ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आता इलेक्शन स्ट्राईक

आता इलेक्शन स्ट्राईक

•देशात ७ टप्प्यांत, राज्यात ४ टप्प्यांत मतदान
•११ एप्रिलपासून मतदान, २३ मेला मतमोजणी, आचारसंहिता लागू,
नवी दिल्ली, १० मार्च –

Loksabha Election 2019 Timetable

Loksabha Election 2019 Timetable

देशांतील ९० कोटी मतदारांच्या मनातील स्वप्न साकार करण्याची क्षमता असणारे सरकार निवडण्याची वेळ आता आली आहे. दु:ख, दैन्य, असुरक्षितता, वंचना आणि अंधारावर प्रहार करण्यासाठी इलेक्शन स्ट्राईकचा वापर आता देशातील जनताच मतदानाचा अधिकार बजावून करेल.
लोकसभा निवडणुकीचे बिगूल फुंकल्या गेले असून, देशभरातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ११ एप्रिल ते १९ मे अशा सात टप्प्यात मतदान होणार आहे. २३ मे रोजी एकाच दिवशी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज रविवारी जाहीर होताच, देशात आचारसंहिताही लागू झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विज्ञान भवनात आयोजित भरगच्च पत्रपरिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी निवडणूक आयुक्तद्वय सुशीशचंद्रा आणि अशोक लवासा उपस्थित होते.
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान
पहिला टप्पा : ११ एप्रिल, ७ जागा
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम.
दुसरा टप्पा : १८ एप्रिल, १० जागा
बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर.
तिसरा टप्पा : २३ एप्रिल, १४ जागा
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
चौथा टप्पा : २९ एप्रिल, १७ जागा
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्‍चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण
प्रत्येक ईव्हीएमला व्हीव्हीपॅट
या निवडणुकीत सर्व मतदानकेंद्रावरील ईव्हीएममध्ये व्हीव्हीपॅट मशिनची सुविधा असेल. त्यामुळे मतदाराला त्याचे मत कोणाला गेले ते समजणार आहे. तसेच ईव्हीएमलाही अनेक स्तरीय सुरक्षा असेल. प्रत्येक ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो असणार आहे. देशभरात एकूण १० लाख मतदान केंद्रांवर मतदान होईल. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे.
चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका
लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. यातील अरुणाचल, आंध्र आणि सिक्कीम या तीन राज्यांमध्ये ११ एप्रिल रोजीच्या पहिल्याच टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. तर, ओडिशात चार टप्प्यात मतदान घेण्यात येईल.
निवडणूक काळात ‘ही’ कामे केल्यास निवडणूक होणार रद्द!
-मंत्री किंवा खासदारांना कोणतीही वित्त मंजुरी किंवा नवीन घोषणा
-कोणत्याही प्रकारचे प्रकल्प/योजनांचे भूमिपूजन
-रस्ता उभारणी/पेयजलाची सुविधा देण्याचे आश्‍वासन
-मतदारांवर प्रभाव पडेल अशा शासकीय, सार्वजनिक उपक्रमांमध्ये कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती
महत्वाचे –
– लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशा, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणूक होणार
– उत्तरप्रदेशातील ८०, बंगालमधील ४२ तर बिहारमधील ४० लोकसभा मतदारसंघात ७ टप्प्यात मतदान होणार आहे.
– जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यात, तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड आणि ओडिशात चार टप्प्यात मतदान होणार आहे.
– आसाम आणि छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात तर कर्नाटक, राजस्थान, मणिपूर आणि त्रिपुरात दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
– दिल्लीत सहाव्या टप्प्यात १२ मेला मतदान होणार आहे.
– २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दिल्ली, गोवा, केरळ, पंजाब, सिक्कीम, गुजरात, हरयाणा, मेघालय, नागालॅण्ड, तेलंगणा, चंडीगढ, पुडुचेरी, लक्षद्वीप, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचलप्रदेश, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबारमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
– लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४९,९२२ मतदार आहेत, तर कर्नाटकातील मल्कानगिरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ लाख ८३ हजार ३२५ मतदार आहेत.
– १०९५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मतदार आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, याची खात्री करून घेऊ शकतील. निवडणूक जाहीर झाल्याच्या दहा दिवसानंतर मतदारयादीत कोणतेच बदल केले जाणार नाहीत.
यावेळी ९० कोटी मतदार
-यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ९० कोटी मतदार
-५ वर्षांत ८.४ कोटी मतदार वाढले
-प्रथमच मतदार १.५ कोटी
-२०१४ साली ८१ कोटी मतदार
-९९.३ टक्के मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र
-मल्काजगिरी येथे सर्वाधिक ३१,८३,३२५ मतदार
-लक्षद्वीपमध्ये सर्वांत कमी ४९,९२२ मतदार
अशी जाहीर होणार अधिसूचना
-पहिल्या टप्प्यासाठी १८ मार्च रोजी
-दुसर्‍या टप्प्यासाठी १९ मार्च रोजी
-तिसर्‍या टप्प्यासाठी ८ एप्रिल रोजी
-चौथ्या टप्प्यासाठी २ एप्रिल रोजी
-पाचव्या टप्प्यासाठी १० एप्रिल रोजी
-सहाव्या टप्प्यासाठी १६ एप्रिल रोजी
-सातव्या टप्प्यासाठी २२ एप्रिल रोजी
पर्यावरणानुकूल प्रचारसाहित्य वापरण्याचे आवाहन
प्रचारादरम्यान पर्यावरणानुकूल प्रचारसाहित्य वापरण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले. उमेदवारांना वर्तमानपत्रात फक्त तीन वेळा जाहिरात देता येईल. उमेदवाराचा समाजमाध्यमावरील प्रचाराचा खर्चही निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाईल. अर्ज भरतांना उमेदवाराला पॅन कार्डही सादर करावे लागेल. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही.
२०१४ मध्ये ९ टप्प्यात मतदान
२०१४ मध्ये नऊ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले होते. त्यावेळी ७ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील, तर १२ मेला शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले होते. १६ मेला मतमोजणी झाली होती. २६ मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. २००९ मध्ये सहा टप्प्यात तर २००४ मध्ये चार टप्प्यात राज्यात मतदान झाले होते.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (63 of 2216 articles)

Bhaiyyaji Joshi
आंदोलन सुरूच राहणार •मध्यस्थ समितीचे स्वागतच •रा. स्व. संघाची भूमिका, ग्वाल्हेर, १० मार्च - अयोध्येत श्रीरामाचे मंदिर ठरलेल्या प्रारूपात आणि ...

×