ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » सोनियांकरिता सीताराम केसरींना बाहेर फेकले होते

सोनियांकरिता सीताराम केसरींना बाहेर फेकले होते

►पंतप्रधानांचा पुन्हा घणाघाती हल्ला
►मी इतिहास विचारला नव्हता,
महासमुंद, १८ नोव्हेंबर –

Pm Modi Rally Allahabad

Pm Modi Rally Allahabad

भूतकाळात काँगे्रसने कुणाला अध्यक्ष बनविले होते, हा माझा प्रश्‍न नव्हता. आता काँगे्रसने गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला पाच वर्षांकरिता अध्यक्ष करून दाखवावे, असे आव्हान मी दिले आहे, अशी आठवण करून देतानाच, सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी काँगे्रसने दलित नेते सीताराम केसरी यांना पदावरून कसे बाहेर फेकले होते, या घटनेचे साक्षीदार संपूर्ण देशवासी आहेत, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी केला. दरम्यान, छत्तीसगडमधील दुसर्‍या टप्प्याच्या प्रचार तोफा आज थंडावल्या. या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
सोनिया गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदी बसविण्याची इतकी घाई झाली होती की, सीताराम केसरी यांना पाच वर्षांची कारकीर्दही पूर्ण करू दिली नव्हती. त्यांना अपमानित करून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. त्यांचा अपमान देशवासीयांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे, असा स्पष्ट आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारात येथे आयोजित विशाल जाहीर सभेत ते बोलत होते.
गांधी-नेहरू घराण्यातील चार पिढ्यांनी देशावर राज्य केले आहे. या सत्ताकाळात केवळ घराण्याचाच फायदा करण्यात आला. देशाचा विकास करण्याचा विचार त्यांच्या मनात कधीच नव्हता. २०१४ मध्ये भाजपा केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी देशाचा कारभार रिमोट कंट्रोलने चालायचा. या रिमोटचे बटन एका घराण्याच्या हातात होते आणि या घराण्याला सर्वांत जास्त भीती भाजपाचीच होती, असे पंतप्रधान म्हणाले.
काँगे्रसने घराण्याच्या बाहेरील कुणाही व्यक्तीला पाच वर्षांसाठी अध्यक्ष करावे, असे आव्हान मी दिले होते. त्यावर काँगे्रसच्या एका नेत्याने होऊन गेलेल्या अध्यक्षांची माहिती सादर केली. मी भूतकाळ विचारला नव्हता, असा टोला पंतप्रधानांनी हाणला.
नेहरू-गांधी घराण्यातील चार पिढ्यांचा सत्ताकाळ आठवा. त्यांनी केवळ घराण्याचा फायदा कसा होईल, यावरच भर दिला होता. नागरिकांच्या कल्याणाचा विचार कुणीच करीत नव्हते. मग, आता हा पक्ष आमचे कल्याण करील, यावर तुम्ही कसा विश्‍वास ठेवणार आहात, असा सवालही त्यांनी केला.
या निवडणुकीला सामान्य समजू नका. मी युवकांना सांगू इच्छितो की, जे युवक पहिल्यांदा मतदान करीत आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी जगलेले आयुष्य आणि त्यांनी झेललेले संकट पुन्हा अनुभवायचे आहे का? तुम्हालाही तसेच आयुष्य घालवायचे आहे का? काँग्रेस नेहमी खोटे बोलते आणि जनतेला संभ्रमात टाकते. कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसने शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन दिले होते. आज एक वर्षांनंतरही तिथे कोणतीच कर्जमाफी झाली नसल्याचे ते म्हणाले.
गाईच्या मुद्यावरूनही जोरदार हल्ला
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँगे्रसने गाय ही मातेसमान असल्याचे नमूद करीत, तिच्या रक्षणावर भर दिला आहे, पण याच काँगे्रसचे नेते व कार्यकर्ते केरळात गाईला मारतात आणि तिचे मांस खातात. हा ढोंगीपणा नव्हे काय, असा सवाल मोदी यांनी केला.
नामदाराचा त्रास मी समजू शकतो
छत्तीसगडमधील वादळी प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी नागपूरमार्गे मध्यप्रदेशातील प्रचारासाठी रवाना झाले. नागपुरात अल्पकाळ मुक्काम केल्यानंतर ते मध्यप्रदेशात गेले. छिंदवाडा येथे त्यांनी विशाल जाहीर सभेला संबोधित करताना काँगे्रसवर जोरदार हल्ला चढविला. एका घराण्याचे नामदार आणि त्यांचा पक्ष माझ्यावर सातत्याने चिखल फेकत आहेत. त्यांना सध्या जास्त वेदना होत आहेत, त्यांना त्रास होत आहे, हे मी समजू शकतो. मला शिव्या देण्यासाठी हे नामदार हिंदी आणि इंग्रजीसह सर्व प्रकारच्या शब्दकोषांमधून वाईटातल्या वाईट शब्दांचा शोध घेत आहेत, असा टोला पंतप्रधानांनी हाणला.

Posted by : | on : 19 Nov 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (191 of 731 articles)

Mp Bjp
भाजपाचे वचनपत्र जाहीर ►शेतकर्‍यांना बोनसही मिळणार, भोपाळ, १७ नोव्हेंबर - २८ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होत असलेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीकरिता ...

×