ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » अशी वाढणार ‘शक्ती’

अशी वाढणार ‘शक्ती’

नवी दिल्ली, २७ मार्च –

Mission Shakti A Sat

Mission Shakti A Sat

भारतीय क्षेपणास्त्राने (ए-सॅट) पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेला सक्रिय उपग्रह पाडला. या मोहिमेला ‘शक्ती’ असे नाव देण्यात आले होते. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीने पाडण्याची क्षमता जगातील अमेरिका, चीन व रशिया या अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे.
भविष्यातील युद्ध अवकाशात होईल, असे म्हटले जाते. त्या दृष्टीने भारताचे ऑपरेशन महाशक्ती अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. अवकाशात असलेल्या उपग्रहांचा वेग अतिशय जास्त असतो. अवघ्या तास-दीड तासात उपग्रह पृथ्वीच्या भोवती एक प्रदक्षिणा घालतात. पृथ्वीपासून दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी वेग आणि अचूकता महत्त्वाची असते. योग्य उपग्रहाचा वेध घेण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असते.
उपग्रह दूरसंचार (सॅटेलाइट कम्युनिकेशन) प्रणालींमुळे जमिनीवरील किंवा हवेतील शस्त्रास्त्रांचे दिशादर्शन करणे सुलभ झाले. अनेक उपग्रहांचे जाळे निर्माण करून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमसारख्या (जीपीएस) यंत्रणा तयार झाल्या. त्याने स्मार्ट शस्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आदींच्या विकासाला चालना मिळाली. युद्धकाळात ही उपग्रह भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे शत्रूची संपर्कयंत्रणा आणि निर्णयप्रणाली उद्ध्वस्त करण्यासाठी प्रथम त्याचे उपग्रह नष्ट करण्यास आधुनिक युद्धात महत्त्व असणार आहे.
वेगाने पृथ्वी-प्रदक्षिणा करत असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी क्षेपणास्त्राने वेग घेणे गरजेचे असते. क्षेपणास्त्राने उपग्रहाचा अचूक वेध न घेतल्यास ते पृथ्वीवर पडू शकते. हा अतिशय मोठा धोका असतो. त्यामुळेच मिशन शक्तीमध्ये आव्हानांचा डोंगर होता. मात्र, त्या सर्वांवर मात करत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी यश मिळवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय?
नवी दिल्ली ः लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीची सर्वात जवळ असलेली कक्षा होय. लो अर्थ ऑर्बिट भूपृष्ठापासून १६० किलोमीटर ते २ हजार किलोमीटरपर्यंत स्थित असते. त्यानंतर मिडियन अर्थ ऑर्बिट, जिओसिंक्रोनस ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट अशा विविध कक्षा असतात. त्यापैकी हाय अर्थ ऑर्बिट हे पृथ्वीच्या पृष्टभागापासून ३५ हजार ७८६ किमी अंतरावर स्थित आहे.
सध्या भारताकडून अंतराळात मानव पाठवण्यासाठी मोहीम आखली जात आहे. २०२२ मध्ये तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचे भारताने निश्‍चित केले असून, हे अंतराळवीर लो अर्थ ऑर्बिटमध्येच राहणार आहेत. या मोहिमेबाबत इस्रोने सांगितले की, केवळ १६ मिनिटांमध्ये तीन भारतीय अंतराळवीरांना श्रीहरीकोटा येथून अंतराळात पोहोचवले जाईल. हे भारतीय अंतराळवीर अंतराळात लो अर्थ ऑर्बिटमध्ये ६ ते ७ दिवस राहणार आहेत.
अलिकडेच काही उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवले गेले होते. जमिनीपासून अंतर कमी असल्याने येथून संदेशवहन चांगल्या पद्धतीने होत असते, तसेच काही उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेटच्या वेगात वाढ करण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. मात्र, कुठलाही उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये टिकून राहणे खूप कठीण असते.

Posted by : | on : 28 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (136 of 2392 articles)

Arun Jaitly2
दिल्ली, २७ मार्च - उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनवण्याची क्षमता आपल्या देशातील शास्त्रज्ञांमध्ये होती, मात्र संपुआ सरकारने त्यांना असे क्षेपणास्त्र बनवण्याची परवानगी ...

×