ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » आजपासून कुंभमेळा

आजपासून कुंभमेळा

•देश-विदेशातून लाखो भाविकांचे आगमन, 
•कडेकोट सुरक्षा,
प्रयागराज, १४ जानेवारी –

Kumbh Prayag 2019

Kumbh Prayag 2019

अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झालेल्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे उद्या मंगळवारपासून कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. ४ मार्चपर्यंत हा कुंभमेळा सुरू राहणार आहे. असंख्य साधू-संतांसह लाखो भाविकांचे आगमन होत असून, यासाठी अस्थायी स्वरूपात वसविण्यात आलेली साधुग्राम नगरी दिवाळीसारखी सुशोभित करण्यात आली आहे. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला दिगंबर आखाड्यातील तंबूला आग लागली. त्यात सुमारे १२ तंबू जळून खाक झाले. तथापि, यात कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. १० मिनिटांतच ही आग विझविण्यात आली.
या कुंभमेळाच्या निमित्ताने होणार्‍या पवित्र स्नानासाठी प्रयागराज तीर्थ येथे देश-विदेशातून लाखो भाविक दाखल झाले असून, उद्या मकरसंक्रांतीच्या पर्वावर कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान होणार आहे. ५० दिवस चालणार्‍या या कुंभमेळ्यात देश-विदेशातून सुमारे १२ कोटी भाविक भेट देण्याची शक्यता आहे.
प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर सुमारे ४५ एकर क्षेत्रात वसविण्यात आलेली साधुग्राम नगरी रोषणाईने नटली आहे. या नगरीत दाखल झालेल्या विविध आखाडे व त्यांच्या संत-महंत तसेच महामंडलेश्‍वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. साधुग्राममध्ये जाण्यासाठी पाण्यावर तरंगणार्‍या लोखंडी ड्रम्सचा वापर करून २४ तात्पुरते पूल उभारण्यात आले आहेत. जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सरकारी इमारती तसेच शहरातील पुलांवर व चौकांवर कुंभशी निगडित धार्मिक चित्रे चितारण्यात आली आहेत.
रविवारी काशी येथील कैलास मठाचे स्वामी आशुतोषानंद गिरी यांचा महामंडलेश्‍वर म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आनंद पीठाधीश्‍वर स्वामी बालकानंद गिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा पार पडला.
थ्रीडीच्या माध्यमातून अमृतमंथन
थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंगच्या साह्याने कुंभमेळ्यात समुद्रमंथन आणि रामायणाचा व्हिडीओ दाखविण्याची तयारी अहमदाबादच्या ब्लिंक ३६० या कंपनीने केली आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग इतरत्र मोठ्या इमारतींवर केला जात असला असला तरी कुंभात मात्र त्याचा उपयोग सभागृहातील छोट्या पडद्यावर केला जाणार आहे. हे सर्व पाहण्यासाठी थ्रीडी चष्मा घालण्याची गरज पडणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
हरवलेली मुले शोधण्यासाठी खास उपाय
१४ वर्षांपेक्षा कमी वयातील मुले कुंभमेळ्याच्या काळात हरविल्यास त्यांचा लगेच शोध घेता यावा, यासाठी पोलिसांनी खास उपाय केले आहेत. या वयोगटातील सर्व मुलांना पोलिसांकडून रेडिओलहरी असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली.

Posted by : | on : 15 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (186 of 2024 articles)

Supreme Court 1
हस्तक्षेप नाही : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, १४ जानेवारी - कोरेगाव भीमा येथील एल्गार परिषदेत एक वर्षापूर्वी उसळलेल्या भीषण हिंसाचारप्रकरणी ...

×