ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आलोक वर्मांना पद बहाल, अधिकार नाही

आलोक वर्मांना पद बहाल, अधिकार नाही

►आठ दिवसांत निवड समितीने निर्णय घ्यावा
►सर्वोच्च न्यायालयाचा आदेश,
नवी दिल्ली, ८ जानेवारी –

Supreme Court 2

Supreme Court 2

केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारसीवरून सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी रद्दबातल ठरविला. वर्मा यांना पुन्हा संचालकपदी कायम करताना, न्यायालयाने त्यांच्याकडील सर्व अधिकार मात्र काढून घेतले आहेत. यामुळे आलोक वर्मा हे अधिकार नसलेले सीबीआय संचालक राहणार आहेत. आलोक वर्मा येत्या ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत, हे विशेष.
सीबीआय संचालकपदावरील अधिकार्‍याची नियुक्ती करणार्‍या उच्चस्तरीय निवड मंडळाने वर्मा यांच्या भवितव्याचा निर्णय आठ दिवसांत घ्यावा, असा आदेशही न्या. एस. के. कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या न्यायासनाने दिला. दरम्यान, हा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लिहिला असला, तरी काही कारणांमुळे ते आज न्यायासनात हजर राहू शकले नाहीत.
केंद्रीय दक्षता आयोगाने आपल्या तपासात काढलेल्या निष्कर्षांच्या आधारावर वर्मा यांच्याबाबतचा निर्णय पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेता यांचा समावेश असलेल्या समितीनेच घ्यावा. तोपर्यंत वर्मा यांना पदावर राहता येणार असले, तरी आपल्या अधिकारांचा वापर मात्र करता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. यावेळी न्यायालयाने, वरिष्ठ पोलिस अधिकारी एम. नागेश्‍वर राव यांची सीबीआयचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा केंद्र सरकारचा आदेशही रद्द ठरविला.
वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात सीसीव्हीच्या शिफारसीवरून केंद्र सरकारने आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविल होते. वर्मा यांचा संचालकपदावरील दोन वर्षांचा कार्यकाळ ३१ जानेवारी रोजी संपणार आहे. रजेवर पाठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यापूर्वी केंद्र सरकारने निवड समितीची सहमती घ्यायला हवी होती. सीव्हीसीच्या शिफारसीवरून वर्मा यांना रजेवर पाठविण्याची पद्धतच घटनाबाह्य आहे, असेही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.
हा संस्थेचा विजय : वर्मांचे वकील
हा एका संस्थेचा विजय आहे. देशात न्यायप्रक्रिया योग्य रीत्या सुरू आहे. न्याय प्रक्रियेविरोधात कोणी गेले तर सर्वोच्च न्यायालय उपलब्ध आहे, अशी प्रतिक्रिया आलोक वर्मा यांचे वकील संजय हेगडे यांनी दिली.
तो निर्णय सीव्हीसीच्या शिफारशीवरून : जेटली
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना रजेवर पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारचा नव्हता, या सर्वोच्च तपास संस्थेची एकात्मता अबाधित राखण्यासाठी सीव्हीसीने तशी शिफारस केली होती, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी दिली.
सीव्हीसी ही देखील एक स्वायत्त संस्था आणि तिच्या शिफारसी केंद्र सरकारसाठी बंधनकारक आहेत. त्यामुळे सीव्हीसीची शिफारस केंद्राने मान्य केली. आता सर्वोच्च न्यायालयाने वर्मा यांना पुन्हा पद बहाल केले असल्याने, आम्ही न्यायालयाच्याही निर्णयाचे पालन करणार आहोत, असे जेटली यांनी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांबाबतही सीव्हीसीनेच कारवाईची शिफारस केली होती. हे दोन्ही अधिकारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते आणि त्यांच्यातील भांडणामुळे सीबीआयची प्रतिमा डागाळत होती. देशातील ही सर्वोच्च तपास संस्था देशात हास्याचा विषय ठरली होती. अशा स्थितीत सीबीआयला वाचविण्यासाठी सीव्हीसीच्या शिफारसीवर केंद्र सरकारने घेतलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणाराच होता, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले.
आलोक वर्मा किंवा राकेश अस्थाना यांच्याबाबत केंद्राच्या मनात कुठलाही वैरभाव नाही, केवळ सीबीआय हास्याचा विषय ठरायला नको, हीच केंद्राची इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिला, तो समतोल राखणारा आहे, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 9 Jan 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (42 of 1851 articles)

Prime Minister Narendra Modi Meeting With Norway Prime Minister Erna Solberg Before
पंतप्रधानांची ग्वाही ►भारत-पाकची संमती हवी, नवी दिल्ली, ८ जानेवारी - भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर तोडगा काढण्यासाठी, या ...

×