ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » बुलंदशहर हिंसासार हा अपघात : योगी आदित्यनाथ

बुलंदशहर हिंसासार हा अपघात : योगी आदित्यनाथ

लखनौ, ८ डिसेंबर –

Cm Yogi Adityanath 3

Cm Yogi Adityanath 3

समूहाने हत्या करण्याची घटना उत्तर प्रदेशात घडलेली नाही. बुलंदशहरमध्ये नुकताच जो हिंसाचार उफाळला होता, तो षडयंत्राचा भाग नव्हता तर एक अपघात होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. बुलंदशहरमधील हिंसाचाराच्या घटनेत पोलिस निरीक्षकासह दोघांचा मृत्यू झाला होता.
बुलंदशहरमध्ये जी घटना घडली, ती एक दुर्घटना होती. पोलिस प्रशासन आपले काम करीत आहे. या घटनेतील दोषींना सोडणार नाही, असेही आदित्यनाथ म्हणाले. गोहत्याच नव्हे, तर अनधिकृत कत्तलखान्यांवरही राज्यात बंदी आहे आणि असे प्रकार सुरू राहिल्यास त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असेही ते म्हणाले.
या हिंसाचारात पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यासह दोघांचा मृ्त्यू झाला होता. सुबोध कुमार यांच्या कुटुंबीयांनी आदित्यनाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी सुबोध कुमार यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि न्याय देण्यात येईल, असे आश्‍वासन आदित्यनाथ यांनी दिले होते.
मुख्य आरोपी सैनिकाला काश्मिरातून अटक
बुलंदशहर येथील पोलिस अधिकार्‍याच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सैनिकाला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, जितेंद्र मलिक उर्फ जीतू फौजी असे या आरोपीचे नाव आहे. एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश पोलिस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तीरीत्या ही कारवाई केली. तसेच सोपोर जिल्ह्यातून जीतू फौजीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या आठवड्यात बुलंदशहर येथे गोहत्या व तस्करीच्या अफवेनंतर हिंसाचार भडकला होता. तो वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या पोलिस निरीक्षक सुबोध कुमार यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.
पोलिसांनी सांगितले की, आरोप असलेल्या लष्करी जवानाचे नाव एफआयआरमध्येही आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लष्करी जवानाकडे कट्टा असल्याचे दिसून आले आहे. याच व्हिडीओच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी या जवानाच्या चिंगरावठीमधील घरी झडती घेतली होती.
आरोपीच्या आईने पोलिसांवर तपासाच्या नावाखाली घरात गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे. तसेच घरातील महिलांबरोबर गैरवर्तन केल्याचेही म्हटले आहे. माझ्या मुलाने पोलिस निरीक्षकाला गोळी घातली असेल तर त्याला गोळी घाला, असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलिस अधीक्षकांची बदली
बुलंदशहर हत्या प्रकरणाच्या ६ दिवसानंतर उत्तर प्रदेश पोलिस विभागाने शहरातील पोलिस अधीक्षकांची बदली केली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक कृष्ण बहादूर सिंह यांची बदली आता लखनौला करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बुलंदशहरात प्रभाकर चौधरी यांना बोलावण्यात आले आहे. यापूर्वी चौधरी सीतापूर येथे पोलिस अधीक्षक होते. ठाणा सर्कल अधिकारी सत्यप्रकाश शर्मा आणि चिंग्रावती पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरेश कुमार या इतर दोन पोलिस अधिकार्‍यांचीही ललितपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
बुलंदशहर येथे सोमवारी गोहत्या व तस्करीच्या मुद्यावरून हिंसाचार पसरला होता. त्याचे नेतृत्व बजरंग दलाचे नेते योगेश राज यांनी केले होते. पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत. पहिली एफआयआर योगेश यांच्या तक्रारीवरून गोतस्करीची दाखल केली. त्यात सात जणांची नावे आहेत. तर दुसर्‍या एफआयआरमध्ये हिंसाचार आणि पोलिस निरीक्षकाच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यात २७ जणांची नावे आहेत तर ६० अज्ञातांचा समावेश आहे. आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे, तर चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (69 of 648 articles)

Indian National Congress
आधीच काँग्रेसमध्ये गटबाजी, जयपूर, ८ डिसेंबर - राजस्थानात काँगे्रस पक्ष सत्तेवर येईल, असे भाकीत काही जनमत चाचण्यांनी वर्तविल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ ...

×