ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आर्थिक मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण

आर्थिक मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण

►आरक्षणाची मर्यादा वाढविणार
►मोदी सरकारचा धोरणात्मक निर्णय,
नवी दिल्ली, ७ जानेवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती, ती सरकारने आज मान्य केली.
विशेष म्हणजे नियमित आरक्षणाच्या टक्केवारीला धक्का बसू न देता घटनादुरुस्ती करून हे अतिरिक्त १० टक्के आरक्षण सवर्णांना देण्यात येणार आहे. आरक्षणाची कमाल मर्यादा सध्या ५० टक्के आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढवायची असेल तर सरकारला घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. सवर्णांना १० टक्के अतिरिक्त आरक्षण देण्यासाठी सरकारने घटनादुरुस्ती करण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे आरक्षणाची कमाल मर्यादा आता ६० टक्के होणार आहे. सरकारच्या या निर्णयाकडे गेमचेंजर म्हणून पाहिले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) काही तरतुदी शिथिल केल्या होत्या, यावर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. परिणामी सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय फिरवावा लागला होता, त्यामुळे सवर्ण भाजपावर नाराज झाले होते. त्यामुळे सवर्णांची नाराजी दूर करण्यासाठी तसेच त्यांना परत भाजपाजवळ आणण्यासाठी मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. विशेष म्हणजे सध्या आरक्षण मिळत असलेल्या कोणत्याही वर्गाचे आरक्षण सरकारच्या आजच्या निर्णयामुळे कमी होणार नसल्यामुळे त्यांचाही याला विरोध राहणार नाही.
१० टक्के अतिरिक्त आरक्षण देण्यासाठी भाजपाला घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांची मदत भाजपाला घ्यावी लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे या मुद्यावर घटनादुरुस्ती करणे सरकारला जड जाणार नाही, असे समजते.
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या ८ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे उद्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार १० टक्के अतिरिक्त आरक्षणाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक संसदेत आणणार का याकडे लक्ष लागले आहे. सर्व जातिधर्मातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना १० टक्के अतिरिक्त आरक्षण देण्यासाठी घटनेतील १५ व्या आणि १६ व्या कलमात दुरुस्ती करावी लागणार आहे. विद्यमान आरक्षणाचा लाभ न मिळणार्‍या वर्गासाठी हे नवीन आरक्षण आहे.
८ लाखांपर्यत वार्षिक उत्पन्न असणार्‍या, ५ एकरपेक्षा कमी शेती असणार्‍या तसेच शहरात १ हजार चौरस फुटापेक्षा लहान घर असणार्‍यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

Posted by : | on : 8 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (45 of 1851 articles)

Sansad Bhavan1
लोकसभेत होणार सादर, नवी दिल्ली, ७ जानेवारी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा मसुदा नव्यान तयार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सोमवारी मंजुरी ...

×