएम) मुख्यालयात पोहोचल्याने एका नायब तहसिलदाराचे निलंबन ...

×