ads
ads
ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

ऊर्जित पटेल यांचा राजीनामा

►वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय, मुंबई, १० डिसेंबर – केंद्र…

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

राष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार

►केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांची घोषणा, नवी दिल्ली, १० डिसेंबर…

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता ►चीन, पाक क्षेपणास्त्राच्या टप्प्यात,…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

पाकला एक डॉलरही देऊ नका

पाकला एक डॉलरही देऊ नका

►निकी हेली यांनी खडसावले, न्यू यॉर्क, १० डिसेंबर –…

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

सार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश

►भारतीय उच्चायुक्तांनी सोडली बैठक, इस्लामाबाद, १० डिसेंबर – सार्कच्या…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

भाजपा-सेनेत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

►मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून प्रवास •►दोन्ही नेत्यांचे नगारा…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:49 | सूर्यास्त: 17:51
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » अस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात

अस्थाना प्रकरणातील तपास अधिकारी सुप्रीम कोर्टात

►नागपूर बदलीला दिले आव्हान,
नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर –

Rakesh Asthana

Rakesh Asthana

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात लाच घेतल्याप्रकरणी दाखल एफआयआरचा तपास करणारे सीबीआयचे अधिकारी मनीषकुमार सिन्हा यांनी, त्यांची नागपूर येथे अचानक करण्यात आलेल्या बदलीला आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारण्याचा आरोप अस्थाना यांच्यावर असून, या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. त्यांच्यावरील आरोपांचा तपास करणार्‍या पथकात सिन्हा यांचाही समावेश आहे, पण अलीकडेच त्यांनी तडकाफडकी नागपूर येथे बदली करण्यात आली.
या प्रकरणाच्या तपासावरून मला हटविण्याचा प्रयत्न असून, माझी बदली तातडीने रद्द करण्यात यावी, अशी विनंती सिन्हा यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
दरम्यान, दीर्घ राजेवर पाठविण्याच्या आणि सर्व अधिकार काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या मंगळवारी सुनावणी करणार असून, सोबतच सिन्हा यांच्याही याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सीव्हीसी अहवालावर उत्तर देण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या याच न्यायासनाने आलोक वर्मा यांना केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) प्राथमिक तपास अहवालावर तातडीने उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने शुक्रवारी वर्मा यांना उत्तर सादर करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत दिली होती.
आलोक वर्मा यांचे उत्तर सादर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी आज मंगळवारी सीव्हीसीच्या प्राथमिक तपास अहवालावर आपले उत्तर सादर केले. आज सकाळी सुनावणी सुरू झाली, तेव्हा वर्मा यांनी उत्तर सादर केले नव्हते, तेव्हा आम्ही आजची सुनावणी उद्यावर ढकलणार नाही. तुम्हाला आजच उत्तर द्यावे लागणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
मनीषकुमार सिन्हांनी डोवाल, केंद्रीय मंत्र्यांनाही वादात ओढले
आपल्या नागपूर येथील बदलीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना सीबीआयचे वरिष्ठ मनीषकुमार सिन्हा यांनी, एका मोठ्या प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा देण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप केला. सोबतच त्यांनी सीबीआयमधील या वादात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी आणि मुख्य दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनाही ओढले.
सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना फायदा पोहोचविण्यासाठी आणि पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याला वाचविण्यासाठीच माझी बदली करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबर रोजी सीबीआयने एक आरोपी मनोज कुमारला दुबईहून दिल्लीत येताच अटक केली होती. त्याला दिल्लीतील मुख्यालयात आणण्यात आले. पण, प्रश्‍नांची उत्तरे देण्याऐवजी त्याने अधिकार्‍यांना धमक्या देणे सुरू केले. यावेळी त्याने उच्च पदावर विराजमान असलेला एक अधिकारी आपला नातेवाईक असल्याचे सांगितले. त्याच्या मते, त्याचे वडील दिनेश्‍वर प्रसाद आयबीमधून संयुक्त सचिव पदावरून नुकतेच निवृत्त झाले आहेत आणि अजित डोवाल यांच्याशी त्याचे अतिशय जवळचे संबंध आहेत. याच आधारावर त्याने तपास अधिकार्‍यांची बदली करण्याचीही धमकी दिली, असेही सिन्हा यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायासनाला सांगितले.
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी अस्थानाविरोधात एफआयआर दाखल करण्यापूर्वी अजित डोवाल यांच्याशी १७ ऑक्टोबर रोजी चर्चा केली होती. त्याच रात्री याबाबतची माहिती अस्थाना यांना देण्यात आली आणि अस्थाना यांनी, आपल्याला अटक करण्यात येऊ नये, अशी विनंती केली, असा दावाही सिन्हा यांनी याचिकेत केला आहे.

Posted by : | on : 20 Nov 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (109 of 1875 articles)

Supreme Court 2
न्यायालयाचे आदेश, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर - कुठलीही कायदेशीर परवानगी न घेता आपल्याविरुद्ध मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खटला चालविला जात आहे, ...

×