ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राजस्थान, राज्य » राजस्थान, तेलंगणामधील निवडणूकप्रचार संपला

राजस्थान, तेलंगणामधील निवडणूकप्रचार संपला

►विधानसभेसाठी उद्या मतदान,
नवी दिल्ली, ५ डिसेंबर –

Election Voting

Election Voting

राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारतोफा आज बुधवारी सायंकाळी थंडावल्या. या दोन्ही राज्यात शुक्रवार ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यातील मतदान आटोपल्यावर या दोन राज्यांसह आधी निवडणूक झालेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम अशा पाच राज्यातील मतमोजणी ११ डिसेंबरला होणार आहे.
राजस्थान विधानसभेच्या २०० पैकी १९९ मतदारसंघात ७ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ कोटी ७७ लाख मतदार २२७४ उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय करणार आहे. यात १८९ महिलांचाही समावेश आहे. बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे अलवर जिल्ह्याच्या रामगड मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
राजस्थानमधील निवडणूक भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. बसपा आणि आम आदमी पक्ष यांनी या निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. बसपा १९१ तर आप १८० जागा लढवत आहे. राज्यातील १३० मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. ५० मतदारसंघात दोन्ही पक्षातील बंडखोरामुळे रंगत आणली आहे.
शेतकर्‍यांची कर्जमाफी, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्यांभोवती निवडणुकीचा प्रचार फिरला. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाच्या अनेक फैरी झाल्या. भाजपातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा खासदार हेमामालिनी यांनी राज्यात झंझावाती प्रचार केला. विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दररोज पाच सभा घेत संपूर्ण राज्य पिंजून काढले. काँग्रेसतर्फे प्रचाराची धुरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल, काँग्रेस महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला, राज बब्बर, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, प्रदेश काँग्रेसच अध्यक्ष सचिन पायलट, पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांभाळली.
तेलंगणा : ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचारही आज सायंकाळी संपला. १८२१ उमेदवारांचा भाग्याचा निर्णय राज्यातील मतदारांच्या हातात आहे. राज्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील तेलंगणा राष्ट्र समिती, भाजपा आणि काँग्रेस तेलगू देसम आघाडीत तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी ३२,५७४ मतदान केंद्रांची राज्यात व्यवस्था करणयात आली असून, नक्षलप्रभावित १३ मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे. उर्वरित १०६ मतदारसंघात सकाळी ७ पासून सायंकाळी ५ पर्यंत मतदानाची वेळ आहे.

Posted by : | on : 6 Dec 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राजस्थान, राज्य (21 of 720 articles)

Up Uttar Pradesh Map
५ डिसेंबर - वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी एका चिठ्ठीद्वारे देण्यात आली आहे. या धमकीमुळे वाराणसीमध्ये खळबळ ...

×