ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » इस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा

इस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा

►आणखी एक गगनभरारी
►३० उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण,
श्रीहरिकोटा, २९ नोव्हेंबर

Isro Logo

Isro Logo

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज गुरुवारी आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला आहे. पृथ्वीचे निरीक्षण करणार्‍या भारतीय उपग्रहासह आठ देशांच्या एकूण ३० उपग्रहांचे इस्रोने आज यशस्वी प्रक्षेपण केले. काही वेळातच हे सर्व उपग्रह त्यांच्या कक्षेत स्थिरावले.
यात अमेरिकेचे २३ उपग्रह असून, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलॅण्ड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेनच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी ४३ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हे सर्व उपग्रह एकाचवेळी अंतराळात सोडण्यात आले. या प्रक्षेपणासाठीची २८ तासांची उलटगणती बुधवारी सकाळी सुरू झाली होती. या प्रक्षेपकाचे हे ४५ वे प्रक्षेपण आहे.
पृथ्वीचे निरीक्षण करणारा हायपर स्पेक्ट्रल इमॅजिंग सॅटेलाईटचे (हायसिस) प्रक्षेपण करण्यात आल्यानंतर १७ मिनिटे २७ सेकंदांनी तो अवकाशातील त्याच्या कक्षेत स्थिरावला. यावेळी प्रक्षेपण केंद्रात उपस्थित असलेले इस्रोचे अध्यक्ष के. सिवान आणि इतर वैज्ञानिकांनी जोरदार जल्लोष केला.
हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असून, विद्युत चुम्बकीय इन्फ्रारेड आणि शॉर्टवेव्ह इन्फ्रारेड क्षेत्राजवळ दृश्य असलेल्या पृथ्वीच्या भागाचे हा उपग्रह निरीक्षण करणार आहे. हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. प्रदूषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. या उपग्रहाचे वजन ३८० किलोगॅ्रम असून, सूर्याच्या धृवीय समान कक्षेत तो पोहोचविण्यात आला आहे. या महिन्यातील इस्रोची ही दुसरी भरारी आहे. १४ नोव्हेंबर रोजी इस्रोने जीएसएलव्ही-एमके-३-डी२ या प्रक्षेपकाद्वारे जीएसएटी-२९ या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने १५ फेबु्रवारी रोजी १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.
गगनयान मोहीम संपूर्ण स्वदेशी
श्रीहरिकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी अशी गगनयान मोही संपूर्ण स्वदेशी करण्यावर आमचा भर आहे. यासाठी आम्ही देशातच उपलब्ध असलेल्या सर्व सोयी-सुविधांचा वापर करणार आहोत, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी दिली. पृथ्वीचे निरीक्षण करणार्‍या ‘हायसिस’ उपग्रहासोबतच आठ देशांच्या एकूण ३० उपग्रहांचे इस्रोने आज यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर सिवान पत्रपरिषदेत बोलत होते. आमची गगनयान मोहीम संपूर्ण भारतीय असेल, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, तथापि त्याच्या काही चाचण्यांकरिता आम्हाला विदेशी मदत घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. २०२२ पर्यंत अंतराळात मानव पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही गतीने काम सुरू केले आहे. या मोहिमेकरिता आम्ही देशातील संसाधनांचा वापर करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 30 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (444 of 2027 articles)

Modi Sarkar
१ लाख ६६ हजार घरे मंजूर, नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर - केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (शहरी) आज गुरुवारी देशातील ...

×