ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » मध्यप्रदेश, मिझोरममध्ये सुमारे ७५ टक्के मतदान

मध्यप्रदेश, मिझोरममध्ये सुमारे ७५ टक्के मतदान

भोपाळ/ऐझवाल, २८ नोव्हेंबर –

Mp Cm Shivraj Voting

Mp Cm Shivraj Voting

सध्या देशात पाच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पुढील लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून या पाच निवडणुकांकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. या पाच पैकी मध्यप्रदेश आणि मिझोरामच्या निवडणुकीचे मतदान आज झाले आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. प्राप्त माहितीनुसार मध्यप्रदेश आणि मिझोरम या दोन्ही राज्यांमध्ये सुमारे ७५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशच्या निवडणूक कामावर कार्यरत तीन शासकीय कर्मचार्‍यांचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू झाला आहे.
मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी आज बुधवारी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच कोटींपेक्षा जास्त मतदारांपैकी सुमारे ७५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी मतदानाच्या ड्युटीवर असलेल्या तीन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.
पाच वाजता मतदानाची वेळ संपली तेव्हाही असंख्य मतदार रांगेत उभे होते. त्यामुळे पाच वाजेपर्यंत रांगेत उभ्या असलेल्या सर्वांना मतदान करू देण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार मध्यप्रदेशात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७४.६१ टक्के मतदान झाले होते. यात वाढ होण्याची शक्यताही आयोगाने वर्तविली आहे. राज्यातील निमाड मालवांचलशिवाय बालाघाट, छिंदवाडा आणि शाजापूर येथे प्रत्येकी ७५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राजधानी भोपाळमध्ये सुमारे ६० टक्के मतदानाची शक्यता आहे. अंतिम आकडेवारी प्राप्त व्हायची होती. एकटदुकट किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. इंदूर, गुना आणि धार जिल्ह्यातील मतदान केंद्रावर कार्यरत तीन शासकीय कर्मचार्‍यांचा हृदयविकार किंवा अन्य आजारपणामुळे मृत्यू झाला.
बालाघाट जिल्ह्यातील नक्षलप्रभावित परसवाडा, बैहर आणि लांजी येथे दुपारी ३ वाजताच मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या तिन्ही ठिकाणी सकाळी ७ वाजतापासूनच मतदान सुरू करण्यात आले होते. येथे सरासरी ६५ टक्के मतदान झाले.
याआधीच्या म्हणजे २०१३ च्या मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत ७२.६६ टक्के मतदान झाले होते, तर यावेळी राज्य निवडणूक आयोगाने ८० टक्के मतदानाचे लक्ष्य निर्धारित केले होते.
मध्यप्रदेशातील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. राज्यात आज मतदानादरम्यान दीड टक्के कंट्रोल युनिट (सीयू) आणि अडीच टक्के व्हीव्हीपॅट बदलण्यात आली. एकट्या सतना जिल्ह्यात २० टक्के व्हीव्हीपॅट (१५४५ नग) बदलण्यात आले. या सर्व ठिकाणी मशीन बदलवून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि पाच वाजेनंतरही रांगेत असलेल्या सर्वांना मतदान करू देण्यात आले, त्यामुळे तेथे फेरमतदान घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांताराव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. असे असले तरी फेरमतदानासाठी अर्ज करण्याचा उमेदवारांना पूर्ण हक्क आहे, असेही ते म्हणाले.
मिझोरम
मिझोरम येथे ४० जागांसाठी सुमारे ७५ टक्के मतदारांनी अतिशय कडक सुरक्षा बंदोबस्तात मतदान केले. येथे सायं. ४ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २०९ उमेदवार या निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत. यात १८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. १९८७ साली वेगळे राज्य झाल्यानंतरची मिझोरममधील विधानसभेची ही आठवी निवडणूक आहे. येथे काँग्रेस तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी आपले भाग्य आजमावत आहे. केंद्रात भाजपाचा सहयोगी पक्ष असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटने सर्व ४० जागांवर आपले उमेदवार उभे केले असून भाजपाने ३९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंटमध्ये थेट लढत असलेली तरी पुढील सरकार स्थापन करण्यामध्ये आपली मोलाची भूमिका राहू शकते, असा भाजपा, नॅशनल पीपल्स पार्टी आणि जोराम पीपल्स मुव्हमेंट यांनी दावा केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री लाल थनहवला यांनी सर्चिप आणि चंपाई दक्षिण या दोन मतदार संघांमधून आपले दावेदारी सादर केली आहे.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (26 of 716 articles)

Mamata Banerjee Addresses A Press Conference
२८ नोव्हेंबर - वायुप्रदूषणावर आळा घालण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सांगितलेल्या उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पश्‍चिम बंगाल सरकारला पाच ...

×