ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » इव्हीएम घोटाळ्याचा पुन्हा बहाणा

इव्हीएम घोटाळ्याचा पुन्हा बहाणा

•सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार विरोधी पक्ष, •पराभव दिसल्यानेच इव्हीएमचे तुणतुणे : भाजपा
नवी दिल्ली, १४ एप्रिल –

Kapil Sibal

Kapil Sibal

विरोधकांनी पुन्हा एकदा इव्हीएम घोटाळ्याचे तुणतुणे वाजविण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख विरोधी पक्षांच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत इव्हीएममध्ये करण्यात येत असलेल्या फेरफारीवर चर्चा करण्यात आली. इव्हीएमसोबत किमान ५० टक्के पेपर ट्रेल्सची पडताळणी करण्यात यावी, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री. एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी याच मुद्यावर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेतली होती. नायडू यांनीच या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. इव्हीएमच्या किमान ५० टक्के व्हीव्हीपॅट पेपर ट्रेल्सची मतमोजणीच्या काळात पडताळणी केली जावी, अशी २१ राजकीय पक्षांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत काँगे्रसचे प्रतिनिधित्व करणारे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आम्ही लवकरच या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. ५० टक्के पेपर ट्रेल्सची पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावे, अशी विनंती आम्ही करणार आहोत.
इव्हीएममधील घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही देशव्यापी आंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. इव्हीएमबाबत असलेल्या तक्रारींकडे निवडणूक आयेाग पुरेशे लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
या २१ पक्षांमध्ये काँगे्रस, तेलुगू देसम, समाजवादी पार्टी, भाकप, माकप यासारख्या पक्षांचा समावेश होता. या बैठकीनंतर या पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रपरिषदही घेतली. निवडणुकीत पारदर्शकता असण्यावर, तसेच मतदारांच्या हक्काचे रक्षण करण्यावर या नेत्यांनी भर दिला.
काँगे्रसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आमच्या मागणीकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्यास, आम्हाला अन्य मार्गांची चाचपणी करणे भाग पडेल. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच इव्हीएमविषयी शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत. अनेक मतदान केंद्रांमध्ये ज्याच्या नावासमोरील बटन दाबण्यात आल्यानंतर मत दुसर्‍याच उमेदवाराला गेले असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून, आयोगाने याची दखल घ्यायलाच हवी.
पराभव दिसल्यानेच इव्हीएमचे तुणतुणे : भाजपा
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच फेरीत भाजपासाठी अनुकूल असे मतदान झाले. आणखी सहा टप्पे शिल्लक असले, तरी देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची मानसिकता तयार केली असल्याने, विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे इव्हीएममध्ये दोष काढण्यास सुरुवात केली आहे, अशी जोरदार टीका भाजपाने आज रविवारी केली.
या बैठकीतून त्यांनी एकप्रकारे आपल्या पराभवाची कबुलीच दिली असून, आमचा पराभव इव्हीएममुळे झाला, हे कारण त्यांनी आतापासूनच समोर करण्यास सुरुवात केली आहे, असा चिमटा भाजपाचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी पत्रपरिषदेत केला.
नागर बंधूवरून काँगे्रसवर टीका
आमदार ललित नागर यांना हरयाणाच्या फरिदाबाद येथून काँगे्रसने लोकसभेचे तिकीट दिले. ललित यांच्या मोठ्या भावाने गांधी घराणे आणि रॉबर्ट वढेरा यांच्याशी संबंधित अनेक जमिनींच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. राहुल, रॉबर्ट आणि प्रियांका वढेरांच्यावतीने त्यांनी अनेक आक्षेपार्ह दस्तावेजांवरही स्वाक्षरी केली आहे, असा आरोप नरसिंह राव यांनी केला.

Posted by : | on : 15 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (39 of 2407 articles)

Arvind Panagariya
आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांचे मत, नवी दिल्ली, १४ एप्रिल - मोदी सरकारच्या ग्रामीण उज्ज्वला, प्रधानमंत्री किसान योजना, आयुषमान ...

×