ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » अखिलेशकडून एकाच दिवशी १३ खाणींना मंजुरी

अखिलेशकडून एकाच दिवशी १३ खाणींना मंजुरी

►सीबीआयचा दावा,
नवी दिल्ली, ७ जानेवारी –

Akhilesh Yadav

Akhilesh Yadav

२०१२-१३ या काळात उत्तरप्रदेशचे खनन मंत्रालय तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडेच होते. या काळात त्यांनी वाळू खाण उत्खननाच्या १४ निविदा बेकायदेशीर मंजूर केल्या असून, यातील १३ निविदांना एकाच दिवशी मंजुरी देण्यात आली होती. या सर्व निविदांवर अखिलेश यांच्याच स्वाक्षर्‍या आहेत, असा खळबळजनक दावा सीबीआयने आज सोमवारी केला. यामुळे अखिलेश यांच्यावरील संकट आता अधिकच गडद झाले आहे.
अखिलेश यांनी १७ फेबु्रवारी २०१२ रोजी सर्व नियमांचे उल्लंघन करून सरसकट १३ खाण उत्खननांना मंजुरी दिली, असे सांगताना सीबीआयने अखिलेश यांच्या कारनाम्यांचे कागदोपत्री पुरावेच सादर केले. २०१२ मधील ई-टेंडर धोरणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असतानाही, अखिलेश यांनी या कायद्याचे पालन न करता १४ निविदांना मंजुरी दिली आणि त्यानंतर हमीरपूरच्या जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांनी या सर्व निविदांवर आपली स्वाक्षरी करून मोहोर उमटवली होती, असेही सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले.
आम्ही भाजपा किंवा केंद्र सरकारच्या दबावात येऊन उत्तरप्रदेशात छापे घातले नाहीत. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर, अखिलेश यादव यांनी आपल्या अधिकार्‍यांचा कसा आणि किती गैरवापर केला, हे स्पष्ट झाले आणि त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईला कुणीही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिकाही सीबीआयने मांडली आहे.
सीबीआयने गेल्या आठवड्यात उत्तरप्रदेशातील १४ ठिकाणी छापे टाकले होते. यात चंद्रकला यांचे घर आणि कार्यालयाचीही झडती घेण्यात आली होती.
घाबरू नकोस, मी पाठीशी आहे! : मायावती
लखनौ – उत्तरप्रदेशातील बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणी सीबीआयने अलीकडेच विविध ठिकाणी छापे मारले आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची चौकशी करण्याचे संकेत दिल्यानंतर, बसपा नेत्या मायावती यांनी आज सोमवारी अखिलेश यांना फोन केला आणि काळजी नको, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा दिला.
अशा प्रकारच्या घटना आपल्या आयुष्यात घडतच असता, त्यामुळे खचून जाऊ नका. सत्तारूढ भाजपाचे हे सूडाचे राजकारण आहे. आतापर्यंत काँगे्रसने त्यांच्या कार्यकाळात सीबीआयसारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला, आता भाजपाही तेच करीत आहे. आपल्या विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची या दोन्ही पक्षांची सवयच आहे, असे मायावती यांनी अखिलेशला सांगितले. आधी सीबीआयचे छापे आणि त्यानंतर तुमची चौकशी करण्याची धमकी देणे हा भाजपाचा राजकीय सूड उगविण्याचा अजेंडाच आहे. काँगे्रसप्रमाणेच भाजपाचेही हे जुनेच राजकारण आहे. देशातील नागरिकांनाही याची माहिती आहे आणि तेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला धडा शिकवणार आहेत, असेही मायावती म्हणाल्या. मायावती यांनी या मुद्यावर अखिलेश यांच्यासोबत बराच वेळ चर्चा करून, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई जर एकट्या सीबीआयची असेल, तर त्यावर भाजपाचे नेते का प्रतिक्रिया देत आहेत, सीबीआयचे प्रवक्ते असल्यासारखे ते का बोलत आहेत, असा सवालही मायावती यांनी केला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीकरिता मी रालोआचा घटक होण्यास नकार दिल्यानंतर २००३ मध्ये मला देखील ताज कॉरिडोर प्रकरणात अडकविण्यात आले होते. त्यानंतर जनतेनेच भाजपाचा बदला घेतला आणि बसपाला मोठ्या प्रमाणात मतदान केले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (431 of 2234 articles)

Robart Vadhra1
जमीन घोटाळा प्रकरण, नवी दिल्ली, ७ जानेवारी - २००८ मध्ये हरयाणाच्या गुरुग्राम येथील जमिनीच्या व्यवहारात प्रचंड मोठा गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी ...

×